सीईओ फुल फॉर्म CEO Full Form In Marathi - Full Forms Marathi

सीईओ फुल फॉर्म CEO Full Form In Marathi

CEO Full Form In Marathi आजच्या पोस्टमध्ये आपण CEO full form in Marathi किंवा CEO फुल फॉर्म काय आहे, CEO म्हणजे नक्की काय व CEO चे काम काय असते, CEO बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता निकष काय असतो, CEO समान इतर उच्च पदक कोणती आहेत. अशा बऱ्याच विषयांवर सविस्तर माहिती मिळवणार आहोत.

CEO Full Form In Marathi

सीईओ फुल फॉर्म CEO Full Form In Marathi

CEO हाउसफुल फॉर्म Chief executive officer ज्यालाच मराठीत मुख्य कार्यकारी अधिकारी या नावाने ओळखले जाते. CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ही कोणत्याही संस्थेमधील किंवा कंपनीमधील व इतर कोणत्याही क्षेत्रांमधील सर्वोच्च पद मानले जाते. CEO चे उच्च स्थान असल्यान ती व्यक्ती प्रशासनाची मुख्य व्यक्ती आणि व्यवस्थापन प्रभारी म्हणून ओळखली जाते व कार्यरत असते.

कोणत्याही कंपनीचा किंवा प्रशासनाचा सीईओ अध्यक्ष किंवा संचालकांना थेट अहवाल देत असतो. सीईओ ही पदवी सर्वात वरिष्ठ प्रशासकीय पदवी असून ते उच्च पदावर कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीतील किंवा संस्थेतील संपूर्ण व्यवस्थापन आणि कारभार सुरळीतपणे चालवण्यास सक्षम असतात.

कोणत्याही प्रशासन किंवा कंपनीच्या फायद्या करिता सीईओ हे त्याचे मौल्यवान मत देऊन विकासासाठी व फायदा संबंधित निर्णय घेऊन कंपनी किंवा संस्थेला प्रगतशील वाटचालीस मदत करतो. कोणत्याही कंपनीतील किंवा संस्थेतील एक अग्रगण्य स्थान हे कंपनीच्या संचलक मंडळाकडून सीईओ ला देण्यात येते. कोणत्याही संस्थेमध्ये कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेशन मध्ये सी ओ ची भूमिका ही एकसारखी नसून त्याची शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यकता ही देखील एकसारखे नसते.

CEO Full Form in Marathi | CEO Full Form in Marathi

CEO full form in Marathiचीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
CEO full form in EnglishChief executive officer
CEO salary₹25,00000 प्रति वर्ष
CEO साठी सीईटी आवश्यक आहेनाही

CEO होण्यासाठीची शैक्षणिक पात्रता.

CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्यालाच मराठीमध्ये म्हटले जाते मुख्य कार्यकारी अधिकारी. तसे बघायला गेले तर CEO बनण्यासाठी कोणतीही विशिष्ट प्रकारची शैक्षणिक पात्रता गरजेची नसते. कोणत्याही क्षेत्रातील शैक्षणिक डिग्री जर तुमच्याकडे असेल किंवा विशिष्ट विषयाबद्दल तुम्हाला ज्ञान असेल तर ते पुरेसे ठरू शकते.

कारण की सीईओ होण्यासाठी शैक्षणिक अटींची नव्हे तर तुमच्यातील विशिष्ट गुण असणे गरजेचे आहे. खरं म्हणावे तर सीईओ ही पदवी एक सर्वोच्च पदवी

असून कोणत्याही कंपनीच्या संस्थेच्या किंवा कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळांकडून नियुक्त करून देण्यात आलेली पदवी असते. सामान्य संशोधनानुसार असे आढळून आले आहे की बहुतांश सीईओंकडे एखाद्या तांत्रिक पद्धतीची किंवा एमबीए ची डिग्री असते.

तुम्हाला जर कोणत्याही तांत्रिक क्षेत्रात कार्यरत व्हायचे असेल किंवा राहायचे असेल तर तुम्हाला तांत्रिक ज्ञान त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान असणे नक्कीच गरजेचे आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या गुणांद्वारे तुमचे व्यक्तिमत्व लोकांना सिद्ध करून देऊ शकता.

