एमएसडब्ल्यू फुल फॉर्म MSW Full Form In Marathi - Full Forms Marathi

एमएसडब्ल्यू फुल फॉर्म MSW Full Form In Marathi

MSW Full Form In Marathi एमएसडब्ल्यू चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सोशल वर्क असा होतो. मराठी भाषेत याला समाजकार्याची पदवी असे देखील म्हणतात. हा एक दोन वर्षाचा पदवी कोर्स आहे. सामाजिक कार्यामध्ये, करियर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी हा कोर्स निवडतात. या कोर्समध्ये विविध विषयांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षण दिल जातं.

MSW Full Form In Marathi

एमएसडब्ल्यू फुल फॉर्म MSW Full Form In Marathi

यामध्ये सामाजिक कार्याशी निगडित शिक्षण दिलं जातं. यामध्ये विविध विषय जसे सामाजिक कल्याण, मानवी वर्तन, संशोधन पद्धती इत्यादी बद्दल माहिती देण्यात येते. सामाजिक कार्यांना चालना देण्यासाठी सुरू केला गेलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. सामाजिक कार्य करताना गरजू लोकांना मदत करणे, आणि त्यांना, त्यांच्या समस्यातून मुक्त करून पुढे नेण्यास मदत करणे हे ह्या कोर्सचं मूळ कार्य आहे.

एमएसडब्ल्यू कोर्स काय आहे

एमएसडब्ल्यू म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क, ज्याला आपण मराठी भाषेत सामाजिक कार्याची पद देखील म्हणतो. सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेतात. सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी सुरू केलेला हा एक महत्त्वाचा मास्टर कोर्स आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनाच, समाजातल्या गरजू लोकांना मदत करणे आणि त्यांचे समस्या मुक्त करून त्यांना पुढे नेण्यास मदत करणे हे या कोर्स मुख्य कारण आहे. हाय दोन वर्षाचा मास्टर कोर्स आहे जो केल्यानंतर विद्यार्थ्याला मास्टर डिग्री प्राप्त होते.

ही मास्टर डिग्री मिळाल्यानंतर विद्यार्थी समाज कार्य करण्यास पात्र ठरतो. ही मास्टर डिग्री फक्त करियर करण्यासाठी नव्हे, तर समाज कार्य करताना, आपल्या हातून समाजात असलेल्या गरजू लोकांची सेवा होते, हे देखील एक पुण्याच काम आहे.

या कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष गुण असणं गरजेचं आहे. हे सगळे गुण विद्यार्थ्यांमध्ये असल्यास तो हा कोर्स सक्षमपणे उत्तीर्ण करण्यास समर्थ ठरतो. आणि ते गुण म्हणजे, निस्वार्थपणा, सहानभूती, संयम आणि कार्य नैतिकता. हा एक देणगीचा व्यवसाय असून, यामध्ये आजूबाजूच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम हे लोक सातत्याने करतात.

MSW full form in English | ANM full form in Marathi

MSW full form in Marathiसमाज कार्याची पदवी
MSW full form in EnglishMaster of Social Work
MSW साठी कोर्स पात्रतादोन वर्षाचा मास्टर डिग्री
MSW साठी फी1,50,000 रुपये

एमएसडब्ल्यू कोर्स पात्रता

एमएसडब्ल्यू म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क हा एक दोन वर्षाचा मास्टर डिग्री कोर्स आहे. यामध्ये समाजकार्य आणि गरजू लोकांचे मदत करू इच्छित असलेले विद्यार्थी हा कोर्स निवडतात. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही किमान पात्रता आहेत, सर्वप्रथम विद्यार्थी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन, सायन्स, हुमानिटी, सोशल सायन्स, किंवा मॅनेजमेंट मधून झालेलं असणं गरजेचं आहे.

ग्रॅज्युएशन बीएसडब्ल्यू मध्ये केल्यानंतर, विद्यार्थी एमएसडब्ल्यू हा कोर्स करू शकतो. भरपूर महाविद्यालयांमध्ये गुणांवरून प्रवेश देण्यात येतो, यामध्ये किमान गुण ५५% असणं गरजेचं आहे, परंतु काही महाविद्यालयांमध्ये सूट म्हणून, ४५% टक्क्यांवरती सुद्धा या कोर्समध्ये प्रवेश देण्यात येतो.

एमएसडब्ल्यू कोर्स प्रवेश प्रक्रिया

एमएसडब्ल्यू प्रवेश प्रक्रियेमध्ये, प्रवेश चाचणी, गटचर्चा, मी त्यानंतर विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेतल्या जाते. या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण विषयांचा अभ्यास करणे गरजेच आहे. आणि खाजगी महाविद्यालय त्यांच्या चाचणीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात.

एएमयु युनिव्हर्सिटी, हा कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट मानली जाते. या संस्था त्यांच्या खाजगी प्रवेश परीक्षा ठेवतात जे उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. या खाजगी परीक्षांमध्ये इंग्रजी, तर्क आणि सामान्य जागरूकता सारखे विषय समाविष्ट असतात.

विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला गट चर्चेसाठी आणि वैयक्तिक मुलाखातेसाठी बोलावलं जातं. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्याला खूप अभ्यास करणे गरजेच आहे. फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवणं आहे तर, प्रत्येक महत्त्वाच्या विषयाचा खोलवर अभ्यास करणे देखील गरजेच आहे.

