NOC Full Form In Marathi एनओसी चा पूर्ण फॉर्म नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असा होतो. याला मराठी भाषेत ना हरकत प्रमाणपत्र असे देखील म्हणतात. एनओसी हाय कायदेशीर प्रमाणपत्र आहे. हे एक असा मानपत्र आहे, की तुम्हाला कुठल्याही कामात किंवा कुठल्याही प्रकल्पास किंवा इतर कुठल्याही बाबतीत काहीच हरकत नाहीये. एखादी गोष्टीसाठी हरकत नसण्यासाठीचं प्रमाणपत्र म्हणजे एनओसी.

एनओसी फुल फॉर्म NOC Full Form In Marathi
जी व्यक्ती एनओसी देत असते त्या व्यक्तीची त्या कामाबाबत कुठली हरकत नाही हे त्या प्रमाणपत्राचा उद्देश्य असतो. जर तुम्हाला एखाद्या संस्थे करून किंवा एखादी व्यक्तीकडून एनओसी प्रमाणपत्र हवा आहे तर तुम्ही त्यांच्याकडे तशी विनंती करू शकता आणि त्यांच्याकडून एनओसी प्रमाणपत्र घेण्याची विनंती करू शकता.
विनंती करताना तुम्हाला कुठल्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी एनओसी प्रमाणपत्र हवं आहे हे देखील तिथे लिहा. आणि एनसी देताना त्यामध्ये स्पष्टपणे तिथे लिहिलेलं असलं पाहिजे की एखाद्या कामास किंवा प्रकल्पास मला काहीच हरकत नाही आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला एनसी हवी आहे त्या व्यक्तीचा उल्लेख देखील त्यामध्ये असणं गरजेचं आहे.
उदाहरणार्थ याबद्दल समजायला गेलो तर समजा, तुम्ही एखादी मोटरसायकल विकत घेतली आहे आणि ती मोटरसायकल तुम्ही ईएमआय वर विकत घेतली आहे तर त्यावेळी ईएमआय चे सगळे हफ्ते आणि पैसे फेडल्यानंतर आणि मोटर सायकलची पूर्ण रक्कम कंपनीला दिल्यानंतर तुम्ही ज्या कंपनीमधून किंवा ज्या दुकानामधून ती मोटरसायकल घेतली होती त्या दुकानाकडून एनओसी मागू शकता.
ती एनओसी मागायचं कारण असतं की आता मी पूर्ण गाडीची रक्कम भरलेली आहे आणि आता इथून पुढे ही गाडी संपूर्णपणे माझी आहे आणि यावर फक्त माझा हक्क असेल यासाठी तुम्ही एनओसी मागू शकता.
एनओसी बनवण्याचे उद्दिष्ट काय आहे
एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. यालाच आपण मराठी मध्ये ना हरकत प्रमाणपत्र देखील म्हणतो. या प्रमाणपत्राचा अर्थ असा होतो की कुठल्याच गोष्टीबाबत किंवा कुठल्याच प्रकल्पाबाबत माझे काही हरकत नाही आहे. अशा प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्ही होणाऱ्या कामाबद्दल कुठलीच हरकत दाखवू शकत नाही.
एनओसी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावा आहे. उदाहरणार्थ समजू की जर आपण कुठलेही काम करत आहोत आणि त्या कामासोबत इतर कुठले व्यक्तीची किंवा इतर कुठल्या संस्थेची देखील संबंधिता आहे तर त्या ठिकाणी एनओसी हे सर्टिफिकेट घेणं अत्यंत गरजेचे आहे कारण यामध्ये तुम्ही करत असलेल्या कामांविषयी ते कुठलीही तक्रार करू शकतात त्यामुळे अशा वेळेस एनओसी घेणार अत्यंत गरजेचे आहे.
गरज पडल्यास हे अनुसया आपण न्यायालय पुढे देखील सादर करू शकतो. एनओसी या गोष्टीची शाश्वतता देते की तुम्ही जे काही काम करत आहात त्यासाठी समोरच्या व्यक्तीची काहीच हरकत नाही आहे आणि यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्यावर कुठलेच कानूनी कार्यवाही करू शकत नाही.
एन ओ सी घेना हे अत्यंत आवश्यक आहे कारण जर एनओसी नाही घेतली आणि समोरच्या व्यक्तीने आपल्या विरुद्ध तक्रार केली तर आपल्याकडे दाखवायला कुठलाच पुरावा उरत नाही म्हणून कुठल्याही प्रकल्प हातात घ्यायच्या आधी एनओसी घेणं अत्यंत गरजेचे आहे.
NOC full form in English | NOC full form in Marathi
NOC full form in Marathi | ना हरकत प्रमाणपत्र |
NOC full form in English | No Objection Certificate |
एनओसी कधी आवश्यक आहे
एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रमाणपत्र आहे किंवा पुरावा आहे जो कुठल्याही प्रकल्प सुरू करण्याआधी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हे सर्टिफिकेट घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रकल्पापासून किंवा कुठल्याच गोष्टीपासून काही हरकत नाही आहे याची शाश्वता मिळते. आणि यामुळे खाली दिलेल्या काही प्रसंगांवेळी एनओसी अत्यंत गरजेची आहे:
- कुठल्याही प्रकारचं वाहन खरेदी करताना
- तुमच्या कुठल्याही व्यवसायामध्ये नवीन गोष्टी आणताना आणि त्या वापरायला सुरुवात करताना एनओसी घेण्यात अत्यंत गरजेच आहे.
