नीट फुल फॉर्म NEET Full Form In Marathi - Full Forms Marathi

नीट फुल फॉर्म NEET Full Form In Marathi

NEET Full Form In Marathi नीट चा पूर्ण फॉर्म, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असा होतो. नीट हे एका परीक्षेचं नाव आहे, जी एक पात्रता परीक्षा म्हणून ओळखली जाते. एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेकडून ही परीक्षा आयोजित करण्यात येते. नीट नावाची ही पात्रता परीक्षा देशभरात एकूण १३ भाषांमध्ये आयोजित करण्यात येते. वैद्यकीय क्षेत्रातले काही कोर्सेस मध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याकरता ही परीक्षा आयोजित करण्यात येते.

NEET Full Form In Marathi

नीट फुल फॉर्म NEET Full Form In Marathi

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांवरती त्यांना वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या आवडत्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येतो. ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी सर्वोत्तम परीक्षा म्हटली जाते. विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून त्यांची यादी करण्यात येते आणि त्यांचा प्रवेश जाहीर करण्यात येतो.

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात येण्याची उत्सुकता असते, काही विद्यार्थ्यांना दंतचिकित्सा मध्ये रुची असून त्यांना त्यात त्यांचं करिअर करायचं असतं. अशाच सगळ्या कोर्सेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा विद्यार्थी देतात.

भारतामध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालय असून त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी अत्यंत उत्सुक असतात त्याचप्रमाणे काही खाजगी महाविद्यालय देखील असतात जे हे कोर्सेस मुलांना उपलब्ध करून देतात. नीट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील डिग्री कोर्स साठी सर्वोत्तम परीक्षा आहे. भारतामध्ये भरपूर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी या परीक्षेचे अंक ग्राह्य धरले जातात.

नीट परीक्षा पात्रता

नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झाम, ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर देत असतात. तसंच ही परीक्षा देण्यासाठी कुठले विद्यार्थी पात्र आहेत याबद्दल माहिती निम्नलिखित आहे:

  • नीट परीक्षा देण्यासाठी बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी पात्र आहे तसेच विज्ञान क्षेत्रातून बारावी झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात, बारावी मध्ये, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र शिकलेल्या विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतो.
  • ही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा म्हणजे ज्या वर्षी परीक्षा देत आहात त्या वर्षीच्या ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत विद्यार्थीच वय १७ ते २५ इतकं असणं गरजेचं आहे. विद्यार्थी SC,ST,OBC, PWD या वर्गामधील असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा १७-३० वर्ष इतकी आहे.
  • प्रयत्नांच्या संख्येवरती या परीक्षेसाठी कुठलीच अट नाहीये. वयोमर्यादाच्या मानाने विद्यार्थी किती पण वेळा नीट ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षा साठी प्रयत्नांच्या संख्येवरती कुठलीही अट ठेवलेली नाही.
  • विद्यार्थी ला बारावी मध्ये, ५०% गुण असणं गरजेचं आहे आणि, जर विद्यार्थी SC,ST,OBC या वर्गामधील असेल तर त्याला बारावी मध्ये किमान ४०% मार्क असणं गरजेचं आहे.

नीट फुल फॉर्म NEET Full Form In Marathi

Neet full form in Marathiराष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा
Neet  full form in EnglishNational Eligibility cum Entrance Test
Neet  भारतात कधी सुरू झाले2013
Neet साठी फी3500 Rs

नीट नोंदणी प्रक्रिया

नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झाम, ही राष्ट्रीय स्तरावर होणारे वैद्यकीय क्षेत्र मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा देण्यासाठी अगोदर या परीक्षेसाठी नोंदणी करण गरजेच आहे. एन टी ए द्वारे आयोजित केलेली नीट परीक्षा ची नोंदणी प्रक्रिया निम्नलिखित आहे:

  • सर्वात आधी nta.nic.in, या वेबसाईटला भेट द्यावी
  • नीट च्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्यावं
  • लॉग इन केल्यानंतर, तिथे विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरून घ्याव्या, माहितीमध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नाव आणि शैक्षणिक तपाशीलता भरावी लागते.
  • त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करावे लागतात.
  • महत्वाचे कागद म्हणजेच
  • आधार क्रमांक
  • शिधापत्रिका क्रमांक
  • बँक खाते क्रमांक
  • आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
  • पारपत्र क्रमांक

वरील दिलेल्या सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नीट परीक्षेचा फॉर्म, सबमिट करावा लागतो आणि, त्यानंतर काही दिवसांनी त्या वेबसाईट कडून आपल्याला परीक्षेचा ठिकाण कळतं आणि त्यानुसार आपल्याला नीट परीक्षेसाठी त्या ठिकाणी जाऊन ती परीक्षा द्यावी लागते.

