CWSN Full Form In Marathi सीडब्ल्यूएसएन चा पूर्ण फॉर्म चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स असा आहे.या मधे ज्या मुलांना विशेष सुविधांची गरज आहे, किंवा ते शारीरिकरित्यास अपंग आहेत, त्यांची नोंद ठेवली जाते. शारीरिकरित्यास अपंग असलेल्या मुलांना डीजी नावाच्या श्रेणीत ठेवण्यात येतं.

सीडब्ल्यूएसएन फुल फॉर्म CWSN Full Form In Marathi
दरवर्षी खाजगी शाळांमध्ये अशा मुलांसाठी २०% राखीव ठेवण्यात येते. आणि या जागा राखीव ठेवण्यामागे एकच हेतू असतो, तो म्हणजे या मुलांना बाकीच्या मुलांपेक्षा कमी समजण्यात येऊ नये म्हणून. हे करण्याचं एकंदरीत कारण इतकच आहे की शारीरिक रित्या कमी असलेल्या मुलांना बाकीच्या मुलांकडून कनिष्ठ वागणूक भेटण्यात येऊ नये.
इतर मुलांनी, आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी सुद्धा, अशा मुलांसोबत सामान्य रित्यास वागलं पाहिजे, जेणेकरून त्या मुलांना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं वाटायला नाही पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी वेगळी शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना तथा शारीरिकरित्यास
अपंग असलेल्या मुलांना शिकवणे सोप्प कार्य नाही त्यासाठी शिक्षकांकडून भरपूर मेहनत घ्यावी लागते. सर्व मुलांना शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे, मग जरी ते शारीरिकरित्यास अपंग असले तरी त्यांना समाजासोबत जुळवून घेणं आणि खांद्याला खांदा देऊन पुढे चालणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये किंवा इतर कुठल्याही व्यक्तीमध्ये अपंगत्व मूळ तह पाच श्रेणीमधलं असू शकतं
पहिलं म्हणजे बौद्धिक अपंगत्व, संज्ञानात्मक विकार, शारीरिक अपंगत्व मानसिक अपंगत्व आणि संवेदनाक्षम अपंगत्व. अशा मुलांना शिक्षण देणारे व शिकवण्यास इच्छुक असणारे शिक्षकांचं मजबूत चारित्र्य असलं पाहिजे, त्याचबरोबर ते भावनिक दृष्ट्या स्थिर असले पाहिजे, आणि आत्मविश्वास सोबत मेहनती सुद्धा असले पाहिजे.
Cwsn full form in Marathi
CWSN full form in Marathi | विशेष गरजा असलेली मुले |
CWSN full form in English | Children with Special Needs |
विशेष मुलांना हाताळायचं कसं | अगदी प्रेमाने |
एमबीएसाठी सीईटी आवश्यक आहे | नाही |
सीडब्ल्यूएसएन चा फुल फॉर्म?
सीडब्ल्यूएसएन चा फुल फॉर्म चिल्ड्रन विद स्पेशल नीड्स असा आहे. हे विशेष गरजा असलेल्या मुलांची आणि शारीरिकरित्यास अपंग असलेल्या मुलांची नोंद ठेवतो. कुठलाही विद्यार्थी किंवा बालक कुठल्याही प्रकारचा
विचार न करता चांगल्यातला चांगलं शिक्षण घेण्यास पात्र आहे आणि या शिक्षणामुळे प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणामुळे संख्यात्मक क्षमता सुधारण्याची आणि नवीन उद्योग शिकायची एक सुवर्ण संधी मिळते.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही रीत्यास अपंग असलेल्या मुलांना जास्त शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतंय कारण, आज शिक्षण क्षेत्रातील लोकांना समजलं आहे की त्यांना केवळ शारीरिकरित्यास च नव्हे तर मानसिक विकासातही योगदान द्यायचंय.
आजकाल शिक्षणासाठी भरपूर डिजिटल माध्यम व साधन कार्यरत आहेत. आजच्या काळात विशेष गरजा असलेल्या मुलांना प्रखरपणे शिक्षण घेण्याचा अधिकार, आणि त्यांचं अतिशय प्रभावीरीत्यास व्यवस्थापन करण्यात येत. मागच्या काही वर्षांमध्ये सरकारने अशा शिक्षकांचा शोध घेतलाय आणि त्यांची यादी केली आहे जे अशा दिव्यांग विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन, आणि त्याचबरोबर त्यांचं कौशल्य वाढवू शकतील.
