सीपीआर फुल फॉर्म CPR Full Form In Marathi - Full Forms Marathi

सीपीआर फुल फॉर्म CPR Full Form In Marathi

CPR Full Form In Marathi सीपीआर चा पूर्ण फॉर्म कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन असा होतो. यामध्ये उदय आणि फुफुस संबंधित पुनरुत्थान करण्याचा तंत्र म्हणजेच सीपीआर असं असतं. ज्या लोकांना कोरोना झालेला आहे त्या लोकांना ऑक्सिजनची कमतरता शरीरामध्ये कशी होते याबद्दलचा अनुभव नक्कीच आलेला असेल त्याचप्रमाणे आपण अनेकदा बघतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येत असतो त्या वेळेला त्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो आणि हा ऑक्सिजन पुरवठा सीपीआर ही पद्धत वापरून करण्यात येतो. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर, त्याला पाण्यातून बाहेर काढल्यावर सीपीआर देण्यात येतं म्हणजेच त्याच्या शरीरातलं ऑक्सिजन लेव्हल पुनः व्यवस्थित करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

CPR Full Form In Marathi

सीपीआर फुल फॉर्म CPR Full Form In Marathi

एखाद्या व्यक्तीच्या कठीण काळात किंवा आजारामध्ये त्याला जर आपण सीपीआर ची गरज असताना ही प्रक्रिया त्याच्यासोबत केली तर एखाद्या व्यक्तीचा जीव आपण वाचवू शकतो त्याच पद्धतीने आपण जर ही प्रक्रिया शिकून घेतली तर नक्कीच आपण आयुष्यात एखाद्या तरी व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. आणि नक्कीच एखाद्या व्यक्तीला तरी जीवनदान देऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीचा श्वास अडकल्यावर किंवा त्याला हार्ट अटॅक येत असताना सीपीआर ही प्रक्रिया त्याला देणं अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून त्याच्या शरीरातला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होईल. सीपीआर ही प्रक्रिया म्हणजे थोडक्यात छातीवर दबाव देऊन, फुफुस सक्रिय करण्याचं काम करत, आणि त्यानंतर तोंडातून त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये श्वास देऊन त्याला जीवनदान देण्याचे प्रक्रिया म्हणजे सीपीआर असते.

सीपीआर दिल्यावर व्यक्ती लगेच जागा होईल अशातला भाग नाही परंतु, जोपर्यंत रुग्णाला नियमित उपचार मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करून त्याच्या शरीरातला रक्तपुरवठा मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याचबरोबर, शरीरामध्ये ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित ठेवण्याचं काम हे करत.

सीपीआर का दिला जातो

सीपीआर चा पूर्ण फॉर्म कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन असा आहे. एखाद्या वेळेस जर कुठल्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीला सीपीआर देण्याची गरज पडू शकते. कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन वेगळ्या परिस्थिती आहेत.

हे दोन्ही वेगळे असलं तरी या दोन्हीमध्ये व्यक्तीचा श्वास कोंडला जातो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही आणि श्वास न घेता आल्यामुळे त्या व्यक्तीचा कधीही मृत्यू होऊ शकतो म्हणून अशावेळी शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा मिळण अत्यंत गरजेच आहे. आणि अशा वेळेला व्यक्तीच्या शरीरात जितक्या लवकर प्रीतीम प्राणवायू मिळेल तितकं त्या व्यक्तीसाठी चांगलं असतं, आणि त्याचबरोबर त्याच्या वाचण्याची शक्यता वाढत असते.

सीपीआर चा प्रशिक्षण डॉक्टरांना, नर्सला, पोलीस, आर्मी जवान, लाईफ गार्ड, या सगळ्यांना देण्यात येत असत. हे लोक कुठल्याही आपातकालीन परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींची मदत करायला, जाऊ शकतात कारण त्यांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात येत, आपण सर्वांनी सुद्धा सीपीआर चा प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे कारण आपल्यासमोर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्या नंतर आपण कुणाचीच वाट न बघता समोरच्याचा जीव वाचवला पाहिजे.

CPR full form in English |  CPR full form in Marathi

CPR full form in Marathiकारडीओ पल्मोनरी रिससिटेशन
CPR full form in EnglishCardio Pulmonary resuscitation
CPR चे दोन प्रकार काय आहेतहँड्स-ओन्ली सीपीआर, पारंपारिक सीपीआर
बाल CPR साठी प्रमाण किती आहे30 chest compressions

सीपीआर कधी दिला जातो

सीपीआर चा पूर्ण फॉर्म कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन असा होतो. सीपीआर निम्नलिखित परिस्थितींमध्ये दिला जाऊ शकतो:

