इएसआयसी फुल फॉर्म ESIC Full Form In Marathi - Full Forms Marathi

इएसआयसी फुल फॉर्म ESIC Full Form In Marathi

ESIC Full Form In Marathi इएसआयसी चा पूर्ण फॉर्म एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा आहे. ही एक भारतीय संस्था आहे जिचं सगळं कारभार भारत सरकार बघत असते. राज्य विमा कायद्या अंतर्गत १९४८ यावर्षी या संस्थेची स्थापना झाली होती. ही एक राज्य स्वयंचलित संस्था असून एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.

ESIC Full Form In Marathi

इएसआयसी फुल फॉर्म ESIC Full Form In Marathi

या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. या संस्थेचे एकूण २३ प्रादेशिक कार्यालय आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये २६ उप प्रादेशिक कार्यालय स्थित आहेत. देशभरात या संस्थेची एकूण ८०० पेक्षा जास्त स्थानिक कार्यालय उपस्थित आहेत.

हे सर्व कार्यालय योजनेची अंमलबजावणी करून जनसामान्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवत असतात.आर्थिक रित्या मागासलेल्या वर्गातील कर्मचाऱ्यांना ही संस्था मदत करण्यासाठी स्थापित करण्यात आली होती.इएसआयसी या नावाची एक विमा योजना सुरू करण्यात आली होती ही एक अशी विमा योजना आहे जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली गेलेली आहे.

यामध्ये जर कर्मचारी आजारी पडले किंवा अपघात मुळे आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे या योजनेने अशा कर्मचाऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे ही योजना म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा फायदा आहे. मातृत्वाच्या काळात आवश्यक असलेल्या सगळ्या सेवा आणि मदत या योजने द्वारे त्या मातेला करण्यात येते.

त्याचप्रमाणे मृत्यूसारख्या वेळेला या विमा योजनेची मदत होत असते. ही एक सर्वसमावेशिक विमा प्रणाली योजना आहे. आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा देण्यासाठी ही योजना स्थापित करण्यात आली होती.

ESIC full form in English |  ESIC full form in Marathi

ESIC full form in Marathiएम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन
ESIC full form in EnglishEmployees’ State Insurance Corporation
ESIC ची स्थापना कधी झाली24 फेब्रुवारी 1952
25,000 पगारासाठी ESIC लागू आहे कानाही

इएसआयसी द्वारे दिले जाणारे लाभ

इएसआयसी चा पूर्ण फॉर्म एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा आहे.ही एक राज्य स्वयंचलित संस्था असून एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. या द्वारे कर्मचाऱ्यांना भरपूर लाभ देण्यात येतात. यातले काही लाभ निम्नलिखित आहेत:

  • वैद्यकीय लाभ

विमाधारक व्यक्ती आणि त्याच प्रमाणे त्याच्या कुटुंबीयांना देखील या योजनेकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाते विमाधारक जेव्हा पात्र ठरतो त्या दिवसापासून ही सेवा त्याला देण्यात येते. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कमाल खर्चाची अट अशी नाही आहे म्हणजेच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला लागणारा वैद्यकीय या विमा पॉलिसी कडून देण्यात येतो.

ही विमा पॉलिसी फक्त त्या व्यक्तीला नाही तर त्याच्या कुटुंबीयांना देखील फायदेशीर ठरते. विमाधारक असलेला व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या जोडीदाराला देखील विमा सेवा पुरवली जाते आणि यासाठी निवृत्त व्यक्तींना ₹१२० चा टोकन दरवर्षी भरावा लागतो आणि त्यावरती संपूर्ण वैद्यकीय सेवा त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदाराला ही दिली जाते.

  • आजारपणाचा लाभ

इएसआयसी विमाधारक जर आजारी पडला तर त्या व्यक्तीला या योजनेद्वारे त्याच्या आजारपण च्या काळात ९१ दिवसांच्या पगाराचा ७०% इतका लाभ दिला जातो. याची अट इतकीच आहे की हा लाभ घेण्यासाठी विमाधारकाने आजारी झाल्याच्या सहा महिन्या अगोदर च्या काळात किमान ७८ दिवस काम केलेलं पाहिजे, ही अट जर पूर्ण होत नसेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला लाभ घेता येत नाही. आजारपणात देखील हे विमा पॉलिसी कर्मचाऱ्यांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.

  • विस्तारित आजार लाभ

जर विमाधारक कर्मचाऱ्याला दीर्घकालीन आजार झालेला असेल तर त्या वेळेला त्या व्यक्तीला २ वर्षांचा पगार ८०% एवढ्या लाभ मिळू शकतो आणि याला चा फायदा उचलत तो त्याच्या दीर्घकालीन आजारासाठी ते पैसे वापरू शकतो. ही अत्यंत आवश्यक अशी विमा पॉलिसी आहे जी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण कुठला आजार व्यक्तीला कधी होईल काही सांगता येत नाही त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यंत गरजेच आहे.

