NICU Full Form In Marathi एनआयसीयु चा पूर्ण फॉर्म निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट असा आहे. नवजात शिशु साठी असलेला हा एक अतिदक्षता विभाग आहे. नवजात बालकांसाठी हा एक विशेष विभाग असतो ज्यामध्ये नवजात शिशूंची विशेष काळजी घेण्यात येते आणि यामध्ये ग्रहण चिकित्सा विभाग म्हणून हे विभाग ओळखल जातं. जसं आयसीयू चा अर्थ अतिदक्षता विभाग असा होतो त्याचप्रमाणे एनआयसीयु चा अर्थ नवजात अर्भकांसाठी असलेला अतिदक्षता विभाग असा होतो.

एनआयसीयु फुल फॉर्म NICU Full Form In Marathi
जेव्हा एखादा रुग्ण त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतो म्हणजे जर त्याला वेळेवर योग्य तो उपचार आणि काळजी घेतली गेली नाही तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो अशा रुग्णाला आयसीयू या विभागांमध्ये ठेवलं जातं. जेव्हा एका नवजात लहानशा जीवाला बाहेरच वातावरण सहन होत नाही आणि त्यामुळे त्याच्या आजारांमध्ये वाढ होत असते तेव्हा त्या नाजूक जीवाला वाचवण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याला एनआयसीयु या विभागामध्ये ठेवण्यात येतं.
नवजात शिशूंसाठी बनवले गेलेले आयसीयू म्हणजेच एनआयसीयू असतं. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की नवजात बाळाला काही वेळासाठी काचेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तर त्या काचेमध्ये ठेवून म्हणजेच एनआयसीयु च्या पहिल्या स्टेजवर बाहेरच्या वातावरणा सोबत बाळाचा संपर्क येऊ नये आणि त्याला त्यामुळे काही त्रास होऊ नये यासाठी त्याला काचेमध्ये ठेवण्यात येतं.
बाळाची स्थिती नाजूक असल्यामुळे नाही तर नवजात शिशुला बाहेरच्या वातावरणामुळे काही त्रास होऊ नये आणि तू नुकताच या जगात आल्यामुळे बाहेरच्या वातावरणासोबत जुळवून घेणं कदाचित कठीण होत असल्यामुळे नवजात शिशूंना काही काळासाठी काचेच्या आत ठेवण्यात येत म्हणजेच त्यांना एनआयसीयू या विभागात ठेवण्यात येतं.
एन आय सी यु हा विभाग संपूर्णपणे काचेच्या आत बंद असलेला एक सुरक्षित असा विभाग असतो. त्यामध्ये त्या बाळाशी संबंधित कुठल्याही नातेवाईकांना आत जायची परवानगी देत नाहीत. फक्त डॉक्टर आणि काही वैद्यकीय अधिकारीच या विभागात जाऊ शकतात. डॉक्टरांनी जर परवानगी दिली तरच नातेवाईक त्या ठिकाणी जाऊ शकतात अन्यथा पेशंटला फक्त काचेतूनच बघता येतं.
NICU full form in English | NICU full form in Marathi
NICU full form in Marathi | निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट |
NICU full form in English | Neonatal Intensive Care Unit |
बाळाला NICU मध्ये का ठेवले आहे | जेव्हा बाळ लवकर जन्माला येतात, त्यांना आरोग्याच्या समस्या असतात किंवा जन्म कठीण असतो |
NICU किती वय आहे | नवजात जन्मापासून ते 28 दिवसांपर्यंत |
एनआयसीयु मधील मेडिकल उपकरणे
एनआयसीयु चा पूर्ण फॉर्म निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट असा आहे. नवजात शिशूंसाठी असलेलं हे एक अतिदक्षता विभाग आहे. या विभागामध्ये नवजात शिशु साठी विशेष काळजी घेण्यात येत असते आणि त्यासाठी या विभागांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि सुविधा दिल्या असतात.
या विभागामध्ये नवजात शिशुला बाहेरच्या वातावरणापासून एकदम लांब परंतु जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या आवश्यक गोष्टी आणि उपकरणांच्या मदतीने त्यांची सहाय्यता करण्यात येते. या विभागांमध्ये भरपूर उपकरण उपलब्ध असतात. यामधील काही उपकरणे निम्नलिखित आहेत:
- व्हेंटिलेटर- व्हेंटिलेटर हे अशा रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असतं1 ज्यांना श्वास घेण्यात त्रास होतोय. व्हेंटिलेटर च्या सहायताने अशे रुग्ण श्वास घेऊ शकतात. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर द्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. या गेल्या कोरोना काळात आपण ऐकलं असेल की भरपूर रुग्णांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती परंतु व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे भरपूर रुग्णांचा मृत्यू झाला, याचा एक मात्र कारण म्हणजे ऑक्सिजन पुरवठ्याची कमी. जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होतो आणि कोमा सारख्या परिस्थिती उद्भवतात त्यावेळेस व्हेंटिलेटर ची आवश्यकता असते.
- फीडिंग ट्यूब- काही रुग्णांना आयसीयू मध्ये हालचाल सुद्धा करू देत नाहीत आणि त्यामुळे अशे रुग्ण खायला प्यायला देखील असमर्थ असतात, त्यामुळे अशा रुग्णांना अन्न पोहोचवण्यासाठी फीडिंग ट्यूबचा वापर केला जातो. या ठिकाणी फीडिंग ट्यूब द्वारे, द्रव्य रुपी अन्न पेशंटला देण्यात येतं. ही फीडिंग ट्यूब रुग्णाच्या तोंडाद्वारे किंवा नाकाद्वारे आत टाकण्यात येते.