  • एखाद्या व्यक्तीला जेव्हा विजेचा शॉक लागतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा श्वास कोंडला जातो आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतो अशावेळी आपण त्याला सीपीआर देऊन कदाचित त्याचा जीव वाचवू शकतो. विजेच्या शॉक लागल्यानंतर तो व्यक्ती काही वेळासाठी हालचाल करत नाही आणि त्यामुळेच त्याच्या शरीरातला ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन जातो आणि त्याच्या श्वास कोंडला जातो आणि यामुळेच सीपीआर ची मदत त्याचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकते.
  • घरात खेळणारी लहान मुलं कधीकधी काही पण तोंडात टाकतात आणि त्यांच्या घशामध्ये काही गोष्टी अडकून जातात जसं कॉइन झाकण आणि कधी कधी जेवताना अन्न पण अटकत आणि त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, अशावेळी त्यांना सीपीआर दिला जातो जेणेकरून त्यांच्या शरीरातला ऑक्सिजन पुरवठा नीट राहील.
  • दिलेल्या काही गोळ्यांचा आकार जर मोठा असेल तर ते देखील व्यक्तीच्या घशात अडकू शकतात आणि त्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो अशा वेळेस सीपीआर देऊन त्या व्यक्तीला ऑक्सिजन पुरवठा देण्यात येतो
  • एखाद्या व्यक्तीला जर विषबाधा झाली तर त्या परिस्थितीमध्ये देखील सीपीआर हे त्या व्यक्तीला देण्यात येतं.
  • जर एखाद्या व्यक्ती पाण्यात बुडाला असेल, तर त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या छातीवर दाब देऊन आणि तोंडातून श्वास देऊन त्याला सीपीआर देण्यात येत जेणेकरून त्याच्या शरीरातला ऑक्सिजन पुरवठा नीट राहील. आणि त्याचा श्वास परत चालू होईल
  • अपघातामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा रक्त जास्त गेलं तर त्या वेळेला देखील सीपीआर देत असतात.
  • एखाद्याच्या जर डोक्याला मार लागला तर त्या वेळेला देखील सीपीआर देऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात येतो.

सीपीआर द्वारे होणारे वैज्ञानिक बदल

सीपीआर हा कुठल्याही व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे जी सर्वांनी शिकली पाहिजे. आपल्या शरीराचा निर्माण असा झालेला आहे की आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत असते.

जे की जर एखाद्याचा अपघात झाला आणि त्याचा श्वास बंद झाला तर ऑक्सिजन मिळणार नाही आणि यामुळे त्याच्या शरीरातल्या पेशी मृत व्हायला लागतील. पेशी मृत व्हायला लागल्या की त्याचा सर्वात मोठा त्रास हा मेंदूला होतो मेंदू त्याचं काम करणं बंद करायला लागतो आणि यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे वेळेला सीपीआर मिळणं अत्यंत गरजेच आहे.

त्यामुळे जर आपण एखादा रुग्णाला सीपीआर देत राहिलो तर त्याच्या शरीरातल्या पेशी जिवंत राहतील आणि त्या पेशी जर जिवंत राहिल्या तर व्यक्तीचा जीव देखील वाचू शकतो आणि सीपीआर सतत देत राहिल्यामुळे तो व्यक्ती कदाचित परत उभा राहण्यास देखील सक्षम होऊ शकतो. एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आपण सर्वांनी शिकली पाहिजे जेणेकरून गरज पडतात आपण देखील एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत करू.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण सीपीआर या विषयावर बरीच माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम सीपीआर म्हणजे काय आणि याचा पूर्ण फॉर्म काय आहे हे आपण या पोस्ट मधून बघितलं. त्यानंतर सीपीआर का दिला जातो आणि याचे काय फायदे आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.

त्यानंतर सीपीआर नेमका कधी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये देण्यात येतो हे देखील आपण या पोस्ट मधून अत्यंत व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं. आणि त्यानंतर शेवटी सी पी आर द्वारे होणारे शरीरातले वैज्ञानिक बदल काय आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून समजण्याचा प्रयत्न केला. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

सीपीआर म्हणजे काय?

सीपीआर म्हणजे कॉर्डियो पल्मोनरी रिससिटेशन असं असतं. हे एक असा वैज्ञानिक मंत्र आहे ज्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास कोंडल्या जातो किंवा त्याला श्वास घेण्यास त्रास होतो अशा परिस्थितीमध्ये त्याला श्वास देण्यात येतो आणि ऑक्सिजन पुरवठा त्याच्या शरीरामध्ये करण्यात येतो.

लहान मुलांना सीपीआर द्यावा का?

हो, आपण लहान मुलांना देखील सीपीआर देऊ शकतो, लहान मुलांना जेव्हा त्यांच्या घशात काही अडकतं तेव्हा त्यांना सीपीआर देण्यात येऊ शकतो परंतु त्यांना सीपीआर देताना खूप काळजी घेण्याची गरज आहे कारण त्यांच्या छातीवर जास्त दबाव पडला तर त्यांना आंतरिक इजा होण्या ची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना सीपीआर ते त्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे.

सीपीआर दर काय आहे?

सीपीआर देत असताना प्रति मिनिट १००-१२० कॉम्प्रेशनच्या दराने जोरात दाबण्यात येत, आणि त्या व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो.

सीपीआर शिकणे महत्त्वाचे का आहे?

प्रत्येक व्यक्तीने सीपीआर ही प्रक्रिया शिकणं गरजेचं आहे कारण आपल्यासमोर जर कुठली आपत्कालीन परिस्थिती आली किंवा आपल्यासमोर कोणाला हार्ट अटॅक येत असला तर आपण त्याची मदत करू शकू आणि त्यांना जीवनदान देऊ शकतो.

सीपीआर पीडितेला कसे जिवंत ठेवते?

आपल्या शरीराची रचना अशी झालेली आहे, की आपल्या शरीरामधील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरज लागत असते, आणि जर कुठला अपघात झाला तर आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमी व्हायला लागते, आणि यामुळे पेशी हळूहळू मरायला लागतात त्यामुळे, हळूहळू सीपीआर देत राहिलं तर त्या पेशी जिवंत राहतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही, कारण त्या पेशींना ऑक्सिजन पुरवठा मिळत असतो आणि यामुळे, त्या पेशी जिवंत राहतात आणि माणूस वाचू देखील शकतो.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top