MBBS Full Form In Marathi MBBS या शब्दाचा अर्थ इंग्रजी मध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी असा आहे. तसेच मूळचा हा शब्द लॅटिन मध्ये असून एमबीबीएस चा लॅटिनमध्ये फुल फॉर्म मेडिसिन बॅक्लोरिअस बॅकलोरीयस किरूर्गी असा आहे. एमबीबीएस या शब्दात दोन मुख्य डोमेनचा उपयोग केला जातो एक म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि दुसरं म्हणजे बॅचलर ऑफ सर्जरी.

एमबीबीएस फुल फॉर्म MBBS Full Form In Marathi
या क्षेत्रामध्ये मेडिसिन म्हणजेच औषध व सर्जरी म्हणजेच शस्त्रक्रिया या दोघांचाही विस्तारित अभ्यास केला जातो. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे एकत्रित जोडण्यात आले आहे. नावाप्रमाणे यात दोन स्वतंत्र अंश आहेत तरी देखील त्यांना एकत्रित मानून सन्मानित केले जाते.
एमबीबीएस हा एक मेडिकल डिग्री कोर्स असून कोर्सच्या कालावधी गृहीत धरून भारतात पाच ते सहा वर्षांचा असतो. एमबीबीएस मध्ये समाविष्ट केलेल्या बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी या दोन्ही प्रथम व्यावसायिक व वैद्यकीय पदवी आहेत.
वैद्यकीय शाळांना आणि विद्यापीठांना औषध आणि शस्त्रक्रिया द्वारे ही पदवी प्रदान केली जाते. कोणत्याही व्यक्तीने एमबीबीएस डिग्री म्हणजेच ही पदवी धारण केल्यानंतर त्याला किंवा तिला डॉक्टर या पदवीने किंवा नावाने सन्मानित केले जाते.
MBBS म्हणजे काय?
एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय नामांकित पदवी आहे. ही पदवी मिळाल्यानंतर व्यक्तीला डॉक्टरचे स्थान दिले जाते. ही पदवीधना करून कोणताही व्यक्ती डॉक्टरच्या रूपात लोकांच्या सेवेसाठी तटस्थ उभा राहू शकते. जनतेच्या सेवेमध्ये आजार बरे करणे, आजारांचे निदान करणे, आजारांवर औषधी देणे, स्वास्थ्य चांगले ठेवणे या सर्वांचा समावेश होतो.
वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही डॉक्टर म्हणून ओळखली जाणारी एक उत्कृष्ट आणि उच्च दर्जाची पदवी असून या पदवीला फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात म्हणजेच परदेशातही देखील नोकरीच्या विपुल प्रमाणात संधी व मागणी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना औषध शास्त्र व शस्त्रक्रिया यासंबंधी संपूर्णपणे कारकीर्द घडविण्यासाठी एमबीबीएस ची डिग्री अतिशय उपयुक्त ठरते.
एमबीबीएस डिग्री घेण्यास आवश्यक ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे. एमबीबीएस ची व्याप्ती औषध आणि शस्त्रक्रियेच्या पारंपारिक क्षेत्रांच्या अधिक पलीकडे विस्तारली आहे. एमबीबीएस पदवीधर हे विविध क्षेत्रांमध्ये तज्ञ होऊ शकतात जसे की कार्डिओलॉजी, दरम्याटोलॉजी, न्यूरोलॉजी, अफथाल्मोलॉजी, ऑर्थोपेडिक इत्यादी सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये अतिरिक्त पदव्युत्तर शिक्षण आणि प्रशिक्षण घेता येऊ शकते. एमबीबीएस करून अनेक जण जनरल प्रॅक्टिशनर बनण्याची देखील निवड करतात.
MBBS full form in marathi | MBBS full form in English
MBBS full form in Marathi | बॅचलर ऑफ मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी |
MBBS full form in English | Bachelor of Medicine and Bachelor of Surgery |
MBBS साठी लागणारा वेळ | 5 ½ वर्षे |
MBBS साठी फी | 6,000 ते INR 3 कोटी. रु |
MBBS साठी लागणारी शैक्षणिक पात्रता:
एमबीबीएस पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याचे बारावी मध्ये सायन्स या शाखेतून उत्तीर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. त्याच सोबत 12 वी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. बारावी सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मुख्यतः हे तीन विषय घेऊन उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
काही विशेष जमाती जशा SC, ST आणि OBC कॅटेगिरी मध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स मध्ये किमान 40 टक्के गुण असणे महत्त्वाचे आहेत तसेच पीडब्ल्यूडी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांसाठी ही गुणवत्ता 45 टक्के इतकी असते. त्याच प्रकारे एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमासाठी एक उत्तम कॉलेज हवे असल्यास विद्यार्थ्याला NEET ही परीक्षा देणे बंधनकारक आहे व त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे खूप महत्त्वाचे आहे.
म्हणूनच विद्यार्थी एमबीबीएस मध्ये आवडीचे व चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी नीट परीक्षेत जास्तीत जास्त चांगले गुण मिळवण्याचा अधिक प्रयत्न करतात. NEET परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतातल्या कुठल्याही सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्राप्त होऊ शकतो. एमबीबीएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचे वय 17 ते 25 यामध्ये असणे आवश्यक आहे.
एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया:
भारत देशातील कुठल्याही एमबीबीएस महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रक्रिया अनुसरणे आवश्यक आहे:
- प्रवेशासाठी नोंदणी: इच्छुक उमेदवाराने वेब पोर्टल ला जाऊन लॉग इन करून अर्जदाराची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करून नोंदणी करणे प्रतिबंधित आहे.
