BSC Full Form In Marathi बीएससी चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ सायन्स असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत विज्ञान शाखेचा पदवीधर असं म्हणतो. विज्ञान क्षेत्रात आवड असलेले मुलं, बारावी नंतर या क्षेत्रात त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. बीएससी हे एक पदवी शिक्षण आहे. बारावी मध्ये विज्ञान क्षेत्रातील मुलं बीएससी मध्ये प्रवेश घेतात.

बीएससी फुल फॉर्म BSC Full Form In Marathi
बीएससी मध्ये आपण एक ठरवलेला विषय निवडतो आणि त्यामध्ये पुढचं शिक्षण पूर्ण करतो. यामध्ये विद्यार्थिनी निवडलेल्या विषयाचा थेअरी अभ्यास आणि प्रॅक्टिकल अभ्यास दोन्ही पूर्ण करतात. निवडलेल्या फक्त एकाच विषयांमध्ये पदवी घेणारे हे विद्यार्थी, त्या विषयाचा इतका खोलवर अभ्यास करतात, की त्या विषयामध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. बारावीनंतर बीएससी करणं हे भरपूर विद्यार्थ्यांसाठी एक उचित निर्णय ठरतो.
BSC म्हणजे काय | BSC full form in Marathi
बीएससी हे एक ग्रॅज्युएशन डिग्री असून, बारावीनंतर घेतलेला एक उचित निर्णय ठरतो. बीएससी मध्ये एका निवडलेल्या विषयात विद्यार्थी पारंगत होतो. विज्ञान विषयात रुची ठेवणारे विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतात. विज्ञान क्षेत्रातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतात.
अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या इंजीनियरिंग किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमात रुची नसेल किंवा, कमी मार्कांमुळे तिकडे प्रवेश मिळणार नसेल तर, भरपूर मुलं बीएससी हा पर्याय निवडतात.
बीएससी च शिक्षण खूप खोलवर असत. विद्यार्थ्याला एक विषय निवडायचा असतो आणि त्या विषयात पारंगतता मिळवावी लागते. यामध्ये विद्यार्थी अनेक विषय निवडू शकतो जसं, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इत्यादी.
बीएससी करत असलेल्या मुलांना कमी लेखलं जातं, किंवा अनेकदा बीएससी करणाऱ्या मुलांना समाजात कमी दर्जा देण्यात येतो. मात्र बीएससी करणारे विद्यार्थी, हे त्यांच्या निवडलेल्या विषयात इतकी पारंगतता मिळवतात, त्या विषयामध्ये कुणीही त्यांचा हात धरू शकत नाही. यामध्ये विद्यार्थी एकाच विषयाचा खोलवर अभ्यास करतात. यामध्ये विद्यार्थी थियरी सोबत प्रॅक्टिकल्स चा सुद्धा खोलवर अभ्यास करतात.
BSC Full Form in Marathi | BSC Full Form in English
BSC full form in Marathi | बॅचलर ऑफ सायन्स |
BSC full form in English | Bachelor of Science |
BSC साठी लागणारा वेळ | 3 वर्षे |
BSC साठी फी | 20,000 ते रु. 200000 प्रति वर्ष |
BSC मध्ये प्रवेश कसा मिळतो
बीएससी म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स, आणि यालाच आपण मराठी भाषेत विज्ञान शाखेचा पदवीधर असं देखील म्हणतो. बारावीनंतर निवडलेली एक योग्य शिक्षण प्रणाली आहे. विज्ञान क्षेत्रात कृषी असलेल्या मुलांना बारावीनंतर बीएससी मध्ये प्रवेश मिळतो. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी निम्नलिखित पात्रता गरजेच्या आहेत:
- विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असायला हवा.
- विद्यार्थ्यांचा बारावी विज्ञान क्षेत्रातून झालेला असल पाहिजे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि एक इतर कुठलाही विषय म्हणजेच जीवशास्त्र किंवा गणित या सर्वांमध्ये विद्यार्थ्याला ६०% मार्क असणं गरजेचं आहे.
- बारावीच्या निकालामध्ये मुख्य विषयांमध्ये ५०% पेक्षा जास्त मार्क आवश्यक आहेत. त्याच ठिकाणी काही महाविद्यालयांमध्ये ही टक्केवारी ६०% पर्यंत असते.
- बारावी मध्ये विज्ञान हा विषय असणं, बीएससी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेच आहे.
- बारावी मध्ये जे विषय विद्यार्थ्यांनी शिकले असतील त्या विषयांपैकीच एका विषयात त्याला बीएससी करता येऊ शकते. त्यापैकीच एक विषय निवडून तो त्या विषयात पदवी मिळवू शकतो.
- मार्क चांगले असल्यास चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. जर मार्क कमी आले तर अनेकदा न आवडते महाविद्यालयामध्ये, विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावा लागतो
- विद्यार्थ्यांनी, बारावी न करता सर तीन वर्षाचा एखादा डिप्लोमा कोर्स केला असेल, पोरी तू बीएससी या क्षेत्रात प्रवेश घेण्यास पात्र आहे.
- भरपूर महाविद्यालयांमध्ये, बीएससी मध्ये प्रवेश घेण्यासाठी, त्यांची खाजगी प्रवेश परीक्षा देखील असते, एखाद्या चांगल्या महाविद्यालयामधून बीएससी करण्यासाठी, विद्यार्थ्याला ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण गरजेच आहे.
- बीएससी मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नाहीये.
BSC कोणत्या विषयात करता येतो?
