एसएससी फुल फॉर्म SSC Full Form In Marathi - Full Forms Marathi

एसएससी फुल फॉर्म SSC Full Form In Marathi

SSC Full Form In Marathi एसएससी चा पूर्ण फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन असा होतो. यालाच आपण मराठी मध्ये कर्मचारी निवड आयोग असा देखील म्हणतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन हे भारत सरकारचं एक आयोग आहे. एसएससी अंतर्गत विविध पदावरील नोकरीसाठी आणि त्या नोकरीमध्ये भरतीसाठी विविध परीक्षा घेण्यात येतात. विविध परीक्षा विविध पदांसाठी घेण्यात येतात.

SSC Full Form In Marathi

एसएससी फुल फॉर्म SSC Full Form In Marathi

एसएससी चा मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. एसएससी च्या कमिशन मध्ये एक अध्यक्ष, एक सचिव, आणि दोन सदस्य असतात. ४ नोव्हेंबर १९७५ या दिवशी भारत सरकारने एसएससी कमिशनची स्थापना केली होती. दरवर्षी एसएससी द्वारे विविध परीक्षा घेण्यात येतात आणि त्यामधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या पदांसाठी भरती करण्यात येते, एसएससी अंतर्गत विविध परीक्षा घेण्यात येतात, अनिता सर्व परीक्षांमध्ये एसएससी द्वारे काही प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य त्या पदांवर भरती मिळते.

ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थीला सरकारी नोकरी मिळत असते. सरकारी नोकरीसाठी हे अत्यंत उत्तम पर्याय आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एसएससी च्या कुठल्याही परीक्षा दिल्या आणि त्या उत्तीर्ण केल्या तर विद्यार्थीला सहज सरकारी नोकरी मिळण्यात ची शक्यता असते.

SSC full form in English |  SSC full form in Marathi

SSC full form in Marathiस्टाफ सिलेक्शन कमिशन
SSC full form in EnglishStaff Selection Commission
SSC चा पगार किती आहेरु. 35,400 ते रु. 1,12,400 प्रति महिना
SSC ही कायमची नोकरी आहेहोय

एसएससी परीक्षा

एसएससी चा पूर्ण फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन असा होतो, आणि यालाच आपण मराठीमध्ये कर्मचारी निवड आयोग असे देखील म्हणतो. एसएससी ही एक अशी संस्था आहे विदर्वर्षी परीक्षा आयोजित करत असते आणि विविध पदांसाठी विविध परीक्षा विद्यार्थी देत असतात आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या पदांवरती भरती मिळत असते. अशाच काही एसएससी द्वारे घेतल्या गेलेल्या महत्त्वाच्या परीक्षा निम्नलिखित आहेत.

१) कम्बाईन ग्रज्युएट लेवल एक्झाम (CGL)

सीजीएल नावाची एक्झाम ही एक संयुक्त पदवी स्तर परीक्षा आहे. सीजीएल चा पूर्ण फॉर्म कम्बाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम असा होतो. सीजीएल परीक्षा केंद्र सरकार आणि त्यांच्या विविध विभागामध्ये विविध पदांवर भरती मिळवण्यासाठी दिली जाते.

ही परीक्षा एक पदरी स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. दरवर्षी भरपूर विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करायची असते ते सगळे विद्यार्थी ही परीक्षा दरवर्षी देत असतात. सीजीएल परीक्षा द्वारे निम्नलिखित पदांवर भरती देण्यात येते:

  • सहाय्यक ऑडिट अधिकारी
  • सहाय्यक सेक्शन अधिकारी
  • निरीक्षक पद
  • सहाय्यक अकाउंट अधिकारी
  • निरीक्षक
  • जूनियर स्टेटसटिकल ऑफिसर
  • आयकर निरीक्षक
  • अधीक्षक
  • डिव्हिजनल अकाउंटंट
  • उपनिरीक्षक
  • केंद्र प्रतिबंधक निरीक्षक
  • एक्झामिनर
  • सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
  • एसएससी सीजीएल या परीक्षेसाठी पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
  • ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारी यामध्ये भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर भूतान आणि नेपाल चे नागरिक देखील यामध्ये पात्र ठरतात
  • यामधील वयाची मर्यादा म्हणजे वर्ष १८ ते ३२ वर्ष ही वयोगटाची अट आहे. यामध्ये राखीव श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी सूट असू शकते.
  • यामध्ये सभी इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर यासारखे पदांसाठी शारीरिक पात्रता देखील गरजेची असते

२) कम्बाइन हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम (CHSL)

ही एक उच्च माध्यमिक पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी नोकरी मिळवू शकतात. दरवर्षी भरपूर विद्यार्थी ही नोकरी मिळवण्यासाठी ही परीक्षा देत असतात. ही परीक्षा दिल्यानंतर निम्नलिखित पदांवरती भरती केली जाते:

  • पोस्टल असिस्टंट
  • लोअर डिव्हिजन क्लर्क
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • एसएससी सी एच एस एल या परीक्षेसाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
  • यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे
  • यामध्ये वयाची मर्यादा वर्ष १८ ते वर्ष २७ असणं गरजेचं आहे. यामध्ये राखीव श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी सूट देण्यात येऊ शकते.