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सामाजिक कार्यासाठी पात्र ठरतो, त्याचप्रमाणे समाजाच्या संपूर्ण विकासासाठी हे जबाबदार असतात. त्यासाठी त्याला प्रत्येक विषयातली खोलवर माहिती असणं गरजेचं असतं.

एमएसडब्ल्यू प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम

एम एस डब्ल्यू म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क, आणि हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे ज्यामध्ये विद्यार्थी समाजकार्य करून स्वतःचा करिअर इतका छान क्षेत्रात निवडू शकतो. हा कोर्स एक दोन वर्षाचा मास्टर डिग्री कोर्स आहे.

या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही खाजगी महाविद्यालय त्यांची प्रवेश परीक्षा ठेवतात. त्या प्रवेश परीक्षांमध्ये काही महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. ते महत्त्वाचे विषय म्हणजे इंग्रजी, सामान्य जागरूकता आणि तर्क असे आहेत.

  • इंग्रजी- या विषयांमध्ये सामान्य व्याकरण, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. गोंधळलेली वाक्य आणि या विषयातील सामान्य आणि गरजेचे तितकं सगळं विचारण्यात येत. यामध्ये विशिष्ट करून, इंग्रजी व्याकरणावर जास्त भर दिला जातो.
  • रिझनिंग- विद्यार्थ्याला तर्क लावून प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तयार केला जात. वर्गीकरण, कोडींग, संख्या मालिका, या सगळ्यांचा समावेश असतो.
  • सामान्य जागरूकता- यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान बद्दलचे प्रश्न विचारण्यात येतात. भूगोल, सामान्य ज्ञान, नागरिकशास्त्र, या विषयांमधून सुद्धा काही सामान्य प्रश्न विचारण्यात येतात.

एमएसडब्ल्यू कोर्स फीस

एम एस डब्ल्यू हा एक मास्टर डिग्री कोर्स आहे, ज्याचा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सोशल वर्क कसा आहे. हा एक दोन वर्षाचा पदवी कोर्स आहे. हा केल्यानंतर विद्यार्थी समाज कार्य करण्यात पात्र ठरतो. हा कोर्स करण्यासाठी भरपूर महाविद्यालय आहेत. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही महाविद्यालय खाजगी परीक्षा सुद्धा घेतात, त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये प्रवेश मिळतो. सरकारी महाविद्यालयांमध्ये जास्त फीस नसते, परंतु खाजगी महाविद्यालयांमध्ये या कोर्स साठी भरपूर फीस आहे. खाजगी महाविद्यालयांमध्ये दरवर्षी ४०-७० हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. आणि त्याच ठिकाणी सरकारी महाविद्यालयांमध्ये तोच खर्च ५-२० हजार मध्ये आटपतो.

निष्कर्ष

या पोस्टमध्ये आपण एमएसडब्ल्यू बद्दल भरपूर माहिती गोळा केली. सर्वप्रथम आपण एमएसडब्ल्यू चा पूर्ण फॉर्म बघितला, आणि त्याला आपण मराठीत समाजकार्याची पदवी असे देखील म्हणतो. त्यानंतर आपण या कोर्स बद्दल आणखी माहिती जाणून घेतली. हा कोर्स म्हणजे नेमका काय हे आपण खोलवर या पोस्ट मधून जाणून घेतलं.

त्यानंतर या पोस्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान पात्रता आपण या पोस्ट मधून बघितली, त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश प्रक्रिया सुद्धा आपण बघितल्या, त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितला.

हा कोर्स करण्यासाठी फीस बद्दल सुद्धा माहिती आपण या पोस्ट मधून जाणून घेतली. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच माहिती परत मिळवण्यासाठी आमच्या पेजवर परत भेट देत रहा.

FAQ

एमएसडब्ल्यू मध्ये करिअर काय आहे?

एमएसडब्ल्यू हे पद मिळवल्यानंतर विद्यार्थी, विविध ठिकाणी रोजगार मिळू शकतो जसं, थेरपीस्ट, क्लीनिकल सोशल वर्कर, सोशल वर्कर, हेल्थकेअर वर्कर. वैद्यकीय क्षेत्रात हा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी त्यांच्या करिअर करू शकतात.

एमएसडब्ल्यू हा चांगला कोर्स आहे का?

हो, हा एक चांगल्या कोर्सचा पर्याय आहे कारण, ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी, सरकार कल्याण विभागाकडून किंवा, स्वयंसेवी संस्थेकडून रोजगार मिळवू शकतात आणि त्यांचा आयुष्य छान रित्या जगू शकतात.

एमएसडब्ल्यू कोर्सचा उपयोग काय?

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थीला समाजाबद्दल जागरूकता येते. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला, सामाजिक कल्याण आणि सामाजिक कार्यपद्धती बद्दल माहिती देण्यात येते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करण्यासाठी पात्र ठरतो.

बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू म्हणजे काय?

बीएसडब्ल्यू म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि, एमएसडब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क असा होतो. बीएसडब्ल्यू हा एक तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे, आणि एमएसडब्ल्यू हा दोन वर्षाचा मास्टर कोर्स आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top