MSC Full Form In Marathi एमएससी चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सायन्स असा होतो. एम एस सी नावाचा हा कोर्स दोन वर्षांचा पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रम असून हा बऱ्याच विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये घेतला जातो. गणित, पर्यावरण विज्ञान, अन्न विज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवन विज्ञान, आणि अशा भरपूर विविध विशेष विज्ञान क्षेत्र मध्ये हा कोर्स घेण्यात येतो.

एमएससी फुल फॉर्म MSC Full Form In Marathi
विद्यार्थ्यांना यामध्ये त्यांच्या निवडलेल्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन देत असतो आणि त्यासोबतच त्या विषयाचा व्यवहारिक ज्ञानदेखील प्रदान करत असतो आणि त्यामुळे विद्यार्थी त्या एका ठराविक विषयांमध्ये पारंगत होत असतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीदरम्यान शिकलेले विषय त्यांच्यापैकीच एक विषयांमध्ये विद्यार्थी एम एस सी स्पेशलिजेशन करत असतात.
विज्ञान क्षेत्रातील ही एक अत्यंत चांगली अशी पदवी आहे. ही पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी एका ठराविक विषयाचा पारंगत होतो आणि त्यासोबतच यानंतर विद्यार्थी विविध महाविद्यालयांमध्ये त्या विषयाचा प्राध्यापक म्हणून देखील नोकरी करू शकतो. एम एस सी नंतर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यासोबतच एम एस सी एक पदवी उत्तर पदवी असल्यामुळे यामध्ये मिळणार वेतन देखील जास्त आहे.
एम एस सी पात्रता निकष
एम एस सी चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सायन्स असा होतो. या कोर्सचा कालावधी दोन वर्ष इतका आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- यामध्ये प्रवेश घेणारे उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठामधून विज्ञान क्षेत्रातील पदवी घेण गरजेचे आहे. विज्ञान क्षेत्रातील पदवीधर असणे विद्यार्थी गरजेच आहे.
- यामध्ये पात्र होण्यासाठी उमेदवाराने पदवीमध्ये किमान ५०-६०% इतके किंवा यापेक्षा जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे. यामध्ये संस्थेनुसार किंवा महाविद्यालयानुसार टक्केवारी मध्ये बदल होऊ शकतो.
- या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा ठेवलेली नाही आहे, त्याचप्रमाणे यामध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठलाही वयोगटातील उमेदवार प्रवेश घेऊ शकतो.
MSC full form in English | MSC full form in Marathi
MSC full form in Marathi | मास्टर ऑफ सायन्स |
MSC full form in English | Master of Science |
12वी नंतर MSC करू शकतो का | होय |
MSC पगार किती आहे | 20,000 रुपये ते 40,000 रुपये प्रति महिना |
एम एस सी पदवीधारकांच्या काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल
यामध्ये एम एस सी पदवी मिळवल्यानंतर काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल खालील प्रमाणे आहेत:
- शिक्षक: यामध्ये विद्यार्थी एम एस सी केल्यानंतर शिक्षकाच्या पदासाठी पात्र ठरतो, कारण त्या विद्यार्थ्याने एका ठराविक विषयात पारंगत घेतलेली असते आणि त्यामुळे त्याला शिक्षकाच पद सहज मिळू शकतं फक्त यासाठी उमेदवारांनी पदवी उत्तर शिक्षणानंतर बीएड करणं गरजेचं आहे.
- अन्न आणि औषध निरीक्षक: उत्पादन मानवी वापरासाठी सुरक्षित आहे की नाही हे सुनिश्चित करण्याचं काम अन्न आणि औषध निरीक्षक याचा असतो. यालाच गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक म्हणून देखील ओळखलं जातं. याचं काम उत्पादनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती अन्नाची आणि औषधांची तपासणी करणे आणि त्यासोबतच गुणवत्ता मालकांची पूर्तता करणं हे गरजेचं आहे.
- रसायनिक विश्लेषक: ही कशी पदवी आहे जी विविध पदार्थांच्या रसायनिक मेकअप वर डेटा गोळा करत असतो आणि त्याचा विश्लेषण करत असतो आणि विश्लेषण झाल्यानंतर वैज्ञानिक तांत्रिक आणि गणितीय पद्धत वापरून त्याचा प्रचार करत असतो. यालाच आपण केमिकल ऍनालिस्ट असे देखील म्हणतो. रसायनिक विश्लेषक व्यावसायिक प्रकाशांमध्ये त्यांनी केलेले विश्लेषणाचा परिणाम देखील लिहून प्रकाशित करू शकतात.
- बायो केमिस्ट: बायोकेमिस्ट हा एक विशेषज्ञ असतो जो विविध आजारांवर उपचार करण्यासाठी औषध तयार करण्याचं काम करतो. याचं काम दैनंदिनी कार्यांमध्ये औषध आणि आहार या गोष्टी जैविक कार्यावरती कसा परिणाम करतात याबद्दल जाणून घेतो आणि हे जाणून घेण्यासाठी एंजाइम डीएनए आणि इतर रसायनांचे विश्लेषण करत असतो.
- गणितज्ञ: ही कशी पदवी आहे जी सरकार अभियांत्रिका सामाजिक विज्ञान व्यवसाय आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रांमधील समस्यांसाठी गणिताचे सिद्धांत आणि पद्धती तयार करतो आणि त्यांना लागू करत असतो.
