NSS Full Form In Marathi एनएसएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम असा आहे. यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना असं देखील म्हणतो. भारत सरकारने १९६९ यावर्षी एनएसएस ची स्थापना केली होती. एनएसएसचं सर्व कारभार हे क्रीडा मंत्रालय आणि युवा कार्यक्रम हे बघत असतात. ही संस्था स्थापन करण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नवीन युवा पिढीमध्ये चारित्र्य आणि व्यक्तिमत्व निर्माण करणं असं होतं.

एनएसएस फुल फॉर्म NSS Full Form In Marathi
एनएसएस या संस्थे अंतर्गत ११वी आणि १२वी आणि या पुढील विद्यार्थ्यांना सरकारद्वारे आयोजित केलेले विविध कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. यामध्ये प्रवेश केल्यानंतर सरकारी उपक्रम सेवा द्वारे विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी ही विद्यार्थ्यांना मिळत असते.
या संस्थेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुण येतात जसं एकीने काम करणं, सर्वांगीण विकास, सामाजिक एकी, इत्यादी. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना काम करावं लागतं आणि याबरोबरच सर्व विद्यार्थी नवनवीन काही गोष्टी शिकत असतात.
सामुदायिक सेवेद्वारे विद्यार्थ्यांच्या हातून काही चांगलं काम घडावं समाजाची सेवाभावी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकास व्हावा हेच या संस्थेचं मुख्य काम आहे.
एनएसएस ची उद्दिष्टे
एनएसएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम असा आहे. यामध्ये सर्व युवा विद्यार्थ्यांना एकजुटीने काम करता येईल आणि त्याबरोबरच यांच्या हातून समाजाची सेवा होता येईल यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे निम्नलिखित आहेत:
- आपल्या भारत देशामध्ये विविध प्रांत, जाती, समुदाय, भाषा, वेशभूषा, आणि संस्कृती ची लोक राहत असतात आणि त्यामुळे, आपल्या देशाची विविधता आणि संस्कृती हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून हे अत्यंत गरजेच आहे.
- सामुदायिक काम करणे आणि विद्यार्थ्यांना सोपावलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे हे देखील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतं आणि यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
- त्यामुळे विद्यार्थ्याला राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व समजून येतं आणि यामुळेच विद्यार्थी सर्वांसोबत एकीने राहतो आणि वागतो.
- कुठलीही अडचण आल्यास एकत्रितपणे काम करणं किती गरजेचं आहे ही गोष्ट एनएसएस द्वारे विद्यार्थी व्यवस्थित शिकून जातो. कितीही कठीण परिस्थिती येऊ देत किंवा कुठलीही समस्या येऊ देत परंतु एकीने काम केलं तर सर्व गोष्टी वरती मात करता येऊ शकते हे एनएसएस द्वारे समजून येतं.
- समाजासाठी प्रत्येक स्तरावर कसं आणि कुठल्या प्रकारचं काम करायला पाहिजे हे देखील एनएसएस द्वारे विद्यार्थ्याला कळून येतं.
- तरुणांना समाजातल्या समस्या समजाव्या आणि त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन सक्षम झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावे यासाठी देखील एनएसएस चा मोठा हात आहे.
NSS full form in English | NSS full form in Marathi
NSS full form in Marathi | राष्ट्रीय सेवा योजना |
NSS full form in English | National Service Scheme |
NSS स्थापना केव्हा झाली | 24 सप्टेंबर 1969 |
एनएसएस चे फायदे
एनएसएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम असा आहे. या संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकास होतो. एन एस एस मुळे झालेले विद्यार्थ्यांना फायदे निम्नलिखित आहेत:
- यामुळे विद्यार्थ्यांचा एक कुशल नेता म्हणून जडणघडण होत असतं. त्यामध्ये सामाजिक कार्य आणि सामुदायिक कार्य कसा करावा याबद्दल प्रशिक्षण मिळत आणि त्याचबरोबर नेतृत्व कसं करायचं याचा देखील प्रशिक्षण या संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर मिळत असतं.
- एक कार्यक्षम प्रशासक म्हणून युवा पिढीला प्रोत्साहित केलं जातं. पुढे जाऊन देशाच्या कायद्या आणि कानून बद्दल किती सज्ज आणि जागरूक राहावं याबद्दल देखील यामध्ये प्रशिक्षण देण्यात येत
- एनएसएस मध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्याला भरपूर लोकांसोबत संवाद करावा लागतो आणि भेट घ्यावी लागते आणि यामुळेच त्यांचा सामाजिक संबंध देखील चांगले होतात आणि असे विद्यार्थी पुढे जाऊन खूप प्रगती करतात.
- भरपूर महाविद्यालयांमध्ये एनएसएस मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना काही वरचे मार्ग देखील देण्यात येतात जेणेकरून त्यांच्या अभ्यासक्रमात देखील फायदा होतो.