सी डब्ल्यू एस एन ह्या व्यवस्थापनेची देखरेख करू शकतील सरकारला अशा शिक्षकांची अत्यंत गरज आहे. शिक्षकांचा प्राथमिक कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना
आवश्यक असलेले समर्थन देणे, आणि त्याचबरोबर त्यांना योग्य शिक्षण प्रदान करणे. जे विद्यार्थी शारीरिकरित्यास अपंग आहेत, त्यांना, बाकीच्या मुलांपासून वेगळं वाटू नये म्हणून सीडब्ल्यूएसएन सुरू करण्यात आले आहे. अशा विशेष गरजा असलेल्या मुलांना उत्तम शारीरिक बळ आणि अंगात लवचिकता मिळवण्यास मदत करतं आणि यामुळे अशी मुलं उत्तम जीवनशैली ठेवून आयुष्य उत्तमरीत्या जगू शकतात.
आजच्या शिक्षणाच्या जगात सर्वसमावेशक शिक्षण दिलं जातं आणि सी डब्ल्यू एस एन यामुळे उत्तमरीत्यास अशा मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेत. आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये भरपूर उत्तम संसाधन आणि उपकरण उपलब्ध असून अशा मुलांच्या सर्वांगीण विकासात मदत करत.
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ, व योजना सीडब्ल्यूएसएन राज्य शासने नुसार स्थानिक स्वराज्य संस्था त्याचप्रमाणे सगळ्या दिव्यांग बालकांना त्यांच्या १८ वर्ष पर्यंत त्यांना, संचारमुक्त वातावरणात आणि नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षणाची समान संधी देणे आणि त्यांचं प्राथमिक त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण पूर्ण व्हावं हे बंधनकारक आहे. यामुळे समावेशित शिक्षण, या आयोजनेत दिव्यांग मुलांना शालेय परिसरात त्याचबरोबर त्यांच्या दैनंदिनी आयुष्यात सामाजिक, शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिकरित्यास प्रबळ बनवणं हे अत्यंत गरजेच आहे.
पूर्व कौशल्य विकासासाठी शिक्षणाची व त्वरित हस्तक्षेपाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (वयोगट ३-६)-
मदतनीस भत्ता: अशी मुलं किंवा विद्यार्थी ज्यांना शस्त्रक्रिया झालंय आणि त्यांना थेरपीची गरज आहे किंवा शरीराच्या खालचे दोन्ही अंग नसलेले मुलं त्याचबरोबर सवंगडी नसलेल्या दृष्टीदोष असलेल्या बालकांना अंगणवाडीमध्ये जाण्या येण्यासाठी दर महिन्यात १५० रुपये १० महिने दिले जातील म्हणजेच १५०० रुपये मदतनीस भत्ता, अशा विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
अशा मुलांची किंवा विद्यार्थ्यांची अंगणवाडीमध्ये ७५% उपस्थिती आवश्यक आहे आणि अशा मुलांना अंगणवाडीत आणण्यासाठी व नेण्यासाठी शालेय वार्ड, व्यवस्थापन शिक्षण समितीच्या शिफारसीने स्वयंसेवक सुद्धा देण्यात येतील.
परिवहन भत्ता/ प्रवास भत्ता: ज्या गावांमध्ये शाळा उपलब्ध नाहीये, किंवा ज्या मुलांना शहरी भागात त्यांच्या शिक्षणासाठी ये जा करावी लागते, किंवा त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचा अंतर ३ किलोमीटर पेक्षा जास्त आहे अशा मुलांना प्रवास भत्ता देण्यात यावं असं नमूद आहे.
तसेच ज्या मुलांना थेरेपी चालू आहे त्या मुलांसाठी सुद्धा थेरपी सेंटर पर्यंत ये जा ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता ही सेवा नमूद आहे ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला प्रत्येक महिना १५० प्रमाणे १० महिने देण्यात येतील म्हणजेच १५०० रुपये. आणि अशा मुलांची उपस्थिती ७५% असणं गरजेचं आहे.