नीट फॉर्म शुल्क

नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कमेंट एक्झाम ही राष्ट्रीय स्तरावर होणारी एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यंत आवश्यक परीक्षा आहे. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. भरपूर विद्यार्थी खूप अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण करतात आणि त्यांना हवे असलेल्या महाविद्यालयात आणि आवडत्या कोर्समध्ये प्रवेश घेतात.

नीट ही परीक्षा एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी आयोजित करते. नीट परीक्षा देण्याकरता त्यासाठी नोंदणी करण्याआधी गरजेचा आहे आणि त्यानंतर आवश्यक शुल्क भरणे देखील गरजेचे आहे. नीट फॉर्म शुल्क बद्दल माहिती खालील प्रमाणे आहे:

  • जर विद्यार्थी सामान्य किंवा ओबीसी वर्गातील असेल, तर त्यांच्यासाठी या प्रवेश परीक्षेचा शुल्क म्हणजे १४००+ GST आणि सेवा कर
  • आणि जर विद्यार्थी SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर या वर्गांमधील असेल तर त्याच्यासाठी परीक्षेचा शुल्क म्हणजे ७५०+GST आणि सेवा कर.

नीट परीक्षेचे स्वरूप

नीट परीक्षा हे राष्ट्रीय स्तरावर होणारे एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. दरवर्षी एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजित करत असते. वैद्यकीय क्षेत्रात रुची ठेवणारे विद्यार्थी ही परीक्षा देतात. या परीक्षेच स्वरूप खालील प्रमाणे आहे:

  • नीट या प्रवेश परीक्षा मध्ये तीन विषयांचा समावेश असतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र.
  • जीवशास्त्र या विषयाचे दोन भाग असतात. ते दोन भाग म्हणजे प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र.
  • या परीक्षेमध्ये एकूण १८० प्रश्न दिलेले असतात.
  • यामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांवर प्रत्येकी, ४५ प्रश्न विचारण्यात येतात.
  • जीवशास्त्र हा विषय जास्त महत्त्वाचा असल्यास या विषयांमधून,९० प्रश्न विचारण्यात येतात, ज्यामध्ये,४५ प्रश्न प्राणी शास्त्रावर तर, ४५ प्रश्न वनस्पतीशास्त्र या विषयावर विचारण्यात येतात.
  • यामध्ये प्रत्येक प्रश्न एमसीक्यू प्रश्न असतो.
  • या परीक्षेचा वेळ तीन तास इतका असतो. तीन तासांमध्ये, १८० प्रश्न विद्यार्थ्याला सोडवायचे असतात.
  • प्रत्येक प्रश्नावर चार गुण मिळतात, प्रश्न बरोबर असल्यास चार गुण आणि, उत्तर चुकल्यास एक गुण वजा करण्यात येतो.
  • मीच नावाचे ही प्रवेश परीक्षा पेन आणि पेपर मोडमध्ये घेण्यात येते.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण नीट बद्दल सर्व माहिती जाणून घेतली. नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी का मेंटल एक्झाम. राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेली वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची परीक्षा म्हणजे नीट परीक्षा. सर्वप्रथम आपण नीट म्हणजे नेमकं काय हे जाणून घेतलं. त्यानंतर नीट प्रवेश परीक्षा देण्यास कुठले विद्यार्थी पात्र आहेत हे आपण या पोस्ट मधून बघितलं.

नीट परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया कुठल्या आणि आपण नोंदणी कशी करायची हे आपण जाणून घेतलं. नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर फॉर्म सबमिट करून शुल्क भरणे गरजेचे आहे. कुठल्या विद्यार्थ्याला किती शुल्क भरायचं हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं.

त्यानंतर नीट या परीक्षेचा स्वरूप काय आणि यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. या परीक्षेसाठी कुठले विषय गरज आहे आणि कुठल्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण या पोस्ट मधून बघण्याचा प्रयत्न केला. आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशीच माहिती घेण्यासाठी पुन्हा आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

नीट परीक्षा कशासाठी आहे?

नीट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेली एक प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजित करत असते. भारतातील वैद्यकीय महाविद्यालय तसेच दंत म वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा विद्यार्थी देत असतात. ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी MBBS आणि BDS या कोर्सेस मध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात.

नीट परीक्षेत कुठले विषय असतात?

नीट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेली डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. यामध्ये तीन विषयांचा समावेश असतो. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. या तीन विषयांचा अभ्यास करून विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र ठरतो.

नीट परीक्षा फक्त MBBS साठी आहे का?

नाही, नीट परीक्षा फक्त MBBS साठी मर्यादित नसून ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी, BDS,BAMS आणि BHMS या कोर्सेस मध्ये देखील प्रवेश घेऊ शकतो. या परीक्षेच्या गुणांवरती इतर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. भरपूर महाविद्यालय नीट परीक्षेच्या गुणांवरती विद्यार्थ्याला प्रवेश देत असतात.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top