PFMS Full Form In Marathi पीएफएमएस चा पूर्ण फॉर्म पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम असा होतो, आणि यालाच मराठीत आपण सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली असं म्हणतो. मूळतः पीएफएमएस एक सॉफ्टवेअर एप्लीकेशन आहे, ज्याचा कारभार, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स या पदावर असलेले व्यक्ती बघतात.

पीएफएमएस फुल फॉर्म PFMS Full Form In Marathi
सरकार द्वारे चालू केलेल्या काही योजनांबाबत आणि त्या संबंधित रकमेबाबत या सॉफ्टवेअर मध्ये माहिती ठेवली जाते. हे एप्लीकेशन, अत्यंत महत्त्वाचं असून, याचं मूळ उद्देश्य जनतेची सेवा असाच आहे. सरकारद्वारे दिलेला निधी, गरजू लोकांच्या आणि लाभार्थ्यांच्या खात्यात या ऑनलाइन सॉफ्टवेअर एप्लीकेशन द्वारे जमा केला जातो.
पी एफ एम एस हे एप्लीकेशन, भारताची आर्थिक व्यवस्था सुरळीत, चालवण्यासाठी डिझाईन केलं गेलं आहे. नियोजन आयोगाच्या अंतर्गत, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमएस ची सुरुवात २००८-०९ मध्ये सीपीएसएमएस या नावाला अनुसरून पायलेट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले होते. सरकारद्वारे सुरू केलेले उपक्रम व कार्यक्रम आणि
त्या संदर्भातली निधी, आणि त्या निधीचा गरजू लोकांपर्यंत वाटप या सगळ्या प्रक्रियेत हे ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे.
PFMS Full Form in Marathi | पीएफएमएस म्हणजे काय?
पीएफएमएस हे, भारताच्या आर्थिक व्यवस्थेला सुरळीत चालवण्यासाठी निर्माण केलेलं एक महत्त्वाचं एप्लीकेशन आहे. पीएफएमएस ला मराठीत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली सुद्धा म्हणतात.हे आपलिकेशन सरकारने सुरू केलेल्या काही योजने च्या, आणि त्या संदर्भातील निधींच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवतो.
हे आपलिकेशन कंट्रोल जनरल अकाउंटंट द्वारे सांभाळलं जातं, तथा या पदावर असलेली व्यक्ती, सरकार आणि जनतेमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवते. एमपीसीआय च्या आधारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मधून गरजू आणि लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी पाठवण्यात येतो.
भारतातल्या विविध बँकिंग प्रणालीला एकत्र आणणारा असा हा एक महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आहे. या सगळ्या सुविधांमुळे सामान्य माणूस ऑनलाइन पेमेंट करण्याचा लाभ घेऊ शकतो. ऑनलाइन पेमेंट
करायला सामान्य माणूस सक्षम झाला आहे. सरकारी बँकिंग आणि त्या संदर्भातील निधी वाटप या कडे हे ॲप्लिकेशन लक्ष ठेवत आणि त्याचबरोबर पारदर्शक बनवत. हे एक असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये जवळपास सर्व लोकांच्या बँकेच्या खात्याबाबत माहिती असते.पीएफएमएस ला अनुसरून देशातले निधी आयोग आणि अर्थ मंत्रालय एकत्र येऊन त्यांचं काम करतात.
PFMS Full Form in Marathi | PFMS Full Form in English
PFMS full form in Marathi | सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा |
PFMS full form in English | Public Financial Management System |
PFMS योजना कधी सुरू झाली | २००८-०९ |
CEO साठी सीईटी आवश्यक आहे | नाही |
पीएफएमएस कसे कार्य करते?
देशातील आर्थिक व्यवस्था ला सुरळीत चालवण्यासाठी सुरू केलेलं एक ऑनलाईन सॉफ्टवेअर अप्लिकेशन आहे. या एप्लीकेशन मध्ये जवळपास सर्व नागरिकांच्या बँक खात्याची माहिती असते. या सर्व माहिती आपणच आधार कार्ड मार्फत किंवा फॉर्म भरताना देत असतो.
सर्व नागरिकांची माहिती सॉफ्टवेअर मध्ये साठवायचं काम नीती आयोगाकडे असतं. सगळ्यांच्या बँक खाते ची माहिती घेण्यामागचं उद्देश्य इतकच असतं, की सरकारनी सुरू केलेल्या योजनेचा फायदा लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा व्हावं. सरकारने आयोजित केलेल्या विविध योजनेला अनुसरून त्या संदर्भातील निधी लाभार्थ्यांच्या
खात्यात जाण्यापूर्वी सर्वात आधी लाभार्थ्यांची यादी बनवण्यात येते, ज्यात सर्व नागरिकांच्या खात्याची माहिती दिली असते. या सगळ्या प्रक्रियेनंतर पीएफएमएस प्रणाली सर्व नागरिकांच्या खात्यात ठरलेली रक्कम पाठवण्याचं काम करत.
पीएफएमएस योजना कधी सुरू झाली होती?
मूळतः पीएफएमएस या योजनेची सुरुवात भारत सरकारने 2016 मध्ये केली होती. यामध्ये निधी आयोग आणि अर्थमंत्रालय एकत्र येऊन त्यांचा कार्य पार पाडतात. दोन्ही संस्था म्हणजेच अर्थमंत्रालय आणि निधी आयोग एकत्र आल्यामुळे दोन्ही संस्थांचे कार्य साधे सोपे झाले आहे.
सुरुवातीला पीएफएमएस च नाव सीपीएसएमएस म्हणजेच सेंट्रल प्लॅन स्कीम मॉनिटरिंग सिस्टम असं होतं. पी एफ एम एस ही योजना सुरू करण्याआधी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवायचे असल्यास डीबीटी ही प्रणाली सुरू होती. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर.
मुळात डीबीटी चा एकच उद्देश्य होता तो म्हणजे सरकारकडून आलेला निधी इतर कुणाच्याही हातात न जाता, किंवा त्याचा गैरवापर न होता, थेट तो लाभार्थ्यांपर्यंत सुरक्षितरीत्यास पोहोचावा. डीबीटी नंतर पीएफएमएस ही सिस्टीम आली आणि नागरिकांपर्यंत आवश्यक निधी पोहोचवण्याच काम सुरू झालं. पी एफ एम एस संदर्भातील सगळं कार्य सीजीए म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स, या पदावर कार्यरत असणारा व्यक्ती बघतो.
पीएफएमएस चे उद्दिष्टे
पी एफ एम एस एक असं ऑनलाईन आपलिकेशन आहे ज्यात खाजगी एवं सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांबरोबर प्रवेश केला जातो. हे एप्लीकेशन सरकारच्या आर्थिक योजनेंना समर्थन देण्यासाठी, त्याच बरोबर गरजू लोकांना किंवा लाभार्थ्यांना सरकारच्या योजनेंबाबत वास्तविक वेळ चित्र दाखवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. खर्चाचा मागोवा, अर्थसंकल्प आणि लेखा घेण्यासंदर्भात आणि याबाबत इतर माहिती घेण्यासाठी या सिस्टीमची रचना झाली आहे.
राज्य सरकार आणि राज्य सरकार द्वारा सुरू केले गेलेल्या एजन्सीज बाबत आणि त्यांच्या खर्च वाटपाबाबत सुद्धा ही संस्था नोंद ठेवते. सरकारी कामांसाठी दिले गेलेला निधी योग्य प्रमाणे आणि प्रभावीपणे वापरला जातोय की नाही ही नोंद ठेवण्यासाठी पी एफ एम एस हे खूप महत्त्वाचं साधन आहे. सरकारने दिलेला निधी कुठल्याच भ्रष्टाचारी च्या हातात न जाता गरजू आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जावो याची खात्री पीएफएमएस घेत.
पीएफएमएस चे फायदे कोणते आहेत?
पीएफएमएस एक ऑनलाईन सॉफ्टवेअर एप्लीकेशन आहे ज्याचा मूळ उद्देश्य सरकारकडून आलेला, विविध योजने मधला निधी लाभार्थ्यांपर्यंत सुरक्षित रित्या पोहोचवणे असा आहे. सरकारकडून आलेला निधी कुठल्याच भ्रष्टाचारीच्या हातात न लागता, सुरक्षितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्या निधीचा व्यवस्थित उपयोग व्हावा हाच प्राथमिक हेतू आहे. पीएफएमएस ला मराठीत, सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली असं म्हणतात. निम्नलिखित काही पीएफएमएस चे फायदे आहेत:
- डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर या योजनेमुळे सरकारकडून आलेला निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो आणि त्यामुळे भ्रष्टाचार कुठेतरी नाहीसा झालाय.
- शिष्यवृत्तीच्या निधी हस्तांतरणात आणि सरकारकडून सुरू केलेल्या विविध योजनेनमध्ये पीएफएमएस मुळे पारदर्शकता आली आहे.
- पी एफ एम एस मुळे नागरिकांच्या, खाजगी माहिती साठवून ठेवले जातात आणि त्यामुळे ती माहिती आपण अनेकदा वापरू शकतो आणि त्याचमुळे टायपिंग चा त्रास सुद्धा कमी झाला आहे.
- पी एफ एम एस एक ऑनलाइन सॉफ्टवेअर अप्लिकेशन असल्यामुळे कमी वेळात लाभार्थ्यांना जास्त पैशांचा वाटप करता येतो आणि त्याचबरोबर लाभार्थ्यांना निधीचा लाभ लवकर मिळतो.
निष्कर्ष
तर मित्रांनो वरील पोस्टमध्ये आपण पीएफएमएस बाबत बरीच माहिती घेतली, त्यात पी एफ एम एस चा पूर्ण फॉर्म त्याचबरोबर त्याला मराठीत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली असे म्हणतात. त्याचबरोबर पी एफ एम एस म्हणजे काय पी एफ एम एस त्याचं काम कसं करतो आणि या ॲप्लिकेशन चे फायदे काय काय आहेत हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. वरील पोस्ट मधली माहिती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी या साइटवर पुन्हा भेट देत रहा.
FAQ
पीएफएमएस म्हणजे काय?
पीएफएमएस एक ऑनलाइन सॉफ्टवेअर एप्लीकेशन असून याचं प्राथमिक कार्य म्हणजे सरकारकडून आलेला विविध योजनेसाठीचा निधी आणि त्याचा वाटप लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट पर्यंत पोहोचवणं असा आहे. मराठी मधे पीएफएमएस चा पूर्ण फॉर्म सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली असा आहे.
मी माझ्या पीएफएमएस व्यवहाराचा मागोवा कसा घेऊ शकतो?
बीए फेमस च्या हेल्प डेस्क ई-मेल वर संपर्क साधून किंवा त्यांच्या हेल्पलाइन नंबर वरून आपण आपल्या व्यवहाराचा मागवा घेऊ शकतो, त्यांचा क्रमांक १८०० ११८ १११ असा आहे.
पीएफएमएस मध्ये पीडी कसे मंजूर करावे?
पीडी वापरण्यात करता मंजुरी बटनावर फक्त दाबून सुद्धा विनंती मंजूर करण्यात येऊ शकते.
पी एफ एम एस सुरक्षित आहे की नाही?
पी एफ एम एस हे सुरक्षित आहे. भारतातल्या सर्व प्रमुख बँका पीएफएमएस सोबत कनेक्टेड आहेत. इलेक्ट्रॉनिक पेमेंट साठी सुद्धा पीएफएमएस हे खूप महत्त्वाच आहे.