CRPF Full Form In Marathi सीआरपीएफ चा पूर्ण फॉर्म सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स असा आहे. आणि यालाच आपण मराठी भाषेत केंद्रीय राखीव पोलीस दल देखील म्हणतो. सीआरपीएफ हे दल एक राखीव दल आहे आणि त्याबरोबरच यामध्ये कार्यरत असलेल्या लोकांना जवान म्हणून संबोधण्यात येत.

सीआरपीएफ फुल फॉर्म CRPF Full Form In Marathi
सीआरपीएफचे जवान आपल्याला कोरोना काळात सगळ्यात जास्त कार्यरत आणि कार्यतत्पर दिसलेत. देशामध्ये कुठल्याही ठिकाणी जेव्हा संकटाची परिस्थिती येते किंवा एखाद्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता असते त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात केले जातात.
सीआरपीएफ चे जवान अशा कठीण प्रसंगी नेहमी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. भारतामध्ये निवडणुकांच्या वेळी सुद्धा सीआरपीएफच्या जवानांचं भरपूर मोठे योगदान असतं. मतदान केंद्रांवरती सीआरपीएफचे जवानांना तैनात करण्यात येतं.
आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याचं एक राज्यस्तरीय पोलीस दल आहे परंतु त्याच ठिकाणी केंद्रीय स्तरावर असलेलं एक राखीव पोलीस दल म्हणून सीआरपीएफ हे राखीव उदल ओळखलं जातं. सीआरपीएफ हे एक केंद्रीय राखीव पोलीस दल आहे.
सीआरपीएफ ही एक भरपूर मोठी पोलीस दलाची तुकडी असते आणि देशात विभागलेली असते. सीआरपीएफ चा सगळं कार्य, भारत सरकारच्या गृहमंत्रालयाखाली चालतं. ही पोलीसाची तुकडी देशाकडून जरी असली तरी प्रत्येक राज्याच्या सुरक्षेतेच हे काम करते.
ज्या प्रकारे देशाच्या सीमेवरती आर्मी आपल्या सुरक्षिततेसाठी तैनात असते त्याचप्रमाणे देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी सीआरपीएफ नावाची ही राखीव पोलीस दलाची तुकडी नेहमी तत्पर असते. पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येतात.
देशाच्या सुरक्षिततेमध्ये जेव्हा कुठे गालबोट होतो किंवा नक्षलवाद्यांचे हमले होतात किंवा देशावरती कुठल्याही संकटाची वेळ येते तेव्हा सीआरपीएफचे आपले जवान नेहमी आपल्या मदतीला तैनात असतात. आत्ताच होऊन गेलेल्या महामारी च्या काळात म्हणजेच कोरोना आजाराच्या काळात देखील आपण सीआरपीएफच्या जवानांना कार्य तत्पर बघितलं.
सीआरपीएफ चा इतिहास
सीआरपीएफ चा पूर्ण फॉर्म सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स असून याला मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल असं देखील म्हणतात. सीआरपीएफ हे दल खरंतर भारताचे स्वतंत्रता नंतर निर्माण करण्यात आला होतं परंतु ब्रिटिशांच्या काळामध्ये देखील हे दल तितकच कार्यरत होतं.
- २७ जुलै १९३९: ब्रिटिशांच्या काळात उच्च ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या छावण्या जिथे होत्या त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी त्यांनी सीआरपी दलाची स्थापना केली होती.
- या ठिकाणी सीआरपी चा पूर्ण फॉर्म ग्राउंड रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस, असा होतो. त्यावेळी भारतात भरपूर ठिकाणी बंड आणि इंग्रजांविरुद्ध बंड होत होते. त्यामुळे त्यावेळेस ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि ब्रिटिश आर्मी कमी असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली होती.
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४९ या वर्षाच्या सुमारे, हीच संकल्पना पुढे चालवण्यात आली आणि यामध्ये बदल फक्त इतकाच केला की सीआरपी च्या जागी या दलाचं नाव सीआरपीएफ असं ठेवलं.
- त्या काळापासून हे दल भारतातील काही संवेदनशील ठिकाणी आणि कधी आर्मीच्या सोबत तर कधी सीमा वरती यांना यांचा कार्य करावे लागतं. हे जवान संपूर्ण देशात कार्यरत असतात.
CRPF full form in English | CRPF full form in Marathi
CRPF full form in Marathi | केंद्रीय राखीव पोलीस दल |
CRPF full form in English | Central Reserve Police Force |
CRPF प्रति वर्ष पगार | ₹38,100 प्रति वर्ष |
सीआरपीएफ मध्ये भरती होण्यासाठी पात्रता
सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स आणि यालाच आपण मराठी मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल असे देखील म्हणतो. ही एक केंद्रीय स्तरावर काम करणारी पोलिसाची राखीव तुकडी आहे जी देशातील कुठल्याही संकटाच्या वेळेस लोकांच्या मदतीसाठी तत्पर असते.
कठीण प्रसंगी आणि महामारीच्या वेळेस सीआरपीएफ चे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात केले जातात. इतकच नव्हे तर देशात निवडणुकीच्या ठिकाणी देखील या जवानांना तैनात करण्यात येत. अनेक विद्यार्थ्यांना सीआरपीएफ मध्ये जाण्याची आवड असते. सीआरपीएफ मध्ये भरती करण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:
- सीआरपीएफ दलामध्ये भरती करण्यासाठी विद्यार्थ्याचं किंवा उमेदवाराचं वय २० पूर्ण असणे गरजेचे आहे आणि उमेदवाराचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असायला नको.