बीएससी हा एक डिग्री कोर्स आहे, ज्यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. बीएससी चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ सायन्स असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत विज्ञान शाखेचा पदवीधर असे देखील म्हणतो. विज्ञान या विषयात रुची ठेवणारे विद्यार्थी बारावीनंतर हा कोर्स निवडू शकतात. या कोर्समध्ये विद्यार्थी त्याच्या आवडत्या विषयात पारंगत मिळवू शकतो. निम्नलिखित काही विषयांमध्ये विद्यार्थी बीएससी हा कोर्स पूर्ण करू शकतो:
- भौतिकशास्त्र
- गणित
- प्राणीशास्त्र
- रसायनशास्त्र
- ॲनिमेशन
- मायक्रोबायोलॉजी
- मल्टीमीडिया
- फिजिकल सायन्स
- कृषी
- नरसिंग
- इलेक्ट्रॉनिक्स
- अनुवंश शास्त्र
- विज्ञान-तंत्रज्ञान
- फूड टेक्नॉलॉजी
- स्टॅटिस्टिक्स
- वनस्पती विज्ञान
- संगणक शास्त्र
वर दिलेल्या सर्व विषयांमध्ये, विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार, विषय निवडून त्यामध्ये पारंगत मिळवू शकतो. बारावी मध्ये असलेल्या विषय आणि विद्यार्थ्यांच्या रुचीनुसार, विद्यार्थी, त्याच्या आवडत्या विषयात हा कोर्स पूर्ण करू शकतो. यामध्ये प्रत्येक विषयाचा थियरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा अभ्यास खोलवर करावा लागतो.
BSC करण्यासाठी किती खर्च येतो?
बारावीनंतर विज्ञान क्षेत्रात आवड असणारे विद्यार्थी, या कोर्ससाठी ऍडमिशन घेतात. वैद्यकीय क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात रुची नसल्यास, किंवा क्रमांक कमी आल्यास, विद्यार्थी बीएससी हा पर्याय निवडतात. बीएससी हा कोर्स कमीत कमी खर्चात होणारा एक चांगला कोर्स आहे.
बीएससी करायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना, शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शासकीय महाविद्यालय मध्ये हा कोर्स केल्यानंतर, तीन किंवा चार वर्षांचा खर्च किमान 3000 रुपये इतका येईल. त्याच ठिकाणी जर खाजगी महाविद्यालयात जिथे शासनाशी संलग्न असेल आणि तिथे प्रवेश घेणार असाल तर तिथे तुम्हाला 25 हजार इतका खर्च येईल.
त्याच ठिकाणी मात्र खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर, हा कोर्स महाग पडण्याची शक्यता आहे. खाजगी महाविद्यालयांमध्ये एकाच वर्षाची फीस 50 हजार इतकी असते.
BSC करून नोकरीच्या काय संधी आहेत?
विद्यार्थ्याला बीएससी केल्यानंतर, न थांबता पुढचं शिक्षण म्हणजेच एमएससी करायला पाहिजे. किंवा इतर उच्च शिक्षण म्हणजेच एमबीए कडे सुद्धा वळायला पाहिजे. याचा मूलभूत कारण म्हणजे बीएससी केल्यानंतर मिळालेल्या नोकरी मध्ये, आजकालच्या युगात जगणं कठीण आहे.
बीएससी केल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी एमएससी केलं तर, त्याला प्राध्यापक होण्याची सुद्धा संधी आहे. मात्र प्राध्यापकचं पद मिळवण्यासाठी, विद्यार्थ्याला, नेट, सेट, गेट सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. विद्यार्थ्याचे बीएससी जर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा इलेक्ट्रॉनिक्स ची निगडित असेल, तर त्याला कुठल्याही कंपनीमध्ये सहज नोकरी मिळू शकते.
एका विषयामध्ये पदवी मिळवून विद्यार्थी त्या विषयात पारंगत, असा ठरतो. किंवा खाजगी ट्युशन सुद्धा विद्यार्थी सुरू करू शकतो. महाविद्यालयान व्यतिरिक्त, ट्युशन क्लासेस मध्ये सुद्धा आज-काल, विद्यार्थी व्यक्ती भरपूर कमवू शकतो.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण बीएससी बद्दल भरपूर माहिती गोळा केली. यामध्ये सर्वप्रथम आपण बीएससी चा संपूर्ण फॉर्म बघितला. त्यानंतर बीएससी म्हणजे नक्की काय हे आपण या पोस्ट मधून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर बीएससी साठी लागणारी गरजेची प्रात्रता सुद्धा आपण बघितली.
तसेच या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी काय प्रक्रिया असते हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. नेमक्या कुठल्या कुठल्या विषयात बीएससी करता येतं, हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर बीएससी हा कोर्स करण्यासाठी नेमका किती खर्च येतो, हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं.
बीएससी केल्यानंतर नोकरी कुठे आणि कशी मिळवावी हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघून घेतलं. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या साइटवर पुन्हा भेट देत राहा.
FAQ
करिअरच्या दृष्टिकोनाने बीएससी हा चांगला पर्याय आहे का?
बारावीनंतर विज्ञान या क्षेत्रात रुची ठेवणारे विद्यार्थी बीएससी हा कोर्स निवडतात. बीएससी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. दरवर्षी जवळपास ५० लाख विद्यार्थी हा कोर्स करतात.
बीएससी अभ्यासक्रमाचे विषय काय आहेत?
या अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांमध्ये, विद्यार्थी पारंगत मिळू शकतो, जसं, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, गणित, इत्यादी.
बीएससी चा कालावधी किती आहे?
बीएससी, हाय डिग्री कोर्स आहे, ज्यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. बीएससी कोर्स चा कालावधी ३ वर्षे इतका आहे.