- हार्ट मॉनिटर- हाईट मॉनिटर हा परत एक अति महत्त्वाचा उपकरण आहे यावरून डॉक्टरांना पेशंटची अवस्था जाणून घ्यायला मदत होते. यामध्ये हार्ट बीट कशा चालू आहेत याचा आढावा डॉक्टरांना मिळतो.
- पल्स ऑक्सिमीटर- कोरोना काळामध्ये ओळखलेलं हे उपकरण म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. हे उपकरण बोटाला लावल्यावर शरीरातल्या ऑक्सिजन प्रमाणाचं तपास करून आपल्याला सांगायचं. एनआयसीयु विभागांमध्ये देखील हे उपकरण उपलब्ध असता आणि यामध्ये डिस्प्लेवर ते डॉक्टरांना दिसतं.
एनआयसीयु ची गरज कधी पडते
एनआयसीयु म्हणजे निओनेटल इंटेन्सिव केअर युनिट. नवजात शिशूंसाठी असलेलं अतिदक्षता विभाग म्हणजे एनआयसीयु असतं. यामध्ये नवजात बाळाचा संपर्क सरळ वातावरणासोबत येऊ नये आणि त्यामुळे त्याला काही त्रास होऊ नये यासाठी त्याला या अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात येतं.एनआयसीयु ची गरज निम्नलिखित कारणामुळे पडू शकते:
- नवजात शिशु जर काही प्रतिसाद देत नसेल तर त्याला या विभागामध्ये दाखल करण्यात येत
- नवजात शिशु जर नाजूक परिस्थितीमध्ये असेल तर त्याला या एनआयसीयू अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात येत.
- जर बालकाचे वजन प्रमाणापेक्षा खूप जास्त कमी असेल तर त्याला या विभागांमध्ये दाखल करायची गरज पडते
- नवजात शिशू चा जन्म होताना जर काही आघात झाला किंवा रक्त जास्त गेलं तर त्या वेळेला याला आईसोबत एनआयसीयु मध्ये ठेवण्यात येतं.
यामध्ये समजून घेणे गरजेचे आहे की जर जन्मावेळी बाळाचं वजन २.५ किलो पेक्षा कमी किंवा अगदीच १.८ किलोच्या कमी जर त्याचं वजन भरत असेल तर अशा बालकांना लेव्हल ३ एनआयसीयु विभागात ठेवण्यात येत.
त्यानंतर जर कुठल्या बालकाला श्वास घ्यायला त्रास होतोय तर अशा बाळांसाठी एनआयसीयु मध्ये मदत केली जाते. जर कुठल्या नवजात शिशुला कावीळ झाला तर उपचारासाठी त्या लहान जीवाला १० दिवस ते ३ आठवडे एनआयसीयु विभागामध्ये ठेवण्यात येऊ शकत.
हे नवजात शिशन साठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचं विभाग आहे ज्यामध्ये अशा लहान आणि नाजूक जीवांची काळजी घेण्यात येते आणि त्यांना त्रास होऊ नये याच्यावर देखील लक्ष ठेवता येतं.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एनआयसीयु या विषयावरती भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम एनआयसीयु म्हणजे काय आणि त्याचा पूर्ण फॉर्म काय होतो हे आपण या पोस्ट मधून बघितलं. एनआयसीयु चा पूर्ण फॉर्म निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट असा होतो.
नवजात शिशूंसाठी असलेला अतिदक्षता विभाग म्हणजे एनआयसीयु असतं. त्यानंतर एनआयसीयु या विभागांमध्ये कुठले वैद्यकीय उपकरण उपलब्ध आहेत हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. आणि या उपकरणांचा वापर कधी आणि कसा करायचा हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं, त्यानंतर एनआयसीयु ची गरज बाळांना कधी पडते किंवा पडू शकते हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एनआयसीयु चा पूर्ण फॉर्म काय आहे?
एनआयसीयु चा पूर्ण फॉर्म निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट असा होतो, आणि यालाच आपण मराठीमध्ये अर्भक अतिदक्षता विभाग असे देखील म्हणतो. हे नवजात शिशूंसाठी एक विशेष विभाग असतं ज्यामध्ये त्यांची विशेष काळजी घेण्यात येते.
एनआयसीयु मध्ये कुठली उपकरणे असतात?
हे एक अतिदक्षता विभाग असून यामध्ये रुग्णांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाचे उपकरण उपलब्ध असतात जसं हार्ट मॉनिटर, व्हेंटिलेटर, इसीजी मशीन, इत्यादी.
नवजात बाळाला एनआयसीयु मध्ये का ठेवलं जातं?
नवजात बाळाला बाहेरच्या वातावरणामुळे काही त्रास होऊ नये यासाठी त्यांना या विभागामध्ये ठेवण्यात येतं आणि त्याचबरोबर जर कुठल्या बाळाला आरोग्य संबंधित कुठला आजार आहे तर त्यावेळेस अशा बालकांना या विभागांमध्ये ठेवण्यात येतं. नवजात अतिदक्षता विभाग या ठिकाणी लहान बाळांची २४ तास काळजी घेतली जाते.
एनआयसीयु चे चार स्तर कोणते आहेत?
एनआयसीयु चे चार स्तर निम्नलिखित आहेत:
•स्तर I- नवजात नर्सरी
•स्तर II- विशेष काळजी नर्सरी
•स्तर III- नवजात अतिदक्षता विभाग
•स्तर IV- प्रादेशिक नवजात अतिदक्षता विभाग
५.एनआयसीयु मधील बाळ कसे खातात?
या विभागामध्ये असलेले बाळ जोपर्यंत चोखायला शिकत नाही तोपर्यंत त्यांना अन्न फीडिंग ट्यूब द्वारे देण्यात येत.