NCC Full Form In Marathi एनसीसी चा पूर्ण फॉर्म म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्पस असा आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये असलेल्या लोकांसारखी शिस्त लावण्यासाठी आणि, देश सेवेसाठी आणि देशाबद्दल एक प्रेरणा उत्पन्न करण्यासाठी, एनसीसी नावाच्या या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

एनसीसी फुल फॉर्म NCC Full Form In Marathi
मराठी भाषेत एनसीसी चा पूर्ण फॉर्म बघितला तर तो राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल असा होतो. जर एखाद्या कठीण प्रसंगी देशाकडे लष्कराची कमी भासली तर, तेव्हा एनसीसी नावाच्या या दुसऱ्या फळीचा निर्माण आणि स्थापना करण्यात आली. एनसीसी नावाचा हे दल विविध शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची भरती करून घेतो आणि त्याप्रमाणे त्यांचे काम करून घेतो.
यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते. यामध्ये विद्यार्थ्यांना आर्मी सोबत निगडित काही शस्त्रांचा देखील वापर करायला किंवा शस्त्रांच ज्ञान दिलं जातं आणि, विद्यार्थ्यांना आर्मीच्या शिस्तीबद्दल देखील प्रशिक्षण देण्यात येत. यामध्ये भरती केलेल्या विद्यार्थ्यांना आणि युवा पिढीला शिस्त आणि अनुशासन बद्दल प्रशिक्षण देण्यात येतं.
आर्मी मध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात जे प्रशिक्षण दिले जातं ते प्रशिक्षण एनसीसी मध्ये भरती केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत. त्यामुळे आर्मीमध्ये भरती घेण्यासाठी एनसीसी च्या विद्यार्थ्याला प्राथमिकता देण्यात येते.
एनसीसी ची स्थापना व इतिहास
एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्पस यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दलाचा देखील म्हणतात. या संस्थेची स्थापना १६ एप्रिल १९४८ म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच, एनसीसी ची स्थापना करण्यात आली. एनसीसी ची स्थापना पं हृदयनाथ कुंजर, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
एनसीसी ची सुरुवात एप्रिल मध्ये झाली असून सुद्धा, एनसीसी स्थापना झाल्याच जाहीर १५ जुलै १९४८ ला करण्यात आलं. मूळ तह बघायला गेलं तर एनसीसी ला, १९६६ च्या आधीचा इतिहास आहे. याच प्रकारचं आणि असंच एकदल जर्मनीमध्ये सुरू करण्यात आलं होतं, आणि त्यामुळेच एनसीसी स्थापना जी प्रेरणा जागृत झाली.
आजच्या काळात एनसीसी च सर्वप्रथम उद्दिष्ट म्हणजे, स्वतंत्र नागरी सेवा बनणं असा आहे. दिल्लीमध्ये एनसीसी च्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली. आज सुद्धा एनसीसी च मुख्यालय दिल्ली येथेच स्थित आहे. एनसीसी च्या सुरुवातीच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूचे देखील यामध्ये खूप मोठ योगदान आहे.
पुढील काळामध्ये एनसीसी मध्ये वायुसेना दल देखील जोडण्यात आलं. या दलामध्ये विद्यार्थ्यांना सामील करून घेण्यासाठी दरवर्षी शाळा आणि महाविद्यालय भरपूर प्रयत्न करत असतात. यामध्ये भरती झालेले विद्यार्थी, जबाबदार आणि शिस्तबद्ध होतात.
NCC full form in English | NCC full form in Marathi
NCC full form in Marathi | नॅशनल कॅडेट कॉर्प्स |
NCC full form in English | National Cadet Corps |
NCC साठी लागणारा वेळ | 3 वर्ष |
NCC ची स्थापना कधी झाली | १५ जुलै १९४८ |
एनसीसी ची ब्रीद आणि ध्वज
एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्पस. भारतीय सैन्यासाठी एक खंबीर फळी म्हणून स्थापित केलेली ही संस्था म्हणजेच एनसीसी याचं सर्वप्रथम उद्दिष्ट म्हणजे भारतीय सैन्यासाठी मागची फळी बनवून खंबीरपणे उभा राहणार, आणि ज्यामध्ये एनसीसी अगदी सक्षमपणे यशस्वी झालेला आहे.
नवीन तरुण पिढीला सैन्याबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी ही संस्था सुरू केली गेली. सुरुवातीला एनसीसी ची टॅगलाईन “कर्तव्य, एकता आणि शिस्त”ही होती. परंतु काही वर्षानंतर या टायलाइन मध्ये बदल करण्यात आला आणि नवीन टॅगलाईन म्हणजेच “एक्य आणि शिस्त”ही टॅगलाईन ठेवण्यात आली.
एनसीसीचा ध्वज तीन रंगांचा बनवल्या गेला ज्यामध्ये, लाल, निळा आणि आकाशी या तीन रंगांचा समावेश आहे. या ध्वजाचा निर्माण १९५४ या वर्षामध्ये करण्यात आला. ध्वजाच्या अगदी मध्यभागी एनसीसी हा शब्द लिहिण्यात आला आहे. एका बाजूला कडेला, पानांनी किनार बनवण्यात आली आहे. एनसीसी या नावासोबतच ध्वजावरती, युनिटी अँड डिसिप्लिन म्हणजेच एकता आणि शिस्त, हे ब्रीद वाक्य देखील लिहिण्यात आलंय.