३) जूनियर इंजीनियर एक्झाम

ही परीक्षा विशेषतः अभियांत्रिक विभागामधील पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येते. सरकारी विभागामध्ये भरपूर ठिकाणी इंजिनियर या पदाची आवश्यकता असते अशा वेळेस एसएससी ज्या परीक्षेमधून कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनिअर इंजिनियर या पदाची भरती या परीक्षेद्वारे होत असते. या परीक्षेद्वारे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, या विभागांची उमेदवारी ज्युनिअर इंजिनियर म्हणून नियुक्त करण्यात येतात. यामध्ये लागणारी पात्रता म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रात इंजीनियरिंग ची पदवी मिळवणे गरजेचे आहे.

४) जनरल ड्युटी एक्झाम फोर कॉन्स्टेबल

ही परीक्षा देखील एसएससी च्या अंतर्गत घेण्यात येते. आणि ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टेबल या पदावर नियुक्त केला जात. एसएससी जीडी परीक्षेद्वारे निम्नलिखित पदांवर भरती करण्यात येते:

  • कॉन्स्टेबल इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
  • कॉन्स्टेबल इन नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी
  • कॉन्स्टेबल इन सशस्त्र सीमा बल
  • कॉन्स्टेबल इन सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स
  • कॉन्स्टेबल सेक्रेटरीएट सिक्युरिटी ऑफिस
  • कॉन्स्टेबल इन इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस
  • कॉन्स्टेबल इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स

एसएससी जीडी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणे एवढी आहे.

५) सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन एक्झाम

ही परीक्षा देखील एसएससी अंतर्गत घेण्यात येते. ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे कारण यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पोलीस मध्ये भरती करण्यात येतं. दरवर्षीय परीक्षेसाठी भरपूर विद्यार्थी अर्ज करत असतात. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निम्नलिखित पदांवर भरती देण्यात येते:

  • असिस्टंट सब इन्स्पेक्टर इन सीआयएसएफ
  • सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस
  • सेंट्रल आम पोलीस फोर्स

ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान पात्रता म्हणजे ते विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे.

एसएससी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर त्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करायच आहे
  • त्यानंतर त्या ठिकाणी न्यू युजर म्हणून क्लिक करायचं आहे तेव्हा नवीन पेज ओपन होईल
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन वर दाबल्यानंतर एक फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या माहिती म्हणजेच नाव ईमेल आयडी ऍड्रेस मोबाईल क्रमांक सारख्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी भरायच्या आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर देखील तिथे अपलोड करायचा आहे
  • त्यांच्याकडून तुम्हाला एक आयडिया आणि पासवर्ड मिळेल.
  • आणि त्यानंतर शेवटी अर्ज शुल्क भरून फॉर्म जमा करायचा आहे.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण एसएससी या विषयावर बरीच माहिती घेतली, सर्वप्रथम आपण एसएससी चा पूर्ण फॉर्म काय आणि त्या ठिकाणी एसएससी म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं. त्यानंतर आपण एसएससी मधील विविध परीक्षा बघितल्या आणि त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर कुठल्या पदांवर नियुक्ती होते हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण या पोस्ट मधून बघितला.

त्यानंतर एसएससी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

एसएससी सीजीएल परीक्षा मध्ये पेन ला परवानगी आहे का?

नाही, एसएससी त हॉलमध्ये कुठल्याच गोष्टीला परवानगी नाही आहे. त्या ठिकाणी पेन पुस्तक पेपर मोबाईल कॅल्क्युलेटर अशा कुठल्याच गोष्टींना परवानगी नाही आहे. अशा कुठल्याही गोष्टी विद्यार्थ्याजवळ आढळल्यास त्याच्यावर कानूनी कारवाई करण्यात येते.

कोणती एस एस सी परीक्षा सर्वोत्तम आहे?

विद्यार्थ्याच्या आवडीवर निर्भर करता जे पद त्याला हवय त्यानुसार परीक्षा ठरत असते यामध्ये जर विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याच्यासाठी सर्वोत्तम परीक्षा म्हणजे एसएससी सीजीएल ही आहे आणि त्याच ठिकाणी जर विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असेल आणि बारावीनंतर लगेच त्याला नोकरी हवी असेल तर त्या ठिकाणी, त्या विद्यार्थीसाठी एसएससी सी एच एस एल ही परीक्षा सर्वोत्तम ठरते.

एसएससी मध्ये लेव्हल १ पगार किती आहे?

एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लेव्हल वन पदावर ४४,९००-१,४२,४०० एवढा पगार आहे.

एसएससी म्हणजे काय?

एसएससी चा पूर्ण फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन असा आहे आणि ही एक भारतीय संस्था असून यामध्ये विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये पदांच्या भरतीसाठी कर्मचारी निवडले जातात.

एसएससी सीजल साठी वयोमर्यादा किती आहे?

एसएससी सीजीएल साठी विद्यार्थी १८-३२ या वयोगटातील असणं गरजेचं आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top