जीएनएम फुल फॉर्म GNM Full Form In Marathi - Full Forms Marathi

जीएनएम फुल फॉर्म GNM Full Form In Marathi

GNM Full Form In Marathi जी एन एम चा पूर्ण फॉर्म General Nursing and Midwifery, असा आहे. जीएनएम ही एक पदवी आहे, जी नर्सिंग या क्षेत्रासोबत निगडित आहे. आपल्या सर्वांना भरपूर पदव्या माहिती असतात परंतु डॉक्टरांच्या क्षेत्रातल्या पदवी मात्र निम्म्याच ओळखीच्या असतात. परंतु ह्या क्षेत्रात सुद्धा भरपूर संधी आणि पदवी आहेत.

GNM Full Form In Marathi

जीएनएम फुल फॉर्म GNM Full Form In Marathi

मुळात ही पदवी नरसिंग सोबत निगडित असल्यास मुळात नरसिंग चा अर्थ, मातृत्व काळजी, मानसिक काळजी, पोस्ट ट्रॉमा काळजी, या सर्वांसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. मुळात नर्सिंग हा कोर्स सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. हा कोर्स विद्यार्थ्यांना, आवश्यक संवाद आजारी लोकांसोबत देवाण-घेवाण त्यांची काळजी घेणे हे सगळं शिकवतं. जी एन एम हा नर्सिंग क्षेत्रातला एक महत्त्वपूर्ण, सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे.

GNM म्हणजे काय?

जीएनएम हा नर्सिंग क्षेत्राशी निगडित एक खूप महत्त्वाचा कोर्स आहे. मुळात नरसिंग आणि हा कोर्स म्हणजे मातृत्व काळजी मानसिक काळजी पोस्ट ड्रामा काळजी हे सगळं शिकवणारा एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. हा कोर्स करत असलेले विद्यार्थी सर्वप्रथम आजारी लोकांसोबत संवाद व त्यांची काळजी घेण्यासाठी तत्पर असतात.

या कोर्स चा पहिला वर्ष म्हणजे, काही महत्त्वाच्या वैद्यकीय माहिती आणि, नरसिंगच्या काही मूलभूत गोष्टींबद्दल, विद्यार्थ्यांना सक्षम बनवतो. नरसिंग सोबत निगडित असलेल्या प्रत्येक माहितीबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे.

एमबीबीएस, बीडीएस, एमडी या क्षेत्रांसोबत तुलना करायला घेतली तर जीएनएम हा एक खूप सोपा अभ्यासक्रम असलेला कोर्स आहे. वैद्यकीय क्षेत्रात चूक असलेले विद्यार्थी हा कोर्स अगदी सहज आणि सक्षमपणे पूर्ण करू शकतात. जीएनएम ह्या कोर्समध्ये रुग्णालयात, उपचारादरम्यान कुठल्या गोष्टी वापराव्या लागतात याबद्दल शिक्षण दिलं जातं, इतर कुठले साहित्य जे उपचारा वेळी गरजेचे असतात त्यांच्या बद्दल सुद्धा माहिती दिली जाते. उपचार सुरू असताना मुख्य डॉक्टरांना मदत करण्यासाठी, जीएनएम हा कोर्स केलेले विद्यार्थी निवडले जातात.

GNM full form in marathi | GNM full form in English

GNM full form in Marathiजनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी
GNM full form in EnglishGeneral Nursing and Midwifery
GNM साठी लागणारा वेळ3.5 वर्ष
GNM शुल्क 10,000–5,00,000 च्या दरम्यान

Gnm course कालावधी

जीएनएम हा एक फार महत्त्वाचा आणि फायदेशीर कोर्स आहे जो मुळात नरसिंग या क्षेत्रासोबत निगडित आहे. या कोर्समध्ये आलेले विद्यार्थी सक्षमपणे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा पाया भक्कम करू शकतात. या कोर्सचा अभ्यासक्रम अत्यंत सोपा असून हा कोर्स सामान्य लोकांसोबत जुळवून घेणारा, आणि त्यांची काळजी घेणारा अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे.

जीएनएम या कोर्स चा कालावधी ३.५ वर्ष आहे. या ३.५ वर्षांमध्ये, मुळात ३ वर्ष, कोर्स आणि अभ्यासक्रम असतो, आणि त्यानंतर उरलेले ६ महिने, इंटर्नशिप घेतली जाते. या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याला रुग्णालयात नेऊन, त्याची इन्टर्नशिप प्रत्यक्षात घेतली जाते.

ही इंटर्नशिप अत्यंत महत्त्वाची असून, यामध्ये मुलं प्रत्यक्षात रुग्णालयात कसं वावरायचं, आजारी लोकांची काळजी कशी घ्यायची, आणि मुख्य डॉक्टरांना कशी मदत करायची याबद्दल शिक्षण दिलं जातं. जे विद्यार्थी ही इंटर्नशिप प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे पार पाडतात त्याच विद्यार्थ्यांना, जीएनएम या कोर्सच प्रशस्तीपत्र दिलं जातं, ज्या प्रशस्ती पत्राचा अर्थ असा होतो, की त्या विद्यार्थ्यानी जीएनएम हा कोर्स सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडलाय.

Gnm साठी प्रवेश परीक्षा

जीएनएम हा कोर्स ,३.५ वर्षाचा असून वैद्यकीय क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे, मुळात हा कोर्स नर्सिंग क्षेत्रात सोबत अधिक निगडित आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. मुळात या कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी एक पर्याय म्हणजे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार त्याला या कोर्ससाठी प्रवेश देण्यात येतो.

काही संस्था, अशा सुद्धा आहेत ज्या कुठल्याही भेदभाव न होता त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा ठेवतात आणि त्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश देतात. जी एन एम या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी निम्नलिखित काही प्रवेश परीक्षा आहेत ज्या दिल्यानंतर विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात:

•एम्स नर्सिंग प्रवेश परीक्षा

  • JIPMER नर्सिंग प्रवेश परीक्षा
  • PGIMER नर्सिंग
  • RUHS नर्सिंग प्रवेश परीक्षा
  • एमजीएम सीईटी नर्सिंग
  • इग्नू ओपननेट
  • BHU नर्सिंग प्रवेश परीक्षा

वर दिलेल्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी त्याच्या आवडत्या महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो.

Gnm अभ्यासक्रम

जीएनएम हा नर्सिंग क्षेत्रासोबत निगडित असलेला एक महत्त्वपूर्ण कोर्स आहे, जो केल्यानंतर विद्यार्थी रुग्णालयात काम करण्यासाठी तयार होतो. या कोर्सचा कालावधी ३.५ वर्ष असून यामध्ये तीन वर्ष कोर्स आणि त्यानंतर सहा महिने रुग्णालयात इंटरशिप म्हणून पूर्ण केलं जातं. जी एन एम कोर्स चा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम निम्नलिखित आहे:

  • शरीर शास्त्र आणि शरीर विज्ञान पोषण
  • आरोग्य शिक्षण
  • नरसिंग ची मूलभूत तत्व
  • समाजशास्त्र
  • नरसिंग मानशास्त्र
  • सामुदायिक आरोग्य
  • सूक्ष्मजीवशास्त्र
  • वैयक्तिक आणि पर्यावरण स्वच्छता

या कोर्समध्ये पहिल्या वर्षात वरील दिलेले, शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येतं.

या कोर्सच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम निम्नलिखित आहे:

  • औषध शास्त्र
  • वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग मानसोपचार
  • नरसिंग संसर्गजन्य रोग
  • डोळ्यांचे सार्वजनिक आरोग्य
  • मानसिक उपचार
  • कॉम्प्युटर शिक्षण

वर नेमलेल्या सगळ्या मुद्द्यांवर दुसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं.

या कोर्सच्या तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम निम्नलिखित आहे:

  • प्रगत समुदाय आरोग्य
  • बालरोगांसाठी पर्याय
  • स्त्रियांसाठी सरकारी आरोग्याचे केंद्र
  • व्यावसायिक ट्रेंड
  • प्रशासन आणि प्रभाग व्यवस्थापन
  • समायोजन आरोग्य अर्थशास्त्र

वर दिलेल्या सगळ्या विषयांवर तिसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. प्रत्येक विद्यार्थि हे तीन वर्ष सक्षम पणे उत्तीर्ण केल्यानंतर, सहा महिन्याच्या ट्रेनिंग साठी तयार होतो. यानंतर विद्यार्थ्यांना उरलेले सहा महिने रुग्णालयात इंटर्नशिप करावी लागते.

या इंटरशिपमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन सगळी माहिती आणि शिक्षण घ्यावं लागतं. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची काळजी घेणं,मुख्य डॉक्टरांना मदत करणं, आणि उपचारादरम्यान लागणाऱ्या, महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती घेण, हे सगळं या इंटर्नशिपचा मुख्य हेतू आहे.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण जीएनएम बद्दल भरपूर माहिती घेतली यामध्ये सर्वप्रथम आपण जीएनएम चा पूर्ण फॉर्म बघितला. जी एन एम हा एक महत्वपूर्ण सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे जून नर्सिंग या क्षेत्रासोबत निगडित आहे, त्यानंतर मुळात जीएनएम म्हणजे काय हे आपण या पोस्ट मधून बघितलं.

या कोर्सच्या कालावधी बद्दल सुद्धा आपण बघितलं, हा कोर्स ३.५ वर्षाचा असून यामध्ये, ३ वर्ष कोर्स चा अभ्यासक्रम आणि उरलेले सहा महिने रुग्णालयात इंटर्नशिप करून पूर्ण होतो. त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा सुद्धा आपण बघितल्या. त्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्याला या कोर्ससाठी प्रवेश मिळतो. त्यानंतर मुळात ह्या कोर्सचा अभ्यासक्रम काय, हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.

FAQ

महाराष्ट्रात जीएनएम या कोर्सची फीस किती आहे?

सरकारी महाविद्यालयांबद्दल बोलायचं झालं तर, जी एन एम हा कोर्सची साधारण फी २७,००० ते ३.५ लाख पर्यंत आहे. आणि तेच जर खाजगी महाविद्यालयांमध्ये बघितलं तर याच कोर्सची फीस १.५ लाख ते ३.८ लाख पर्यंत आहे.

जीएनएम पात्रता काय आहे?

जी एन एम हा एक महत्त्वपूर्ण सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे ज्याचा कालावधी ३.५ वर्ष इतका आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक पात्रता म्हणजे त्या विद्यार्थ्याचं, बारावी विज्ञान शाखेत पूर्ण झालेला असलं पाहिजे.

जीएनएम हे मुलींसाठी योग्य आहे का?

हो, मुलींसाठी हा कोर्स अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. वैद्यकीय क्षेत्रात पुढे जाऊ इच्छित असलेल्या विद्यार्थिनींना हा कोर्स एक महत्त्वाची संधी देत आणि त्याचबरोबर हा कोर्स मुली अगदी सहज पूर्ण करू शकतात.

जीएनएम मध्ये पहिल्या वर्षात कुठले विषय शिकवले जातात?

जीएनएम हा ३.५ वर्षाचा सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स आहे. यामध्ये पहिल्या वर्षात, नरसिंगच्या मूलभूत तत्त्वांबाबत शिक्षण देण्यात येत, त्यानंतर, शरीरशास्त्र, मानशास्त्र, समाजशास्त्र, आणि वैयक्तिक आणि पर्यावरण स्वच्छतेबद्दल शिक्षण देण्यात येत.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top