एनएमएमएस फुल फॉर्म NMMS Full Form In Marathi - Full Forms Marathi

एनएमएमएस फुल फॉर्म NMMS Full Form In Marathi

NMMS Full Form In Marathi एनएमएमएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा होतो. ही एक सरकार या द्वारे आयोजित केले गेलेली शिष्यवृत्ती योजना आहे. यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असं देखील म्हणतो.

NMMS Full Form In Marathi

एनएमएमएस फुल फॉर्म NMMS Full Form In Marathi

विद्यार्थी ७वी पूर्ण झाल्यानंतर ८वी मध्ये गेल्यानंतर ही परीक्षा देत असतात. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना देता येत नाही, आर्थिक दृष्टीने जे विद्यार्थी दुर्बल घटकातील असतात ते विद्यार्थीच ही परीक्षा देण्यास पात्र ठरतात. ही परीक्षा देण्याचा फायदा असा होतो की जितके जास्त गुण मिळतील तितकी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना देण्यात येते. आणि यामुळे भविष्यातील त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागतो.

आपल्या देशामध्ये भरपूर अशा विद्यार्थी आहेत जे आर्थिक रित्यास दुर्बळ असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही परंतु त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आस आहे त्या विद्यार्थ्यांना जर आर्थिक रित्यास मदत केली तर ते शिक्षणाच्या क्षेत्रात भरपूर काही मिळवू शकतात.

सरकारने अशाच विद्यार्थ्यांचा शोध लावण्यासाठी या परीक्षेचा आयोजन करण्यात आलेला आहे जेणेकरून अशी हुशार विद्यार्थी निवडून येतील आणि यांच्यासाठी स्कॉलरशिप जाहीर करण्यात येईल, जेणेकरून यांच्या भविष्याला हातभार लावता येईल.एनएमएमएस नावाच्या या परीक्षेला भरपूर महत्त्व आहे.

आर्थिक रित्या दुर्बळ असले तरी बुद्धिमत्तेने हुशार असलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये शोध लागतो आणि असेच विद्यार्थ्यांना मदत करून सरकार त्यांना शिक्षणाची संधी देते आर्थिक रित्या त्यांना मदत करते आणि त्याचबरोबर त्यांचा शिक्षणा चा खर्च देखील वाचतो आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळतो.

एनएमएमएस परीक्षेचं उद्देश्य

एनएमएमएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे. यालाच मराठी भाषेत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असं म्हणतात.एनएमएमएस नावाच्या या परीक्षेला महाराष्ट्र शासनाने २००७-२००८ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली होती. आजपर्यंत ही योजना अत्यंत सक्षमपणे आणि विद्यार्थ्यांना फायदा पूर्वत एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे.एनएमएमएस परीक्षेचे उद्देश्य निम्नलिखित आहेत:

  • आर्थिक रित्यास दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांसाठी हे एक अति उत्तम आयोजन आहे कारण असे विद्यार्थी जे खूप हुशार असतात परंतु आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांना अभ्यास करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सरकारने या परीक्षेचा नियोजन केलं आणि यामधून अशा विद्यार्थ्यांना शोधून काढलं आणि त्यांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला
  • अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण किमान १२वी पर्यंत तरी न कुठला अडथळा येता पूर्ण होवो यासाठी शासन अशा विद्यार्थ्यांना, शिष्यवृत्ती देत असते.
  • अनेकदा बरेच विद्यार्थी १०वी नंतर पैशांच्या अडचणीमुळे शिक्षण सोडून देतात जे की अत्यंत चुकीचा आहे यामुळे सरकारने याचा विचार करत, विद्यार्थ्याने किमान १२वी पर्यंत महाविद्यालयात शिक्षण घ्यावं यासाठी ही योजना सुरू केली आहे.

NMMS  full form in English | NMMS  full form in Marathi

NMMS full form in Marathiनॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा
NMMS  full form in EnglishNational Means cum Merit Scholarship examination
NMMS 8 व्या वर्गाची शिष्यवृत्ती काय आहे?55% (किंवा SC/ST साठी 50%)

एनएमएमएस साठी पात्रता

एनएमएमएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे. आर्थिक रित्यास दुर्बळ घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते. जेणेकरून हे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील. या परीक्षेसाठी पात्रता निम्नलिखित आहे:

  • अशा विद्यार्थ्यांचे पालकांचे म्हणजेच आई आणि वडिलांचे, दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न १ लाख ते ५० हजारा पेक्षा जास्त नसले पाहिजे. याचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उत्पन्नाचा दाखला आधी, मराठी मधून आणि त्यानंतर तहसील मधून घेणे गरजेच आहे.
  • तहसील कडून मिळालेला उत्पन्नाचा एक वर्षाचा दाखला हे मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडे जमा करून घ्यावा ही अट नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप परीक्षा घेणाऱ्या मंडळांनी केली आहे. हा दाखला कधीही मंडळाकडून मुख्यध्यापकांकडे मागितला जाऊ शकतो त्यामुळे यात कुठेच चुकीचं पाऊल उचलता येत नाही.
  • यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे विद्यार्थ्याला इयत्ता ७वी मध्ये ५५% किंवा त्याहून जास्त गुण असणं आवश्यक आहे.
  • एससी आणि एसटी या श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये ५% ची सुट देण्यात आली आहे, या विद्यार्थ्यांना इयत्ता ७वी मध्ये ५०% किंवा त्याहून जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • केंद्रीय विद्यालय, विनाअनुदानित शाळा, आणि जवाहर नवोदय विद्यालय या सगळ्या सैनिकी शाळेमध्ये आधीच विद्यार्थी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे या विद्यार्थिनींना नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप ही परीक्षा देता येत नाही.
  • याशिवाय शासकीय वस्तीगृह आणि ज्या विद्यार्थ्यांना आधीपासून सवलती मिळत आहेत, असे विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र नसतात.