एनसीसी दिवस
एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्पस. यालाच आपण मराठी भाषेत राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल असं देखील म्हणतो. एनसीसी हे देशातील विविध शाळेत व महाविद्यालयांमध्ये, सुरू असलेलं एक उपकरण आहे. यामध्ये भरती झाल्यानंतर विद्यार्थी ला भारतीय सैन्या बद्दल आकर्षण आणि आर्मी सारखी शिस्त लावण्यासाठी यामध्ये विद्यार्थी भरती करण्यात येतात. एनसीसी चा दिवस देखील साजरा करण्यात येतो.
नोव्हेंबरच्या चौथ्या रविवारी प्रत्येक वर्षी एनसीसी चा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी एनसीसी अंतर्गत विविध छोटे मोठे उपक्रम आयोजित करण्यात येतात. या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आणि नवीन युवा पिढीमध्ये आर्मी बद्दल आदर आणि आर्मी किंवा भारतीय सैन्य दल जॉईन करण्यासाठी जनजागृती करण्यात येते.
एनसीसी जॉईन कशी करतात
एनसीसी नावाची ही संस्था भारतात येत असलेले विविध शाळेत व महाविद्यालयांमध्ये आधीपासूनच कार्यरत असते. आणि एनसीसी कॅडेट्स मध्ये सामील होण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या सीनियर सोबत किंवा शिक्षकांसोबत संपर्क साधून याबद्दल माहिती घेण गरजेच आहे.
एनसीसी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि कदाचित काही ठिकाणी एनसीसी मध्ये भरती करण्यासाठी शारीरिक चाचणी देखील तपासण्यात येते. जर तुम्ही असलेल्या महाविद्यालयामध्ये एनसीसी नसेल तर शेजारच्या महाविद्यालयात जिथे एनसीसी ही संस्था कार्यरत आहे तिथे देखील विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र असतो.
महाराष्ट्र मध्ये, बारावी कक्षा आधी ज्युनिअर विंग एनसीसी आणि, त्यानंतर पदवी अभ्यासक्रमामध्ये सीनियर विंग एनसीसी असं असतं. विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्याला योग्य त्या गटात प्रवेश मिळतो.
एनसीसी प्रमाणपत्राचे फायदे
एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्पस यालाच आपण मराठी मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दलस देखील म्हणतो. यामध्ये कार्य केल्यानंतर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळत. एनसीसीच्या प्रमाणपत्राचे फायदे निम्नलिखित आहेत:
- केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून, याचाच अर्थ नागरी सेवेत, एनसीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत.
- भारतीय सेना अकादमीमध्ये, एनसीसी प्रमाणपत्र धारकांसाठी, एक जागा राखीव ठेवण्यात येते
- नेव्ही दलामध्ये एनसीसी प्रमाणपत्र धारकांसाठी, ६ जागा राखीव ठेवण्यात येतात.
- एनसीसी प्रमाणपत्र धारकांसाठी, वायुदलामध्ये त्या विद्यार्थ्यांना १०% सवलत देण्यात येते
- एनसीसी प्रमाणपत्र धारकांना सीडीएस, म्हणजेच शॉर्ट सर्विस कमिशन, यामधील लेखी परीक्षा द्यावी लागत नाही.
वर दिलेले सर्व फायदे एनसीसी मध्ये भरती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असून हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम आहे.
Conclusion
या पोस्ट मधून आपण एनसीसी या संस्थेबद्दल भरपूर माहिती गोळा केली. यामध्ये सर्वप्रथम एनसीसी म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतलं. एनसीसी चा पूर्ण फॉर्म म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्पस असा आहे आणि यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दलशा देखील म्हणतात. त्यानंतर आपण थोडक्यात एनसीसी चा इतिहास आणि स्थापना याबद्दल देखील माहिती जाणून घेतली.
नंतर एनसीसी चे ब्रीद वाक्य आणि ध्वजाबद्दल देखील आपण संपूर्ण माहिती घेतली. ध्वजामध्ये असलेले रंग आणि, त्या ध्वजाचं स्वरूप देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर एनसीसी दिवस का आणि कधी साजरा करतो हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.
एनसीसी या दलामध्ये जॉईन कसं व्हायचं हे सुद्धा आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. आणि त्यानंतर एनसीसी प्रमाणपत्राचे फायदे देखील आपण या पोस्ट मधून जाणून घेतले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एनसीसी म्हणजे काय?
एनसीसी हे एक नागरी दल असून याचा पूर्ण फॉर्म नॅशनल कॅडेट कॉर्पस आहे आणि यालाच आपण मराठी भाषेत राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल असे देखील म्हणतो. यामध्ये भरती केलेले विद्यार्थ्यांना आर्मी बद्दल आकर्षण आणि त्याचबरोबर शिस्त लावणं या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.
एनसीसी मध्ये महिलांना प्रवेश असतो का?
हो, एनसीसी मध्ये महिला देखील भाग घेऊ शकतात आणि यासाठी, एनसीसी मध्ये महिला कॅडेट्स टीम देखील सुरू करण्यात येते.
एनसीसी दिवस कधी साजरा केला जातो?
प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी एनसीसी दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी एनसीसी अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. आणि विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये भरती होण्यासाठी जनजागृती केली जाते.