- वयाच्या अटींमध्ये काही वर्गांसाठी सूट देण्यात आली आहे एससी एसटी या वर्गासाठी ५ वर्ष, आणि त्याच ठिकाणी ओबीसी वर्गासाठी ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता बद्दल बोलायचं झालं तर विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, यामध्ये शाखेचे कुठलेही बंधन नसून यामध्ये कुठल्याही शाखेचे विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र असतात.
- शारीरिक पात्रता बद्दल बोलायला गेलं तर पुरुषांची उंची १७० सेमी जास्त आणि महिलांची उंची १५७ सेमी पेक्षा जास्त असणे गरजेच आहे.
- पुरुषांची छाती फुगवल्यानंतर ८५ सेमी आणि न फुगवता ८० सेमी इतका असणं गरजेचं आहे.
- यामध्ये शैक्षणिक पातळी बरोबरच शारीरिक चाचणी देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण कठीण प्रसंगी मदत करण्यासाठी उमेदवार आधी स्वतः दुरुस्त असणे गरजेचे आहे त्यामुळे शारीरिक चाचणी अत्यंत गरजेची आहे.
सीआरपीएफ भरती प्रक्रिया
सीआरपीएफ म्हणजेच सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स हे एक केंद्रीय स्तराची पोलीस दलाची तुकडी आहे जी देशातील कठीण प्रसंगी आणि सुरक्षिततेसाठी तैनात राहते. भरपूर विद्यार्थी बारावीनंतर सीआरपीएफ या दलामध्ये भरती होण्यास इच्छुक असतात. या दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला तीन टप्प्यांना पार करावा लागत.
सीआरपीएफ ची भरती दरवर्षी करण्यात येते आणि त्यासाठी विद्यार्थ्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन भेट देणे गरजेच आहे. यामध्ये भरती होण्यासाठी चे तीन टप्पे निम्नलिखित आहेत:
•लेखी परीक्षा: यामध्ये भरती घेण्यासाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येते त्यामध्ये लेखी परीक्षेचा पेपर दोन विभागांमध्ये घेण्यात येतो. हा लेखी पेपर एकूण ३०० गुणांचा असतो.
पेपर १-पहिल्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. हा पेपर २०० गुणांसाठी असतो
पेपर २-हा पेपर निबंध लेखनाचा असून यासाठी विद्यार्थ्याला १०० गुण असतात.
•मेडिकल आणि शारीरिक क्षमता चाचणी: उमेदवाराचा लेखी परीक्षेचा टप्पा उत्तीर्ण झाल्यानंतर या टप्प्यामध्ये प्रवेश घेण्यात येतो. मेडिकल मध्ये उमेदवाराची शारीरिक तपासणी करण्यात येते. शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराकडून विविध कार्य करून घेतात जसं १०० मीटर धाव, आणि बरच काही.
•मुलाखत: सर वरील दोन टप्पे व्यवस्थित पार केले तर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येत यामध्ये उमेदवाराचे सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून घेतले जातात आणि त्यानंतर त्याला काही प्रश्न विचारण्यात येतात. त्या प्रश्नांची समाधानकारी उत्तर मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सीआरपीएफ या दलामध्ये भरती करण्यात येतं.
सीआरपीएफ चा पगार किती आहे
सीआरपीएफ म्हणजेच सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स. हे केंद्रीय स्तरावर कार्यरत असलेली पोलिसाचे तुकडे आहे. देशामध्ये कठीण प्रसंगी आणि सुरक्षिततेसाठी हे दल नेहमी लोकांच्या मदतीसाठी तळणीत असतं. दरवर्षी या दलामध्ये भरती होण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक असतात. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेण्यास पात्र असतो. यासाठीची परीक्षा दर वर्षी घेण्यात येते.
सीआरपीएफ जवानांना मान सन्मान आणि आशीर्वादासोबत चांगला पगार देखील मिळतो. सीआरपीएफ च्या जवानांचा पगार साधारण २०,००० ते ७०,००० इतका असतो. आणि यामध्ये पदोन्नती झाल्यानंतर पगार वाढत देखील असतो. सीआरपीएफ मध्ये विविध पद उपलब्ध असतात आणि त्या पदांनुसार देखील त्या जवानाचा पगार ठरवण्यात येतो.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण सीआरपीएफ बद्दल भरपूर माहिती घेतली. यामध्ये सीआरपीएफ चा संपूर्ण फॉर्म आणि त्याचबरोबर सीआरपीएफ म्हणजे काय हे सुद्धा आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं. सीआरपीएफ चा इतिहास काय ती कधी आणि कशी स्थापन करण्यात आली होती हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं.
सीआरपीएफ पोलिसाच्या तुकडी मध्ये भरती होण्यासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण या पोस्ट मधून बघितले. सीआरपीएफ हे दलामध्ये भरती होण्याची प्रक्रिया देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतली. आणि सीआरपीएफ मध्ये भरती असलेल्या जवानांचा पगार किती असतो यावर सुद्धा आपण माहिती घेतली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
सीआरपीएफ चा पूर्ण फॉर्म काय?
सीआरपीएफ चा पूर्ण फॉर्म सेंट्रल रिझल्ट पोलीस फोर्स असा असून याला मराठी भाषेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल देखील म्हणतात.
सीआरपीएफ मध्ये कोणती पदे असतात?
यामध्ये पोलीस दलाप्रमाणेच असिस्टंट कमांडर, सब इंस्पेक्टर, आणि कॉन्स्टेबल हे पद असतात. यामध्ये पदामध्ये आंतरिक बढती मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते.