IC Full Form In Marathi आय सी चा पूर्ण फॉर्म इंटिग्रेटेड सर्किट असा आहे. मराठीमध्ये आयसी च पूर्ण फॉर्म समेकित परिपथ असा होतो. आय सी हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच रेजिस्टर्स, डायोड्स, ट्रांजिस्टर्स, इत्यादी एकत्रित रूपाने एका छोट्या सिलिकॉनच्या चीप वरती बसवले जातात. आणि या चिप्स चा वापर विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो.

आयसी फुल फॉर्म IC Full Form In Marathi
विविध इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे टेलिव्हिजन, मोबाईल फोन, कम्प्युटर, इत्यादी. नवीन युगातील हे एक इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं फायदेशीर ठरलेला असा आविष्कार आहे. विविध मेमरी चिप्स आणि प्रोसेस मोबाईल फोन मध्ये वापरण्यात येतात. इंजिन मॅनेजमेंट मध्ये देखील आधुनिक वाहनांमध्ये हे एक महत्त्वाच कार्य करत. अत्यंत आवश्यक आणि, नवीन युगातील अत्यंत फायदेशीर ठरणारा असा इंटिग्रेटेड सर्किट हा आविष्कार आहे.
आईसी चा वापर काय आहे?
आई सी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट आणि या अविष्काराचा उपयोग विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये करण्यात येतो. याचे काही महत्त्वाचे आणि प्रमुख वापर निम्नलिखित आहेत:
- सर्वर आणि संगणक: संगणक मध्ये असलेले,
- मेमरी चिप्स, प्रोसेसर, मदरबोर्ड, आणि अशाच काही इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी आयसी चा वापर करण्यात येतो.
- घरगुती उपकरणे: घरामध्ये वापरले जाणारे उपकरण म्हणजेच वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह या सगळ्या गोष्टींमध्ये,
- कंट्रोल सिस्टीम म्हणून वापरले जातात
- मोबाईल फोन: मोबाईल फोन नावाच्या या अत्यंत आवश्यक अशा उपकरणांमध्ये विविध आयसी चा वापर करण्यात येतो. आज कालच्या धावपळीच्या युगात मोबाईल फोन हा अत्यंत आवश्यक आधुनिक यंत्र होऊन बसला आहे. यामध्ये संवाद आयसी मेमरी चिप्स प्रोसेसर अशा विविध आयसीचा वापर करण्यात येतो.
- वाहनांमध्ये: वाहनांमध्ये देखील आधुनिकता आल्यामुळे आयसी चा वापर, यामध्ये करण्यात येतो. इंजिन मॅनेजमेंट साठी देखील आयसीचा वापर करण्यात येतो. इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि त्याचबरोबर सेफ्टी सिस्टीम जसं इयर बॅग्स मध्ये देखील आयसी चा वापर करण्यात येतो.
- औद्योगिक उपकरण: औद्योगिक नियंत्रण सिस्टीम, रोबोटिक्स आणि सेन्सर्समध्ये आयसी चा वापर करण्यात येतो.
- वैज्ञानिक उपकरण: काही आधुनिक वैज्ञानिक उपकरणांमध्ये संवेदनशीलता आणि, अचूकता वाढवण्यासाठी आयसी चा वापर केला जातो.
IC full form in English | IC full form in Marathi
IC full form in Marathi | इंटिग्रेटेड सर्किट |
IC full form in English | Integrated Circuit |
यांनी प्रथम मोनोलिथिक आयसी चिपचा शोध लावला | फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरचे रॉबर्ट नॉयस |
IC ची स्थापना कधी झाली | 12 सप्टेंबर 1958 |
आयसी चे प्रकार
आई सी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. हे एक सिलिकॉन च छोटंसं चीप असतं ज्यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक घटक जसे रेजिस्टर, ट्रांजिस्टर इत्यादी एकत्रितपणे त्याची वरती बसवण्यात येतात. आजकालच्या युगामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आयसीचा वापर करण्यात येतो. आयसी चे काही महत्त्वाचे प्रकार निम्नलिखित आहेत:
•डिजिटल आयसी: डिजिटल आयसी मध्ये मुख्यतः तीन घटकांचा समावेश असतो ते तीन घटक म्हणजे, मायक्रोप्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर्स, आणि लॉजिक गेट्स.
~मायक्रोप्रोसेसर: कंप्यूटर किंवा इतर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस द ब्रेन सारखं काम करणारं, आणि विविध प्रकारचे गणना आणि कॅल्क्युलेशन करणार घटक म्हणजे मायक्रोप्रोसेसर आयसी.
~मायक्रो कंट्रोलर: विविध डिवाइस मध्ये कंट्रोल सिस्टीम म्हणून वापरले जाणारे, मेमरी, इनपुट आउटपुट पोर्ट्स आय सी म्हणून वापरले जातात.
~लॉजिक गेट्स (NOT, NAND, NOR,AND): या प्रकारचे आयसी बुलियन, लॉजिक ऑपरेशन्स मध्ये वापरण्यात येतात.
•अनालॉग आयसी: यामध्ये तीन घटकांचा समावेश असतो. ज्यामध्ये कम्पॅरेटर्स, ऑपरेशनल ऍम्प्लिफायर, आणि वोल्टेज रेग्युलेटर चा समावेश असतो.
~कम्पॅरेटर्स: या प्रकारचा आयसी दोन स्तरांची तुलना करण्यासाठी वापरण्यात येतो.
~वोल्टेज रेग्युलेटर: या प्रकारच्या आयसी वोल्टेज च्या पातळीला स्थिर ठेवण्यासाठी वापरले जातात.
~ऑपरेशनल ऍम्प्लिफायर: विविध अनलॉग कार्य, जसं, फिल्टरिंग सिग्नल अंपलिफिकेशन आणि असेच काही इतर महत्त्वाचे कार्य करायसाठी या आईची चा वापर करण्यात येतो.
•मिश्रित सिग्नल आयसी: त्यामध्ये डेटा कन्व्हर्टर्स काम महत्त्वाचं असतं. यामध्ये अनलॉक सिग्नल्स ला डिजिटल सिग्नल्स मध्ये आणि डिजिटल सिग्नल्सला अनलॉक सिग्नल्स मध्ये परिवर्तित करण्याचे कार्य हे करतं.
•मेमरी चिप्स: यामध्ये फ्लॅश मेमरी आणि रॅम (RAM) म्हणजेच रँडम एक्सेस मेमरी याचा समावेश असतो.
~फ्लॅश मेमरी: या प्रकारचे आयसी, डेटा स्टोरेज साठी वापरण्यात येतात, ज्यांची खासियत म्हणजे अशी की पावर बंद झाल्यानंतर पण हे डेटा चे जतन करून ठेवतात.
~रॅम (RAM): या प्रकारचे आयसी तात्पुरत्या डेटा स्टोरेजसाठी वापरले जातात जे कम्प्युटर आणि मोबाईल फोन मध्ये अत्यंत आवश्यक आहे.
आयसी चे फायदे
आई सी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. हे विविध इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे मोबाईल फोन आणि कम्प्युटर्स मध्ये वापरले जातात. आयसी चे काही फायदे निम्नलिखित आहेत:
- कार्यक्षमता: आय सी मध्ये घटकांमध्ये अंतर कमी असतो आणि त्यामुळे, सिग्नल्स वेगाने आणि कमी ऊर्जेत, प्रवाहित होतात आणि त्यामुळे, उपकरणाची कामगिरी सुधारते.
- ऊर्जा कार्यक्षमता: आय सी इतर इलेक्ट्रॉनिक घटकांच्या तुलनेमध्ये, कमी ऊर्जा वापरते, आणि ज्यामुळे, उपकरणाच्या बॅटरी लाईफ मध्ये सुधारणा होते.
- आकारमानात कमी: आय सी च्या वापर मुळे उपकरणाचा आकार अत्यंत लहान असतो कारण एका छोट्या सिलिकॉनच्या चिप वरती विविध इलेक्ट्रॉनिक घटक बसवण्यात येतात.
- उत्पादन खर्च कमी: आयसी च डिझाईन निश्चित झाल्या वरती, आयसीची उत्पादन प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे, आयसीचा उत्पादन सोप्प आणि मोठ्या प्रमाणावर करणं, अत्यंत स्वस्त आणि सोपं ठरतं.
- विश्वसनीयता: मेकॅनिकल पार्टसच्या तुलनेमध्ये आयसी मध्ये कमी नाश आणि घर्षण बघण्यात येतो आणि त्यामुळे, यांची विश्वसनीयता वाढते.
- उच्च गती: आय सी मध्ये घटकांमध्ये अंतर असतो आणि त्यामुळे, सिग्नल्स उच्च गतीने प्रवाहित होतात, आणि त्यामुळे उपकरणांच्या गतीमध्ये वाट बघण्यात येते.
आयसी चे नुकसान
आय सी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट, हे विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यात येत. याची भरपूर फायदे असले तरी काही नुकसान देखील आहेत. आयसी चे नुकसान निम्नलिखित आहेत:
- उष्णतेची निर्मिती: आय सी जेव्हा उच्च शक्तीवर काम करत असतात तेव्हा, त्यांच्याद्वारे उच्च प्रमाणात उष्णता बनवण्यात येते. आणि ही उष्णता निर्माण झाल्यामुळे, उपकरणाच्या आयुष्यावर देखील परिणाम होऊ शकतो
- दुरुस्तीची अशक्यता: जेव्हा ऐसी खराब होतो तेव्हा, तेव्हा बऱ्याचदा त्याची दुरुस्ती करणे हे शक्य नसतं आणि त्यामुळे नवीन आयसी लावावे लागतो जे की एखाद्याला खर्चात पाडू शकत. हे खर्चिक काम आहे
- •संवेदनशीलता: आई सी पर्यावरणाच्या घटकांना अत्यंत संवेदनशील असतो. पर्यावरणाचे घटक म्हणजेच उच्च तापमान, धूळ, ओलावा इत्यादी, या सर्व मुळे त्यांच्या कामांमध्ये बाधा येऊ शकते.
- •मर्यादित श्रेणीत्मकता: काही वैशिष्ट्य प्रकारचे आयसी जे काही विशेष कार्यासाठी तयार केले गेलेले आहेत, त्यांची कार्यक्षमता वाढवणं कठीण ठरू शकत. त्यांच्या कामगिरीत वाढ करण्यासाठी, नवीन आयसी डिझाईन करणं गरजेचं असत.
आयसीची भरपूर फायदे असले तरी काही नुकसान देखील आहेत, या सर्व नुकसानांचा नीट अभ्यास केल्यानंतरच आपण योग्य तो मार्ग निवडू शकतो.
Conclusion
या पोस्टमध्ये सर्वप्रथम आपण आयसी चा पूर्ण फॉर्म बघितला. आई सी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. हे विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यात येत. यामध्ये सर्वप्रथम आपण आयसी म्हणजे काय हे समजून घेतलं. त्यानंतर आयसी चा वापर काय आणि तो कसा करायचा हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.
आईस हिच्या विविध प्रकारांबद्दल देखील आपण या पोस्टमध्ये अभ्यास केला. याचे काही मुख्य प्रकार म्हणजे डिजिटल, ऍनालॉग, मेमरी चिप्स, इत्यादी. आई सी वापरण्याचे किंवा इलेक्ट्रॉनिक डिवाइस मध्ये आयसी असण्याचे फायदे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतले.
प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात त्याचप्रमाणे त्याचे नुकसान देखील असतात तसेच या पोस्टमध्ये आपण आयसी चे काही नुकसान देखील बघितले. पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
आयसी म्हणजे काय?
आय सी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक घटक एक छोटे सिलिकॉनची प्रवर एकत्रितपणे ठेवण्यात येतात आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये त्यांचा वापर करण्यात येतो. हे विविध इलेक्ट्रॉनिक घटक, सर्किटच्या कार्यासाठी आवश्यक असतात.
आयसी चे विविध प्रकार कुठले आहेत?
आय सी हे आधुनिक विश्वातला एक अत्यंत महत्त्वाचा आविष्कार असून याचे विविध प्रकार म्हणजे डिजिटल आयसी, अनलॉग आयसी, मेमरी चिप्स, मिश्रित आयसी, मायक्रोप्रोसेसर, इत्यादी आहेत.