म्हणून ज्याची बौद्धिक पात्रता चांगली आहे असा कोणताही व्यक्ती जेणेकरून कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेले असो तो सीईओ या पदासाठी पात्र ठरतो आणि जर संचालक मंडळांनी त्याला निवडून व नियुक्त करून दिले तर तो व्यक्ती सीईओ होऊ शकतो.

CEO च्या प्रमुख जबाबदाऱ्या

  • सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी हा परिषदेत समाविष्ट असलेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मदतशील ठरतो.
  • सीईओ त्याच्या हाताखालील सब ऑफिसर ला विविध कर्तव्य व भूमिका नियुक्त करण्याचे काम करून सर्व व्यावसायिक क्रिया प्रकल्पांचे नेतृत्व देखील करतो.
  • एखाद्या कंपनीचा सीईओ त्या कंपनीमधील विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा व समर्थन प्रदान करतो.
  • व्यावसायिक क्षेत्रात सीईओ हा रणनीती, धोरण आणि व्यवसाय सांभाळत असताना समोर येणाऱ्या समस्या समजून त्यावर आधारित बदल घडवून आणतो.
  • सीईओ हा कोणत्याही संस्थेच्या किंवा कंपनीच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा सल्ला देऊन भांडवलावर नियंत्रण व व्यवस्थापन राबवतो.
  • सीईओ हा कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख निर्णय घेण्याचे देखील कार्य करतो.
  • सीईओ हा बोर्डच्या इतर सदस्यांना कामामध्ये व निवडीमध्ये मदत करतो.
  • सीईओ हा गुणवत्तेचे निरीक्षण, जाहिरात, वितरण, विपणन सेवांचे उत्पादन आणि उत्पादने यावर लक्ष केंद्रित करतो.
  • कोणत्याही संस्थेच्या दृष्टी ध्येयाशी सुसंगत असल्याची खात्री किंवा संस्थेच्या उत्पादनाबद्दल माहिती व खात्री देण्याचे काम सीईओ करत असतो.

CEO संबंधित प्रमुख पदे

संस्थापक | Founder

कोणत्याही कंपनीची किंवा संस्थेची स्थापना करणाऱ्या व्यक्तीला संस्थापक असे म्हटले जाते. कोणत्याही संस्थेच्या संस्थापकाने त्या व्यवसायाच्या स्थापनेत व त्या संघटनेची रचना करण्यात व त्या व्यवसायाला विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका साकारलेली असते.

एखाद्या कंपनीतील सीईओ ला संस्थेचे संस्थापक व सीईओ असे दोन्ही म्हणून ओळखले जाऊ शकते जर त्यानेच त्या संस्थेची किंवा कंपनीची स्थापना केलेली असेल. संस्थापक हा कोणताही सामान्य व्यक्ती असू शकतो.

अध्यक्ष | President

कोणत्याही गटाचा समितीचा किंवा संघाचा प्रमुख म्हणजेच अध्यक्ष होय. लोकांच्या गटाला किंवा संघाला जेव्हा एका विशिष्ट प्रकारचे कार्य किंवा जबाबदारी नेमून दिली जाते सामान्यतः तेव्हा ती कार्य अध्यक्ष च्या अध्यक्षतेखाली पार पडतात. म्हणजेच अध्यक्ष हासंघाच्या देखभालीसाठी असतो.

संचालक मंडळाचे सर्व कामकाज हे अध्यक्षाच्या देखरेखी खाली असते. याप्रसंगी जर एखादा सीईओ विशिष्ट समितीच्या देखरेखीचे कार्य पार पाडत असेल तर तो सीईओ तथा अध्यक्ष म्हणून संबोधला जातो.

मालक | Owner

कोणत्याही फॉर्म मध्ये असलेला आर्थिक भागीदार ज्यात सामान्य पद्धतीने इक्विटी असते त्या व्यक्तीला मालक म्हटले जाते. एका व्यवसायाचे किंवा फॉर्म चेक एक पेक्षा अधिक मालक असू शकतात. प्रत्येक मालकाच्या गुणवत्तेनुसार त्याला त्या व्यवसायातील टक्केवारीने कमाई नेऊन दिली जाते.

