एनएएसी फुल फॉर्म NAAC Full Form In Marathi - Full Forms Marathi

एनएएसी फुल फॉर्म NAAC Full Form In Marathi

NAAC Full Form In Marathi एनएएसी चा फुल फॉर्म नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद असे म्हणतो. विद्यार्थी किंवा पालक कुठल्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याआधी ते विद्यापीठ कसा आहे याची चाचणी करून घेतात.

NAAC Full Form In Marathi

एनएएसी फुल फॉर्म NAAC Full Form In Marathi

त्या महाविद्यालयात कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि ते कॉलेज कितपत चांगला आहे याबद्दल प्रत्येक जण, प्रवेश घेण्याआधी बघत असतो. आणि हे सगळं बघण्यासाठी एनएएस द्वारे त्या महाविद्यालयाला काय मानांकन आहे हे बघण्यात येतं.

एनएएसी द्वारे मिळालेल्या मानांकनावर आधारित त्या कॉलेजची पातळी समजण्यात येऊ शकते. ही एक अशी संस्था आहे जी मान्यताप्राप्त विद्यापीठांचं मूल्यांकन करतं आणि त्याचबरोबर, त्या संस्थेची गुणवत्तेची स्थिती देखील तपासत. कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा प्रशिक्षण करण अत्यंत गरजेचे आहे त्या महाविद्यालयांमध्ये कुठल्या प्रकारचा शिक्षण देण्यात येते कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेच आहे.

हे प्रशिक्षण करताना महाविद्यालयातील विविध गोष्टी तपासल्या जातात जसं शैक्षणिक प्रक्रिया, शैक्षणिक प्रक्रियेचा प्रभाव, त्या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम काय आहे आणि तो अभ्यासक्रम किती पूर्ण केला जातो, अध्यापक कसे आहेत, संशोधन प्रकल्प, त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये, पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही जसं व्यवस्थित कार्यालय, पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय, बसण्याची व्यवस्था, शिक्षण संसाधन उपलब्ध आहेत की नाही आणि जर आहेत तर त्या कुठल्या दर्जाच्या आहेत याच सुद्धा प्रशिक्षण करण्यात येतं.

विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास, संस्था प्रशासन कस आहे, विद्यार्थ्यांसाठी संस्थेचं वातावरण किती अनुकूल आहे हे देखील ही संस्था बघत असते. या सर्व विषयांचा नीट अभ्यास केल्यानंतर ही संस्था महाविद्यालयाला मानांकन देते.

एनएएसी चे उद्दिष्टे

एनएएसी चा पूर्ण फॉर्म नेशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल असा आहे. ही एक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था आहे जी मान्यताप्राप्त महाविद्यालयांना आणि विद्यापीठांचं मूल्यांकन करत असतं. विविध गोष्टींची तपासणी केल्यानंतर आणि महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या गोष्टींचा आढावा घेत ही संस्था महाविद्यालयाचं मूल्यांकन करत असते. या संस्थेचे काही उद्दिष्टे निम्नलिखित आहेत:

  • एनएएसी या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे उच्च शिक्षण संस्था किंवा विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक प्रकल्पांचे नियतकालिक मूल्यांकन करणे आणि त्याचबरोबर त्यांना मान्यता देणे.
  • एनएएसी शैक्षणिक संस्थेमधील गुणवत्तेला चालना देण्याचे काम करते. शिक्षणाची गुणवत्ता आणि अध्यापन याचा दर्जा वाढवण्याचे काम करते.
  • हे मूल्यांकन कुठल्याही महाविद्यालयासाठी अत्यंत महत्त्वाचं मूल्यांकन असतं आणि त्यामुळे, मूल्यांकन पात्रतेनुसार उच्च शैक्षणिक संस्था नवीन जबाबदाऱ्या आणि कार्य सुरू ठेवत असते.
  • एनएएसी ही संस्था शिक्षण संस्थेंना, सल्लागार प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्याचबरोबर, गुणवत्ता संबंधित संशोधन करण्यास मदत करत.