दिव्यांग मुलींना प्रोत्साहन भत्ता: तीन ते सहा वयोगटातील विशेष गरज असणाऱ्या मुलींसाठी आणि शिक्षणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि नियमित अंगणवाडीत येण्यासाठी मुलींना भत्ता देण्यात येत आहे. दर महिने २०० रुपये प्रमाणे १० महिन्यात २००० रुपये निधी देण्यात येणार आहे. आणि अशा मुलींचे उपस्थिती ४०% आवश्यक आहे
१ली ते ५वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्यांना विकासात्मक विलंबता आहे.
मदतनीस भत्ता: अशी मुलं ज्यांना थेरपीची गरज आहे आणि, शरीराचे खालचे दोन्ही अंग नसून दृष्टीदोष आहे अशा मुलांना मदतीनेच भत्ता देणे नमूद केला आहे ज्यामध्ये प्रतिमाह १५० रुपये १० महिन्यांकरता देण्यात येईल म्हणजेच १५०० रुपये. अशा मुलांचे उपस्थिती ७५% असणे गरजेचे आहे.
परिवहन भत्ता-अशी मुलं ज्यांच्या गावात शाळा उपलब्ध नाहीये आणि त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी शहरात किंवा त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांब जावं लागतं अशा मुलांसाठी परिवहन भत्ता नमूद केला आहे ज्यामध्ये प्रत्येक महिन्यात १५० प्रमाणे १० महिने निधी देण्यात येईल म्हणजेच पंधराशे रुपये देण्यात येतील आणि अशा मुलांची उपस्थिती ७५% असण अत्यंत आवश्यक आहे.
Conclusion
आपण वरील पोस्ट मधून सी डब्ल्यू बद्दल बरीच माहिती घेतली आहे cwsn म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स यासाठी चालू केलं गेलंय की, की अशी मुलं जी शारीरिक रित्या स अपंग आहे त्या मुलांना सुद्धा बाकीच्या
मुलांसारखं शिक्षणाचा अधिकार मिळावा. शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच आहे, आणि त्याचबरोबर अशी मुलं जे दिव्यांग आहेत, किंवा शारीरिकरित्या अपंग आहेत, किंवा त्यांना विशेष गरजांची आवश्यकता आहे, अशा मुलांना आपण जपलं पाहिजे आणि त्याचबरोबर अशा मुलांसोबत समानतेने वागलं पाहिजे.
अशा मुलांसोबत बोलत असताना, किंवा त्यांच्यासोबत राहत असताना, त्यांना असं वाटू दिलं नाही पाहिजे की ते कुठल्याही प्रकारे बाकीच्या मुलांपेक्षा कमी आहेत. अशा मुलांचा सर्वांगीण विकास होणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून ते समाजात, ताठ मानेने वावरले पाहिजे. समावेशित शिक्षणात विविध उपकरणे उपलब्ध असून अशा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते अत्यंत गरजेचं आहे.
FAQ
सीडब्ल्यूएसएन पूर्ण फॉर्म काय आहे?
सी डब्ल्यू एस एन म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी. विशेष गरजा असलेले मुलं उच्च शिक्षण घेण्यास आणि इतर मुलांसारख्या समान संधी मिळवण्यास पात्र आहेत.
येथे संदर्भित विशेष मुलं म्हणजे कोण?
विशेष मुलं म्हणजेच असे मुलं ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपंगत्व असतं आणि या अपंगत्वामुळे त्यांना अगदी कृपणे समाजापासून दूर केलं जातं. परंतु अशा दिव्यांग मुलांसाठी, अनेक स्वयंसेवी संस्था उपलब्ध आहेत, आणि अशा संस्था दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी दिवस रात्र कार्य करत आहेत.
विशेष मुलांना हाताळायचं कसं?
अशा मुलांना अगदी प्रेमाने आणि दयाळू होऊन हाताळणं अगदी गरजेचा आहे. जेव्हा अशी मुलं संघर्ष करतात तेव्हा शिक्षकाचं काम त्यांना आधार आणि संयम दाखवणे अस आहे. अशा मुलांसाठी खूप कार्य त्याच बरोबर क्रियाकला अवघड ठरू शकतात त्यामुळे त्यांना वेळ देऊन समजून घेनं अगदी गरजेच आहे.