एनएमएमएस परीक्षेचं स्वरूप

एनएमएमएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे. यालाच आपण मराठीत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असं म्हणतो. या योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड एका परीक्षा वरून होत असते. यामध्ये एक लेखी परीक्षा घेण्यात येते. परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात त्यालाच मॅट आणि सेट मध्ये विभागलेल आहे

१. मॅट (MAT) मेंटल एबिलिटी टेस्ट, त्यालाच आपण मराठीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी असे देखील म्हणतो:

या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो आणि यामध्ये त्यांना ९० प्रश्न सोडवायचे असतात आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाला १ गुण देण्यात येतो.

२. सेट (SAT) स्कूलॅस्टिक एपटीट्युड टेस्ट, यालाच आपण मराठीमध्ये, शालेय क्षमता चाचणी असे देखील म्हणतो:

या पेपरमध्ये शाळेत शिकलेल्या विषयांवरती प्रश्न विचारलेले असतात. हा पेपर देखील 90 गुणांचा असतो, या 90 गुणांचा विभाजन असं असतं-

  • सामान्य विज्ञान- ३५ गुण
  • समाजशास्त्र- ३५ गुण
  • गणित – २० गुण

या पेपर साठी देखील विद्यार्थ्यांना ९० मिनिटाचा कालावधी देण्यात येतो आणि प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण देण्यात येत.

यामध्ये प्रत्येक विषयामध्ये निम्नलिखित प्रश्न विचारले जातात

  • सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र-११ मार्क
  • जीवशास्त्र- १३ मार्क
  • रसायनशास्त्र- ११ मार्क

त्यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता असते

  • समाजशास्त्र- इतिहास-१५ मार्क
  • भूगोल-१५ मार्क
  • नागरिकशास्त्र- ५ मार्क
  • गणित- २० मार्क

अशाप्रकारे एनएमएमएस या परीक्षेचं स्वरूप असतं आणि विद्यार्थ्याला या सगळ्या विषयाचा अभ्यास करणे गरजेच आहे.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण एनएमएमएसएनएमएमएस या विषयावर भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम आपण एनएमएमएस पूर्ण फॉर्म बघितला आणि एनएमएमएस म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर या परीक्षेचे उद्देश्य काय आहे हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं.

त्यानंतर ही परीक्षा देण्यासाठी कोण पात्र असतं आणि यासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतल्या. त्यानंतर या परीक्षेचं स्वरूप देखील आपण बघितलं. ही परीक्षा आर्थिक रित्या कमी असलेल्या विद्यार्थ्यांना साठी आयोजित करण्यात येते आणि अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते जेणेकरून ते त्यांचा शिक्षण पूर्ण करू शकतील.

असे भरपूर विद्यार्थी असतात जे हुशार असतात परंतु आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावं लागतं, त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागू नये यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि परत अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

एनएमएमएस या योजनेमध्ये शिष्यवृत्ती किती मिळते?

एनएमएमएस या लेखी परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला चार वर्षांसाठी प्रत्येक वर्षी १२ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळत असते. म्हणजेच १२वी उत्तीर्ण होईपर्यंत विद्यार्थ्याला ४८ हजार शिष्यवृत्ती मिळालेली असते.

एनएमएमएस योजनेसाठी उत्पन्नाची अट काय आहे?

या परीक्षेमध्ये बसण्यासाठी वर्षाचा पालकांचा उत्पन्नाचा दाखला दाखवणे गरजेचे आहे ज्यामध्ये आई-वडील दोघांचं वेतन मिळवून १ लाख ५० हजारापेक्षा जास्त असायला नको.

एनएमएमएस योजना लेखी परीक्षेसाठी अर्ज प्रवेश फी किती आहे?

या परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी अर्ज शुल्क १०० रुपये इतका आहे, यामध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतो.

एनएमएमएस परीक्षेत किती विषय असतात?

या परीक्षेमध्ये दोन पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागतात.
पहिला म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षा आणि दुसरं म्हणजे शालेय क्षमता चाचणी परीक्षा.

एनएमएमएस परीक्षेत नकारात्मक गुण आहेत का?

नाही,एनएमएमएस परीक्षेमध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण देण्यात येतो परंतु यामध्ये, कोणतेही नकारात्मक मार्किंग केली जात नाही.

संदर्भ

Leave a Comment