- व्यवसायामध्ये भागीदार जोडायचा असेल तर त्यावेळी देखील एनओसी देना अत्यंत गरजेच आहे.
- व्यवसायातील किंवा इतर कुठल्याही प्रकल्पातील नवीन कार्य सुरू करण्यासाठी एनओसी देणे गरजेच आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे आणि याबद्दल सर्व माहिती असणं गरजेचं आहे. एनओसीचा प्रमाणपत्र असल्यानंतर कुणीही तुमच्या विरोधात कानूनी कारवाही करू शकत नाही कारण एनओसी चा अर्थ असा होतो की समोरच्याने केलेल्या कुठल्याच प्रकल्प किंवा कार्यक्रमामुळे समोरच्या व्यक्तीची काहीच हरकत नाही आहे याची शाश्वतता समोरचा व्यक्ती देत असतो आणि म्हणून कुठल्याही प्रकल्प सुरू करण्याआधी एनओसी घेणे अत्यंत गरजेच आहे.
एनओसी कसे काढावे
एनओसी चा पूर्ण फॉर्म नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असा होतो आणि यालाच मराठी मध्ये ना हरकत प्रमाणपत्र देखील म्हणतात. कुठल्याही प्रकल्प किंवा कार्य सुरू करण्याआधी एनओसी घेणे अत्यंत गरजेचे आहे. एनओसी घेतल्यास कोणीही तुमच्यावर कानूनी कार्यवाही करू शकत नाही कारण एनओसी चा अर्थ होतो की तुम्ही जे काही प्रकल्प किंवा काम करत आहात त्याविषयी माझी काहीच हरकत नाही आहे.
एनओसी काढण्याच्या विविध पद्धती असू शकतात प्रत्येक गोष्टीसाठी एनओसी काढण्यासाठी विविध प्रक्रिया असू शकतात. पण वाहन घेताना एनओसी कसा काढायचा याबद्दल माहिती बघूया:
- सर्वप्रथम एनओसी चा अर्ज जमा करण्यासाठी, वाहनाच्या मालकाला आरटीओला स्वतः जाऊन भेट द्यावी लागते.
- त्या ठिकाणी CWM हा फॉर्म भरावा लागतो, आणि स्वतः जाऊन तिथे जमा करावा लागतो, जमा करताना सांगितलेली आणि आवश्यक असलेली सगळी कागदपत्र जमा करणे गरजेच आहे.
- एन ओ सी अर्ज भरण्यासाठी १०० रुपये इतका शुल्क गरजेचा आहे जो अर्ज सोबत भरावा लागतो.
- एकदा अर्ज जमा केल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून पोलीस ते वाहन जमा करून घेतील आणि त्यानंतर त्या वाहन वर कुठल्याही गुन्ह्याची नोंद आहे का याची पडताळणा करण्यात येईल.
- जर त्या वाहनावर कुठल्याच प्रकारचे थकबाकी किंवा गुन्ह्याची नोंद नसेल तर अशा वाहनांना क्लिअरिंग्स देण्यात येतो आणि एनओसी प्रमाणपत्र देण्यात येत.
- आणि त्यानंतर कामांच्या ३ दिवसाच्या आत एनओसी प्रमाणपत्र मालकाच्या हातात येतं.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एनओसी बद्दल भरपूर माहिती समजून घेतली. एनओसी म्हणजे तू ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आणि यालाच आपण मराठीमध्ये ना हरकत प्रमाणपत्र असे देखील म्हणतो. सर्वप्रथम आपण याचा पूर्ण फॉर्म आणि एनओसी म्हणजे नेमकं काय हे बघितलं.
त्यानंतर एनओसी बनवणे मागचे उद्दिष्ट काय आहे हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर एनओसी नावाचाही प्रमाणपत्र कधी आवश्यक असतं हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर एनओसी नावाचा हे महत्त्वाचं प्रमाणपत्र वाहनांसाठी कसं काढायचं हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. माहिती आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एनओसी हे कायदेशीर कागदपत्र आहे का?
हो, एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि यालाच आपण मराठीमध्ये ना हरकत प्रमाणपत्र असे देखील म्हणतो, आणि हे एक कायदेशीर कागदपत्र आहे.
एनओसी कधी आवश्यक असतं?
एनओसी चा पूर्ण फॉर्म नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असा आहे. आणि हे भरपूर ठिकाणी गरजेचं असतं जसं, भाडेकरू कडून, विजासाठी, बँकेतील कामकाजासाठी, कुठल्याही वाहन घेताना, शालेय अभ्यासक्रम सोडण्यासाठी.
एनओसीची वैधता काय आहे?
एन ओ सी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र फक्त ६ महिन्यांसाठी वैध असतं.
एनओसी मिळवला महत्त्वाच आहे का?
एन ओ सी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, आणि यालाच आपण मराठी मध्ये ना हरकत प्रमाणपत्र देखील म्हणतो. एनओसी मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्या विरोधात कोणी कुठलीही कानूनी कार्यवाही करू शकत नाही कारण एनओसीचा अर्थच असतो ना हरकत प्रमाणपत्र आणि या प्रमाणपत्रानुसार या गोष्टीची शाश्वतता मिळते की आपण सुरू केलेल्या प्रकल्पामुळे किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीला कुठलाच त्रास किंवा हरकत नाही आहे. फायदेशीर कुठल्याच अडचणीत येऊ नये यासाठी एनओसी काढणे अत्यंत गरजेच आहे.
एनओसी चा मराठी अर्थ काय?
मराठीमध्ये एनओसी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ला, “ना हरकत प्रमाणपत्र” म्हणतात.