NAAC  full form in English | NAAC  full form in Marathi

NAAC full form in Marathiनेशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल
NAAC  full form in EnglishNational Assessment and Accreditation Council
NAAC चे प्रमुख कोण आहेअनिल सहस्रबुद्धे
NAAC ही वैधानिक संस्था आहे काNAAC ही एक स्वायत्त संस्था आहे

एनएएसी मान्यता चा हेतू

एनएएसी चा पूर्ण फॉर्म नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल असून ही भारतातील अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे जिच कार्य विविध मान्यता प्राप्त महाविद्यालयांचा मूल्यांकन करणे आहे.एनएएसी या संस्थेची मान्यता एखाद्या महाविद्यालयाला लाभल्यास, त्या महाविद्यालयाचा दर्जा आपल्याला कळून येतो.

त्या महाविद्यालयामध्ये शिक्षणाचा दर्जा, संशोधन, विद्या शाखा, पायाभूत याचा देखील आपल्याला आढावा घेता येतो. यामुळे कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याआधी जर त्या महाविद्यालयाला एनएएसी चा मूल्यांकन मिळालेला असेल तर यावरून विद्यार्थ्याला देखील असं वाटतं की आपण एखाद्या दर्जेदार महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतोय.एनएएसी मान्यता चे हेतू निम्नलिखित आहेत:

  • एनएएसी मुळे विद्यार्थ्यांमध्ये, मूल्य प्रणाली विकसित होत असते.
  • एनएएसी हे राष्ट्रीय विकासात देखील योगदान देत असतं
  • एनएएसी मूल्यांकन असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील जागतिक क्षमता वाढल्यासारखी वाटते
  • एनएएसी शैक्षणिक संस्थेच्या तंत्रज्ञानाला सहन देण्याचा काम करत असतं.

एनएएसी मान्यतेचे फायदे

एनएएसी चा पूर्ण फॉर्म नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल असा आहे. ही एक अशी संस्था आहे जिथे काम मान्यता प्राप्त विद्यापीठाचा मूल्यांकन करण असं असतं.एनएएसी मान्यतेचे फायदे निम्नलिखित आहेत:

  • एनएएसी मान्यता प्रक्रियेमुळे महाविद्यालयाला भरपूर फायदा होतो, महाविद्यालयातील कुठल्या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर, संस्थेमधील चांगले आणि वाईट गोष्टी कळून येतात.
  • एनएएसी एखाद्या महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत उत्तम आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे
  • संस्थेमध्ये अंतर्गत विभागामध्ये नियोजन आणि संसाधनांची गरज समजून येते आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचा विकास होतो
  • या संस्थेमुळे अंतर्गत प्रक्रिया आणि संप्रेषण पण सुधारल जात.
  • पुढील काही वर्षात यामुळे विद्यालयाचा सर्वांगीण विकास होतो, आणि त्याचबरोबर महाविद्यालयाला यशाची नवीन पायरी चढवून देतो.
  • एनएएसी मूल्यांकनमुळे अध्यापकांचा देखील प्रशिक्षण करण्यात येतं आणि यामुळे शैक्षणिक पद्धती देखील सुधारण्यात येतात.
  • एनएएसी मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय असेल तर त्यामुळे विद्यार्थ्यांची भरती देखील वाढते.

एनएएसी मान्यता कशी मिळते

एनएएससी चा पूर्ण फॉर्म नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल असा होतो. राष्ट्रीय स्तरावरील एक अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे जिचं काम मान्यता प्राप्त विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना मूल्यांकन करणे आणि चाचणी करणं अस आहे.

विविध मानदंडावरती ही संस्था महाविद्यालयांचा आणि विद्यापीठांचा मूल्यांकन करत असते जसं महाविद्यालयातील शिक्षण पद्धती, महाविद्यालयातील अभ्यासक्रम आणि तो अभ्यासक्रम किती पूर्ण केला जातो, विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे वातावरण अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याचा देखील सर्वेक्षण घेण्यात येतं त्याच ठिकाणी यामध्ये महाविद्यालयातील इतर सुविधा जसं बसण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय शौचालयाची सोय या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही याचा देखील आढावा घेतला जातो.

नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल या संस्थेद्वारे मान्यता प्राप्त महाविद्यालय हे अत्यंत उत्तम मानलं जातं.नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल या संस्थेद्वारे मान्यता मिळायची प्रक्रिया निम्नलिखित आहे:

  • नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल संस्थेकडून मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी महाविद्यालयांना अर्ज करावा लागतो. आणि त्यासाठी काही पात्रता निकष ठरवलेले आहेत. अर्ज करणारी संस्था किंवा महाविद्यालय जर त्या पात्रता निकष मध्ये परिपूर्ण बसत असतील तर त्यांना निम्नलिखित कागदपत्र प्रस्तुत करायला सांगण्यात येतात:
  • संस्थेचा डेटा आणि अहवाल,सत्यापित डेटा, आणि समर्थन दस्तऐवज,विद्यार्थी अभिप्राय,आयसीटी सक्षम शिक्षण.
  • एनएएसी च्या अधिकृत वेबसाईट वरती महाविद्यालय किंवा ती संस्था अर्ज करू शकते. अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा दिलेली आहे.
  • प्रारंभिक गुणवत्ता मूल्यांकनासाठी, त्या संस्थेचा किंवा महाविद्यालयाचा संपूर्ण डाटा घेतला जातो.
  • या मूल्यांकनाचं प्रशिक्षण झाल्यानंतर अभ्यास अहवाल डाटा या संस्थेकडे देण्यात येतो.
  • जर हा डाटा नाकारला गेला तर त्या महाविद्यालयाला एका वर्षात दोनदा अर्ज करावा लागतो
  • संस्थेकडून दिलेल्या माहितीनंतर एनएएसी कडून त्या संस्थेला, फ्री क्वालिफायर स्कोर म्हणजेच गुण देण्यात येतात.
  • या सर्व डाटाची व्यवस्थित चाचणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना कसे शिकवलं जातं आणि शिकवताना कुठली संसाधने वापरली जातात याचा देखील प्रशिक्षण करण्यात येऊ शकत.
  • या सर्व प्रक्रियेनंतर एनएएसी ची पी आर टी संस्थेला भेट देते आणि त्यानंतर, सर्व गोष्टींचा व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर एनएएसी द्वारे श्रेणी देण्यात येते.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण एनएएसी या विषयावर भरपूर माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम आपण याचा पूर्ण फॉर्म बघितला आणि त्यानंतर एनएएसी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण या पोस्टमधून बघितलं. त्यानंतर आपण एनएएसी चे उद्दिष्टे या विषयावर देखील बरीच माहिती घेतली.

त्यानंतर नेमका एनएएसी मान्यता चा हेतू काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं, त्यानंतर एनएएसी मान्यतेचे फायदे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतले. त्यानंतर एनएएसी द्वारे मान्यता कशी मिळते हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. पोस्ट आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजवर परत भेट देत रहा.

FAQ

एनएएसी चा उद्देश्य काय आहे?

या संस्थेचा एक मात्र उद्देश्य म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयांच मूल्यांकन करून, त्यांना मान्यता देण.

एनएएसी द्वारे मूल्यांकन आणि मान्यता अनिवार्य आहे का?

हो,१९ जानेवारी २०१३ या वर्षाच्या अधिसूचनेने, सर्व उच्च शैक्षणिक संस्थेंना एनएएसी मूल्यांकन हे आवश्यक केलेलं आहे.

एनएएसी चे प्रमुख कोण आहेत?

एनएएसी ही एक राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे जी विविध मान्यता प्राप्त महाविद्यालयांना मूल्यांकन देण्याचं काम करत असते सध्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे अनिल सहस्रबुद्धे आहेत.

एनएएसी कुठले ग्रेड चांगले आहेत?

ही एक अशी संस्था आहे जी भारतातील विविध महाविद्यालयांचं प्रशिक्षण करून त्याला मूल्यांकन आणि मान्यता देत असते याच संस्थेद्वारे दिलं गेलेलं A+ ग्रेड हे कुठल्याही महाविद्यालया साठी अत्यंत मोठी उपलब्धी मानली जाते.

एनएएसी द्वारे काय काय तपासण्यात येत?

एनएएसी या संस्थेद्वारे महाविद्यालयातील विविध गोष्टी तपासल्या जातात जसं महाविद्यालयातील शिक्षण प्रणाली, या महाविद्यालयामध्ये शिकवणारे अध्यापक, महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण या सगळ्या गोष्टीची तपासणी करून महाविद्यालयाला मूल्यांकन देण्यात येतं.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top