  • मातृत्व लाभ

जर विमाधारक गरोदर असेल तर त्या व्यक्तीला या संस्थेकडून किंवा या विमा पॉलिसी कडून मातृत्व लाभ देण्यात येतो. यामध्ये गरोदर महिलेला २६ आठवड्यांचा पूर्ण पगार देण्यात येतो. याच ठिकाणी वैद्यकीय सल्लेद्वारा एका महिन्याचा वेतन अजून घेण्यात येऊ शकतो. मातृत्व वेळेस किंवा जेव्हा विमाधारक गरोदर असते त्यावेळेस तिला भरपूर आरामाची गरज असते आणि त्यावेळी ती सुट्ट्यांवरती असते परंतु त्यावेळेस तिला पैशांचे अडचण येऊ नये यामुळे ही विमा योजना त्याची देखरेख करून काही लाभ अशा विमाधारकांना देत असते.

  • तात्पुरता अपंगत्व लाभ

जर काही कारणास्तव विमाधारकाला तात्पुरता अपंगत्व झाला तर त्यावेळेस या विमा योजना कडून त्या व्यक्तीला अपंगत्वासाठी लाभ देण्यात येतो. यामध्ये जोपर्यंत तो व्यक्ती अपंगत्व चाकू आहे तोपर्यंत त्याच्या वेतनाच्या एकूण ९०% दराने त्या व्यक्तीला लाभ देण्यात येतो म्हणजेच लाभार्थीला एकूण ९०% इतका लाभ मिळत असतो.

तात्पुरता अपंगत्व कुठल्याही अपघातामुळे उद्भवू शकतो आणि त्यावेळेस तो कर्मचारी काम करण्यास अपात्र ठरतो परंतु त्यावेळेला त्याच्यावर आर्थिक दुर्बळता येऊ नये यासाठी ही योजना त्याची मदत करत असते.

  • कायमस्वरूपी अपंगत्व लाभ

जर विमाधारकाला काही कारणास्तव कायमस्वरूपी अपंगत्व झाला असेल तर त्या व्यक्तीला या विमा पॉलिसी कडून अपंगत्व लाभ दिला जातो यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व लाभ हा एकूण वेतनाच्या ९०% दराने देण्यात येतो. जर कुठल्या व्यक्तीचा मोठा अपघात झालेला असेल आणि काही कारणास्तव किंवा अपघाताच्या परिणामामुळे त्याच्यावर कायमस्वरूपी अपंगत्व आला तर त्यावेळेस त्याच्यावर आर्थिक संकट उद्भवू नये यासाठी ही विमा पॉलिसी त्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबीयांची मदत करते आणि त्यांना त्याच्या वेतनाच्या ९०% दराने वेतन देण्यात येत.

  • आश्रित लाभ

जर विमाधारक कुठल्या व्यावसायिक धोके मुळे किंवा दुखापतीमुळे त्याची मृत्यू झाली असेल तर त्या व्यक्तीवर जे लोक अवलंबून होते त्या लोकांसाठी या विमा पॉलिसी कडून आश्रित लाभ असा देण्यात येतो आणि यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या एकूण पूर्ण वेतना पैकी ९०% दराने वेतन देण्यात येतं.

यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर त्याचे कुटुंबीय आर्थिक रित्या आश्रित होते तर त्या वेळेला त्या कुटुंबीयांना आणि त्या व्यक्तीच्या वरती जे लोक अश्रित होते त्या व्यक्तींना या पॉलिसी कडून लाभ देण्यात येतो.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण ईएसआईसी या विषयावर बरीच माहिती घेतली सर्वप्रथम ईएसआईसी चा पूर्ण फॉर्म काय आणि त्यासोबतच इएसआयसी म्हणजे काय हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं. याचा पूर्ण फॉर्म एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा असून ही एक विमा योजना आहे जी कर्मचाऱ्यांच्या विविध परिस्थितींमध्ये त्यांना लाभ देत असते.

त्यानंतर आपण या विमा पॉलिसी कडून मिळणारे विविध लाभ बघितले त्यामध्ये वैद्यकीय लाभ, आजारपणाचा लाभ, मातृत्व लाभ, आश्रित लाभ, विस्तारित आजार लाभ, वर्धित लाभ, तात्पुरता अपंगत्व लाभ, कायमस्वरूपी अपंगत्व लाभ इत्यादी बद्दल आपण भरपूर माहिती घेतली.

ही एक विमा पॉलिसी आहे जी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी घेणं अत्यंत गरजेच आहे. पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

ईएसआईसी साठी किती पगार गरजेचा आहे?

इएसआयसी चा पूर्ण फॉर्म एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा आहे.ईएसआईसी हा विमा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रतिमहिना एकूण २१,००० पेक्षा कमी पगार असणं गरजेचं आहे.

ईएसआईसी चे फायदे काय आहेत?

यामध्ये विमाधारकाला विविध फायदे देण्यात येतात जसं आश्रित लाभ, वैद्यकीय लाभ, तात्पुरता अपंगत्व, लाभ मातृत्व लाभ,इत्यादी.

वैद्यकीय रजेसाठी ईएसआयसी किती पैसे देतो?

वैद्यकीय लाभ मध्ये एकूण वेतनाच्या ९१ दिवसासाठी , वेतनाच्या ७०% लाभा विमाधारकांना देण्यात येतो.

ईएसआईसी चा पूर्ण फॉर्म काय आहे?

इएसआयसी चा पूर्ण फॉर्म एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा आहे.

इएसआयसी च उद्देश्य काय आहे?

समाजातील आर्थिक रितेश मागासलेल्या लोकांची आर्थिक मदत करणं आणि अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठीण प्रसंगी मदत करणं हे या पॉलिसीच उद्देश आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top