- फॉर्म भरणे आणि कागदपत्रे लोड करणे: नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराने वैयक्तिक व शैक्षणिक तपशील सादर करून ऑनलाईन अर्ज भरावा. फॉर्म यशस्वीरित्यास भरल्यानंतर आवश्यक असलेले सर्व ओरिजनल कागदपत्रे अपलोड करावे.
- NEET चे अर्ज शुल्क भरपाई: एकदा अर्ज यशस्वीरित्यास भरल्यानंतर पुढील टप्प्यात अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक असते.
- पुष्टीकरण पृष्ठ डाऊनलोड करणे: अर्जाची फी भरल्यानंतर अर्जाची स्थिती कन्फर्म दाखवल्यास अर्जाची प्रिंट आउट तसेच पुष्टीकरण पृष्ठ घेणे.
- प्रवेश पत्र: सादरीकरणात आलेल्या तपशिलांच्या नोंदणी नुसार पात्र उमेदवारांना एमबीबीएस प्रवेश पत्रे पाठविली जातात.
- प्रवेश परीक्षा: उमेदवाराने प्रवेश परीक्षेसाठी हजेरी लावून प्रवेशा स योग्य असणारे गुण मिळवणे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीमध्ये नाव येईल.
- समुपदेशन: निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रमवारीनुसार समुपदेशन सत्रसाठी आमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांनी स्वतःकडे असलेल्या महाविद्यालयातून त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयाची निवड करणे महत्त्वाचे आहे. पसंतीच्या महाविद्यालयाची निवड झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना मागितलेले कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
एमबीबीएस प्रवेश परीक्षा
NEET ही परीक्षा देणे एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी बंधनकारक असते. नीट ची परीक्षा तीन विभागात विभागलेली असते ते म्हणजे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र. या परीक्षेमध्ये एकूण 180 प्रश्नांचा समावेश असतो ज्यामध्ये प्रत्येक योग्य उत्तरासाठी विद्यार्थ्याला चार गुण प्रदान केले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो.
या परीक्षेमध्ये एम सी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉइस क्वेश्चन यांचा समावेश असतो. ही परीक्षा संपूर्णपणे एम सी क्यू बेस्ड असते. या परीक्षेसाठी तिन्ही विषय मिळून एकंदरीत 720 गुण असतात. एमबीबीएस प्रवेश हा नीट परीक्षेच्या गुणांवर आधारित असतो.
प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात अकरावी आणि बारावीच्या संपूर्ण विज्ञान विषयांचा समावेश असतो. या परीक्षेत चे प्रश्नपत्रिका ही ११ वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असते. भाषेची निवड ही आपण परीक्षेचा अर्ज भरताना करू शकतो. नीट परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी व विद्यार्थ्याला आवडीचे एमबीबीएस महाविद्यालय मिळवण्यासाठी अत्यंत चिकाटीने अभ्यास करून खूप कष्ट घ्यावे लागतात.
या परीक्षेसाठी कॅटेगिरी वाईज वेगवेगळ्या कटऑफ असतो ज्या संबंधित ची कट ऑफ लिस्ट ही दरवर्षी ऑनलाईन उपलब्ध असते. परीक्षा देण्याचा कालावधी हा एकूण तीन तास इतका असतो. साधारणतः विद्यार्थ्याला अवघ्या तीन तासात एकूण 180 प्रश्न सोडवायचे असतात ज्याला एकंदरीत 720 गुण नेमलेले असतात.
निष्कर्ष | Conclusion
या लेखातून आपण एमबीबीएस या अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती घेतली. एमबीबीएस हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला डॉक्टरची पदवी दिली जाते. एमबीबीएस हे अतिशय उत्कृष्ट व उच्च दर्जाची पदवी आहे. एमबीबीएस चा इंग्रजीतील फुल फॉर्म बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी असा आहे.
तसेच मुख्यतः एमबीबीएस हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतील असून त्याचा लॅटिन मधील फुल फॉर्म हा मेडिसिने बॅक्लौरियस बॅक्लौरियस किरुर्गी असा आहे. एमबीबीएस च्या अभ्यासक्रमासाठी बंधनकारक असलेली प्रवेश परीक्षा म्हणजे NEET होय. नीट चा फुल फॉर्म नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट असा आहे.
विद्यार्थ्याला एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी या नीट च्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण येणे महत्त्वाचे आहे. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात मेडिसिन म्हणजेच औषध आणि सर्जरी म्हणजेच शस्त्रक्रिया या संबंधित संपूर्ण व विश्लेषित ज्ञान दिले जाते.
FAQ
एमबीबीएस चा फुल फॉर्म काय आहे?
एमबीबीएस चा फुल फॉर्म बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी असा आहे.
एमबीबीएस डॉक्टर आहे का?
होय एमबीबीएस ही एक डॉक्टरची पदवी असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास विद्यार्थ्याला नीट ची परीक्षा द्यावी लागते.
एमबीबीएस विद्यार्थ्यांना पगार मिळतो का?
होय एमबीबीएस पदवीधर झाले या विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट पगार मिळू शकतो. एमबीबीएस ही पदवी धारण केल्यानंतर फ्रेशर्स ना पगार अंदाजे तीन ते चार लाख वार्षिक इतका असू शकतो.
मी चार वर्षात एमबीबीएस पूर्ण करू शकतो का?
सध्याच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी किमान 5½ वर्ष लागतात ज्यामध्ये इंटरशिपचा देखील समावेश आहे.