PSI Full Form In Marathi पीएसआय चा पूर्ण फॉर्म म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर असा होतो. यालाच मराठी भाषेत आपण पोलीस उपनिरीक्षक अस देखील म्हणतो. पीएसआय हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर खाकी वर्दी घालून हातात दंडा घेऊन उभा असलेला एक माणूस येतो. पीएसआय या शब्दांमध्येच रुबाब असा वाटतो. भारतामधल्या पोलीस शाखेमधून हा एक अत्यंत महत्त्वाचा पोलीस आहे.

पीएसआय फुल फॉर्म PSI Full Form In Marathi
पीएसआय हा पोलीस खात्यातील, तपास अधिकारी असतो. कुठल्याही न्यायालयात पीएसआय ला, आरोप पत्र दाखल करण्याचे परवानगी दिली जाते. पीएसआय या पदासाठी निवड भरतीद्वारे केली जाते. पीएसआय या पदावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागते.
स्टाफ सिलेक्शन कमिशन, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन या द्वारे आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये पात्रता मिळवून या पदासाठी भरती करण्यात येते. हे अत्यंत जबाबदारीचा पद आहे. सर्वप्रथम उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला, सर्वात आधी उपनिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात येत, आणि त्यानंतर या पदावर ती काही वर्ष सेवा दिल्यानंतर पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात येते.
हे पोलीस शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दर्जेदार पद आहे. पीएसआय या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला खूप जबाबदाऱ्या असतात. आणि त्याचा जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणे हे त्याचा कर्तव्य असतं. पोलीस म्हटल्यानंतर सोपे नाही तर त्या लोकांना जोखमीचे काम करावे लागतात.
प्राथमिक तह याचं काम, कायदा आणि सुव्यवस्था सक्षमपणे आणि व्यवस्थित चालू आहे हे बघणं असतं. पीएसआय हा पोलीस खात्यातील तपास अधिकारी असल्यामुळे याच्याकडे भरपूर अधिकार देण्यात येतात.
पीएसआय च काम काय असतं?
पीएसआय चा पूर्ण फॉर्म म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर असा होतो. याच्या कामाबद्दल बोलायला गेलं तर हे अत्यंत जोखमीचा आणि जबाबदारीचा काम असतं. पीएसआय अशा मोठ्या पदावरती नियुक्त केलेल्या व्यक्तीला भरपूर जबाबदाऱ्या देण्यात येतात. त्यांच्यावर एक नाही तर विविध जबाबदाऱ्या टाकण्यात येतात.
समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था बघण्यासाठी हे जबाबदार असतात. एका ठराविक जागेचा सुरक्षा बघण्यासाठी पीएसआय जबाबदार असतो. पीएसआय हा पोलीस चौकीचा किंवा इतर विविध कमांडिंग चौक्यानचा प्रभारी असतो. कुठलीही केस पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर पीएसआय त्यांच्या वरिष्ठांना केस सोडवण्यास मदत करतो.
इतर खालच्या दर्जावर असलेले कर्मचारी म्हणजेच हेडकॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, आणि इतर कर्मचाऱ्यांचा मार्गदर्शन करतो. मोटर वाहतूक आणि त्यासोबतच इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये देखील पीएसआयची भरती करण्यात येते.
बीएसएफ, सीबीआय, सीआरपीएफ, आणि अशाच इतर निमलष्करी दलांकडे हे पद देण्यात येत. या पदावर नियुक्त होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता या सगळ्या तपासल्यानंतरच या पदावर नियुक्त करता येतं. हे अत्यंत महत्त्वाचा पोलीस पद असून यासाठी दरवर्षी भरपूर विद्यार्थी परीक्षा देत असतात.
PSI full form in English | PSI full form in Marathi
PSI full form in Marathi | पोलीस उपनिरीक्षक |
PSI full form in English | Police Sub-Inspector |
PSI प्रति महिना पगार | ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० |
पीएसआय साठी पात्रता
पीएसआय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर. पीएसआय हे पद पोलीस क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच पद असतं. हे एक खूप जोखमीचा आणि जबाबदारीचं काम असतं. पीएसआय होण्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता निम्नलिखित आहेत:
- नागरिकत्व: भारतीय पोलीस विभागामध्ये उपनिरीक्षक म्हणून आणि त्यानंतर पदोन्नती मिळाल्यावर पीएसआय होण्यासाठी त्या व्यक्तीला भारतीय असणं गरजेचं आहे. तू विद्यार्थी किंवा तू उमेदवार भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे तेव्हाच तो पीएसआय या पदासाठी परीक्षा देऊ शकतो आणि पीएसआय होण्यासाठी पात्र ठरतो.
- शैक्षणिक पात्रता: पीएसआय होण्यासाठी त्या विद्यार्थ्याने किंवा उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा एखाद्या मोठ्या संस्थेतून पदवी मिळवणं गरजेचं आहे. एखाद्या नामांकित विद्यापीठातून पदवीधर असणं पीएसआय होण्यासाठी गरजेच आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किमान ५०% इतके गुण प्राप्त करणे गरजेचे आहे.