ज्याप्रसंगी एखाद्या व्यवसायात किंवा फॉर्म मध्ये किंवा कंपनीला एकापेक्षा जास्त मालक असतात त्याप्रसंगी त्या मालकाला अंश मालक असे संबोधले जाते. सीईओ देखील मालक असू शकतो जर तो व्यवसायात आर्थिक भागीदार असेल तर.

दिग्दर्शक | Director

हे पद विविध प्रकारच्या भूमिकांना संबोधण्यासाठी वापरले जाते. यालाच संचालक असे म्हटले जाते जो की

संस्थेच्या संचालक मंडळाचा सदस्य असू शकतो. एखादा सीईओ सुद्धा संचालक असू शकतो. परंतु सामान्यतः सीईओ हे संचालकापेक्षा उच्चपद असते.

CEO चा पगार | CEO salary

CEO ज्याचा फुल फॉर्म चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असा आहे. सर्वांसाठी एक महत्त्वाचा ठरणारा विषय म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील पगार असतो. CEO साठी असे काही विशिष्ट पगार नसून प्रत्येक कंपनीच्या किंवा संस्थेच्या सीईओ चा पगार हा त्या संस्थेवर कंपनीवर किंवा व्यवसायावर आधारित असू शकतो.

जसे की आपण बघितले सीईओ हे एक सर्वोत्तम व उच्च पद आहे तर सीईओ चा पगार हा देखील बऱ्यापैकी उच्च पद्धतीचा. उदाहरणार्थ इन्फोसिस कंपनीच्या सीईओ चे वेतन ₹४९.६८ कोटी आहे. गुगलच्या सीईओ म्हणजेच सुंदर पीचाई यांचा 2022 मध्ये पगार सुमारे 19 अब्ज रुपये होता.

Conclusion | निष्कर्ष

तर मग मित्रांनो आजच्या या लेखात आपण CEO full form in marathi, CEO फुल फॉर्म इन मराठी या विषयावर एकंदरीत चर्चा केली. या विषयाला अनुसरून आपण CEO म्हणजे नक्की काय? सीईओ होण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता कोणती? सीईओ च्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणकोणत्या? सीईओ संबंधित इतर असलेली प्रमुख पदे कोणती? सीईओ चा साधारण पगार किती असतो? अशा विविध विषयांवर संक्षिप्त माहिती दिली.

आम्ही आशा करतो की या लेखात संबोधित केलेले सर्व विषय व त्यावर आधारित दिलेली अधिकृत माहिती मला उपयुक्त ठरली असेल व आवडली असेल. जर तुम्हाला वरील लेखातील माहिती उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन विषयांवरील संक्षिप्त माहितीसाठी या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद.

FAQ

CEO चा फुल फॉर्म काय आहे?

CEO म्हणजे Chief executive officer असून ज्याला मराठीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असे संबोधले जाते.

भारतात सर्वाधिक पगार घेणारा CEO कोण आहे?

भारतात सर्वाधिक पगार घेणारा CEO चे नाव सी विजयकुमार असे आहे. हे HCL Tech कंपनीचे सीईओ असून त्यांचा वार्षिक पगार 130 कोटी रुपये आहे. सी विजयकुमार यांनी 1994 सालि एच सी एल टेक मध्ये त्यांचा प्रवास सुरू केला व ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना सीईओ पदावर बढती मिळाली आणि जुलै 2021 मध्ये ते कंपनीचे सीईओ झाले.

सीईओ होण्यासाठी काय करावे?

बऱ्याच सीईओंकडे कार्य अनुभव, उत्तम नेतृत्व, समस्या उलगडीकरण व संवाद कौशल्य आणि त्याचबरोबर औपचारिक प्रशिक्षण असते. व कोणत्याही व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी देखील असते.

कंपनीत सीईओ ची भूमिका काय असते?

साधारण पण हे कोणत्याही कंपनीच्या सीईओच्या भूमिका या कंपनीचा विस्तार करणे,कंपनीच्या शेअरच्या किमती सुधारणे, नफा वाढवणे, व सार्वजनिक क्षेत्रात कंपनीला उच्च पदावर नेणे अशा आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top