एनएसएस द्वारा प्रमुख उपक्रम
एनएसएस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. ही संस्था भारत सरकारद्वारे १९६९ यावर्षी स्थापित करण्यात आली होती. अत्यंत महत्त्वाचे संस्था आहे कारण यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
यामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी समाजासाठी काम करत असतात आणि त्याचबरोबर यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुन्हा येत असतात जसं प्रकरण नेतृत्व, एकीने काम करणं, व्यक्तिमत्व विकास, आणि एकंदरीत सर्वांगीण विकास अशा विद्यार्थ्यांचा होत असतो. एनएसएस द्वारे केलेले प्रमुख उपक्रम निम्नलिखित आहेत:
• नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प
राष्ट्रीय एकात्मता शिबिर हे दरवर्षी आयोजित केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं एनएसएस अंतर्गत असलेले एक शिबिर आहे. मला शिबिराचा कालावधी एनएसएस संस्थेद्वारे ७ दिवस असा ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही सरकारकडून केली जाते. यामधील प्रत्येक कॅम्पमध्ये २०० स्वयंसेवकांचा सहभाग असतो.
• साहसी उपक्रम
हे उपक्रम देखील एनएसएस द्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येतं आणि या उपक्रमांतर्गत एनएसएस मध्ये १५०० स्वयंसेवकांचा सहभाग असतो. आणि यामध्ये आपल्याला जाणून घ्यायला आनंद होईल की ५०% मुलींचा समावेश असतो. यामध्ये विविध साहसी उपक्रम जसं वॉटर राफ्टींग, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग चा समावेश असतो.
• एनएसएस प्रजासत्ताक दिन परेड शिबिर
हे एक अत्यंत नावाजलेलं असं शिबिर आहे. यामध्ये एनएसएस मधील २०० स्वयंसेवकांना निवडले जातं जे मार्चपासून सहभागी होत असतात. हा कार्यक्रम १-३१ जानेवारी या कालावधीमध्ये चालत असतो.
• राष्ट्रीय युवा महोत्सव
दरवर्षी एनएसएस या संस्थेद्वारे १-१६ जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये एनएसएस मधील १५०० स्वयंसेवकांचा सहभाग असतो.
एनएसएस कसे जॉईन कराव
एनएसएस म्हणजे नॅशनल सर्विस स्कीम. या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात आणि या मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि व्यक्तिमत्व विकास होत असतो. यामध्ये सरकारने आयोजित केलेले विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होतो आणि यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.
यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकत आहात त्या महाविद्यालयाच्या एनएसएस हेडला भेटणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून एनएसएस जॉइनिंग फॉर्म हा घेणेदेखील गरजेच आहे. हा फॉर्म भरून दिल्यानंतरच विद्यार्थ्याला एनएसएस या संस्थेमध्ये घेण्यात येतं.
मध्ये आपल्याला एनएसएस ची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेच आहे. यामध्ये विद्यार्थ्याला किमान दोन वर्ष २४० तास समाजासाठी काम करण्यामध्ये द्यावे लागतात आणि त्यानंतरच एनएसएसचा प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याला देण्यात येत जे त्याला आयुष्यात पुढे उपयोगी ठरतं.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एनएसएस या विषयावर भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम एनएसएस चा पूर्ण फॉर्म म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम हे आपण बघितलं आणि त्यानंतर एनएसएस म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतल. त्यानंतर एनएसएस ची उद्दिष्ट देखील आपण या पोस्ट मधून बघितले.
त्यानंतर एनएसएस मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना होणारे फायदे देखील आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर एनएसएस या संस्थेद्वारे राबवलेले विविध उपक्रम देखील आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर जर कुठल्या विद्यार्थ्याला एनएसएस मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा हे देखील आपण या पोस्ट मधून बघितल. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
राष्ट्रीय सेवा योजना कधी सुरू करण्यात आली?
एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना ही २४ सप्टेंबर १९६९ मध्ये सुरू करण्यात आली होती. एनएसएस या संस्थेची स्थापना तेव्हाचे शिक्षण मंत्री डॉ. व्ही.के. आर.व्ही. राव च्या हस्ते सुरू करण्यात आली होती.३७ विद्यापीठांमध्ये एनएसएस ची स्थापना करण्यात आली होती.
एनएसएसचे ब्रीदवाक्य काय आहे?
एनएसएस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम. आणि या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे “नॉट मी बट यु”.
एनएसएस कसा जॉईन करायचं?
तुमच्या महाविद्यालयामधील एनएसएस अध्यक्षांना भेटून आणि एनएसएस जॉइनिंग फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एनएसएस मध्ये प्रवेश घेता येतो.
एनएसएस चे प्रमुख घटक कोण आहेत
एनएसएस चा पूर्ण फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम असा होतो. यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना असं देखील म्हणतो. याचे ४ प्रमुख घटक आहेत, ते म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, समुदाय आणि कार्यक्रम.
एनएसएस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
एनएसएस दिन हा २४ सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो कारण, २४ सप्टेंबर १९६९ या रोजी एनएसएस ची स्थापना करण्यात आली होती यामुळे या तारखेला एनएसएस दिन साजरा करण्यात येतो.