- शारीरिक मोजमाप: पीएसआय हे पोलीस विभागातील एक अत्यंत जोखमीचा आणि जबाबदारीचा पद असून यासाठी शारीरिक पात्रता देखील तेवढीच महत्त्वाची आहे यामध्ये उमेदवाराची उंची,१७० सेमी असणं गरजेचा आहे आणि त्याचबरोबर, उमेदवाराच्या छातीचं माप,८०-८५ सेमी असणं गरजेचं आहे. या सर्व शारीरिक पात्रता पार केल्यानंतर उमेदवार या परीक्षेसाठी आणि पदासाठी पात्र ठरतो.
पीएसआय बनण्यासाठी काय करायचं असतं?
पीएसआय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर. पोलीस क्षेत्रातील एक अत्यंत जोखमीचा आणि जबाबदारीचा पद आहे. पीएसआय होण्यासाठी उमेदवाराला किंवा विद्यार्थीला एक पात्रता परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा प्रत्येक राज्याची वेगळी असते.
महाराष्ट्र राज्याचा सांगायला गेलं तर पीएसआय म्हणजेच, पोलीस उपनिरीक्षक बनण्यासाठी उमेदवाराला, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कडे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला एमपीएससी नावाची पात्रता परीक्षा द्यावी लागते.
एमपीएससी ही एक पात्रता परीक्षा आहे ज्यामध्ये विद्यार्थी सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. एमपीएससी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळतात. पीएसआय हे पद देखील महाराष्ट्र राज्यात एमपीएससीच्या अंतर्गत येतं. एमपीएससी ही परीक्षा देण्यासाठी काही पात्रता गरजेच्या आहेत. एमपीएससी देण्यासाठी आवश्यक पात्रता निम्नलिखित आहेत:
- शैक्षणिक: एमपीएससी देण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही शाखेतून पदवीधर असण गरजेच आहे.
- वय: वयाच्या २८ अशा पर्यंत विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्याच ठिकाणी रक्षण श्रेणींसाठी हे वयोगट ३२ वर्षांपर्यंत वाढवल गेलय
- परीक्षेचा नमुना: त्यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात सर्वप्रथम प्राथमिक परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर, मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्याला बसावं लागतं. आणि या दोन्हीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जातं.
- प्रशिक्षण: मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक शहरामध्ये, ११ महिन्यांसाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं.
पीएसआय चा पगार किती असतो?
पीएसआय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर. पोलीस विभागातील अत्यंत महत्त्वाचं पद आहे. या पदावर नियुक्त होण्यासाठी विद्यार्थी भरपूर कष्ट घेतात. शैक्षणिक पात्रता सोबतच शारीरिक पात्रता देखील या पदासाठी गरजेची आहे. आणि त्यासाठी देखील विद्यार्थी भरपूर कष्ट घेत असतात आणि एमपीएससी या परीक्षेद्वारे महाराष्ट्र मध्ये पीएसआय म्हणून नियुक्त होत असतात. पीएसआय हे पद अत्यंत जोखमीचा आणि जबाबदारीचा पद आहे.
सर्वप्रथम विद्यार्थी पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून रुजू होतो आणि त्यानंतर काही वर्षांनंतर पदोन्नती मिळाल्यावर पीएसआय या पदावर त्याची नियुक्ती केली जाते. पीएसआय या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचा पगार ₹३८,६०० ते १,२२,८०० इतका असू शकतो. पीएसआय ही एक सरकारी नोकरी असून याचा पगार देखील चांगला आहे.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण पीएसआय बद्दल भरपूर माहिती घेतली. त्यामध्ये सर्वप्रथम पीएसआय म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. पीएसआय चा पूर्ण फॉर्म आपण जाणून घेतला. पीएसआय चा पूर्ण फॉर्म पोलीस सब इंस्पेक्टर असा आहे. त्यानंतर पीएसआय पदावर नियुक्ती झाल्यानंतर पीएसआय चा नेमकं काम काय असतं हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर पीएसआय होण्यासाठी गरजेचे पात्रता देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतल्या.
शैक्षणिक त्याचबरोबर शारीरिक पात्रता देखील यासाठी गरजेची आहे. एखाद्या उमेदवाराला पीएसआय व्हायचं असेल तर कसं व्हायचं हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. पीएसआय होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एमपीएससी नावाची परीक्षा देणे गरजेचे आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजण्याचा प्रयत्न केला.
पीएसआय या पदावर नियुक्त झाल्यावर त्या उमेदवाराचा पगार किती असतो हे देखील आपण या पोस्ट म्हणून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
महाराष्ट्रात PSI कसे व्हावे?
पीएसआय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक. महाराष्ट्र पोलीस विभागातील हे अत्यंत महत्त्वाचं अधिकारी पद आहे. एमपीएससी द्वारे आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी किंवा उमेदवार पीएसआय या पदावर नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतो.
महाराष्ट्रात पीएसआय साठी कोणती परीक्षा आवश्यक आहे?
महाराष्ट्र मध्ये पीएसआय होण्यासाठी एमपीएससी परीक्षा देणे गरजेच आहे. ही परीक्षेच्या टप्प्यांमध्ये घेण्यात येते. ते चार टप्पे म्हणजे प्रिलिम्स परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत. हे सर्व टप्पे पार केल्यानंतर विद्यार्थी पीएसआय या पदावरून नियुक्त करण्यात येतो.