- संशोधन शास्त्रज्ञ: प्रयोगशाळा मधले प्रयोग आणि त्याचबरोबर संशोधन प्रकल्पांचा डेटा चे नियोजन करणे हे संशोधन शास्त्रज्ञाचा काम असतं आणि त्याचे विश्लेषण करणे हे देखील त्याचं काम असतं. ज्या विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला संशोधन शास्त्रज्ञ बनायचा आहे त्याच्यासाठी सरकारी प्रयोगशाळा पर्यावरण संस्था आणि यासारख्या इत्यादी ठिकाणी काम करण्याचा पर्याय तो निवडू शकतो. एम एस सी केल्यानंतर हे अत्यंत उत्तम नोकरीचा पर्याय आहे.
एम एस सी चे फायदे
एमएससी चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सायन्स असा होतो. एम एस सी नावाचा हा कोर्स दोन वर्षांचा पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रम आहे.विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीदरम्यान शिकलेले विषय त्यांच्यापैकीच एक विषयांमध्ये विद्यार्थी एम एस सी स्पेशलिजेशन करत असतात. विज्ञान क्षेत्रातील ही एक अत्यंत चांगली अशी पदवी आहे. एम एस सी करण्याचे फायदे निम्नलिखित आहेत:
- एम एस सी केल्यानंतर उमेदवाराला संशोधन संस्थेमध्ये अर्ज करण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर डीआरडीओ सारख्या केंद्र मध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी देखील मिळत असते. डीआरडीओ ही एक अत्यंत उत्कृष्ट संस्था आहे ज्यामध्ये करिअर करण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. संशोधन संस्थेमध्ये नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थी ला भरपूर बढत मिळते.
- एम एस सी पदवी अभ्यासक्रम केल्यानंतर एका ठराविक विषयांमध्ये उमेदवार तज्ञ बनतो आणि एका ठराविक विषयाची पारंगतता यामुळे विद्यार्थ्याला मिळत असते. त्यामुळे त्या विषयांमध्ये त्याचा हात कोणी नाही धरू शकत.
- • मोठ्या संस्थेमध्ये आणि कंपन्यांमध्ये देखील एमएससी केल्यानंतर नोकरीसाठी भरपूर चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
- एम एस सी ही पदवी उत्तर पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी यूपीएससी सीआयडी सीबीआय यासारख्या नोकऱ्यांसाठी देखील अर्ज करण्यास पात्र ठरतात. अशा स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते.
- एम एस सी केल्यानंतर उमेदवार इतर सरकारी नोकऱ्या आणि पदांसाठी देखील अर्ज करू शकतो.
- एमएससी अधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास व्यवस्थापक, अन्न आणि औषध निरीक्षक, लाभ वैद्यकीय उद्योग, कृषी संशोधन संस्था, ट्रेझरी मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, सरकारी रुग्णालय, बायोमेडिकल केमिस्ट, आर्थिक सल्लागार, औद्योगिक संशोधन विज्ञान, वन्यजीव आणि मासेमारी विभाग, संशोधन उद्योग, आणि बऱ्याच पदांवरती नोकरी मिळवू शकतो.
- एमएससी हा विज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत उत्तम पर्याय आहे ज्यांना चांगली नोकरी मिळवायची आहे ते एमएससी हा कोर्स बीएससी नंतर निवडत असतात.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण एम एस सी या विषयावरती बरीच माहिती समजून घेतली. सर्वप्रथम एम एस सी चा पूर्ण फॉर्म काय आणि एमएससी म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. एम एस सी चा पूर्ण फॉर्म मास्टर ऑफ सायन्स असा होतो आणि हा एक दोन वर्षाचा पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रम आहे.
त्यानंतर एम एस सी या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष काय हे देखील आपण या पोस्ट मधून बघितले. त्यानंतर एम एस सी पदवीधारकांच्या काही लोकप्रिय प्रोफाइल देखील आपण या पोस्ट मधून बघितल्या. आणि त्यानंतर एम एस सी केल्यानंतर चे फायदे देखील आपण या पोस्ट मधून बघितले. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
एम एस सी मध्ये किती विषय आहेत?
एम एस सी मध्ये अनेक विषयांमध्ये स्पेशलायझेशन हा विद्यार्थ्यांना देण्यात येतो. एम एस सी मध्ये दिले जाणारे काही लोकप्रिय स्पेशल म्हणजे गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरण विज्ञान, अन्न विज्ञान यासारख्या विषयांचा समावेश आहे.
भारतामध्ये एम एस सी किती वर्षाचा आहे?
एम एस सी म्हणजेच मास्टर ऑफ सायन्स हा एक दोन वर्षाचा पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी बीएससी म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी घेण आवश्यक आहे.
बीएससी शिवाय एमएससी करू शकतो का?
नाही, बीएससी केल्याशिवाय एमएससी साठी विद्यार्थी पात्र ठरत नाही. एम एस सी एक पदवी उत्तर पदवी आहे आणि हे मिळवण्यासाठी किमान पात्रता विद्यार्थी पदवीधर असणे गरजेच आहे.
एम एस सी मध्ये कुठल्या विषयाला जास्त वाव आहे?
एम एस सी या पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये गणित, सांख्यिकी, संगणक विज्ञान, यासारख्या विषयांना जास्त वाव आहे.
एम एस सी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे आहेत?
एम एस सी हा पदवी उत्तर पदवी कोर्स केल्यानंतर भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात जसं, प्राध्यापक, बायो केमिस्ट, संशोधन विशेषज्ञ, अन्न आणि औषध निरीक्षक, रसायनिक विशेषज्ञ, इत्यादी.