बीएचएमएस फुल फॉर्म BHMS Full Form In Marathi - Full Forms Marathi

बीएचएमएस फुल फॉर्म BHMS Full Form In Marathi

BHMS Full Form In Marathi बीएचएमएस हा वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील एक पदवी अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो. वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे दोन उपचाराच्या पद्धती असतात, पहिली म्हणजे ऍलोपॅथी आणि दुसरी म्हणजे होमिओपॅथी.

BHMS Full Form In Marathi

बीएचएमएस फुल फॉर्म BHMS Full Form In Marathi

बीएचएमएस झालेले विद्यार्थी होमिओपॅथी पद्धतीने लोकांचा उपचार करतात. बीएचएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन ऍण्ड सर्जरी असा होतो. मराठी मधून याचा पूर्ण फॉर्म औषध आणि शस्त्रिका पदविका असा होतो. बारावी नंतर काय करावं, कुठल्या क्षेत्रात जावो हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यासमोर उभा असतो.

त्यावरती उत्तर म्हणजे आपण दिलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याला असलेली विषयातील रुची यावरून विद्यार्थी त्याचा पुढील आयुष्याचं शैक्षणिक मार्ग ठरवतो. बारावी विज्ञान क्षेत्रातून उत्तीर्ण झालेले भरपूर विद्यार्थी एमबीबीएस या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात, परंतु कमी मार्कांमुळे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस या क्षेत्रात प्रवेश भेटत नाही ते विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील दुसरे महत्त्वाचं क्षेत्र म्हणजेच बीएचएमएस याची निवड करतात.

ही होमिओपॅथिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची पदवी आहे, ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी त्याची स्वतःची प्रॅक्टिस देखील सुरू करू शकतो. बऱ्याचदा हे बघण्यात आलंय की होमिओपॅथिक क्षेत्र ऍलोपॅथिक क्षेत्रा पेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं. लोकांसाठी ऍलोपॅथीपेक्षा होमिओपॅथी जास्त प्रभावी ठरल्याचे बघितल गेल आहे.

अनेक वर्षांपासून दडलेले आजार आणि असे आजार ज्यांचा खूप वर्षांपासून उपाय सापडत नाही आहे अशा आजारांवर देखील होमिओपॅथी द्वारे उपचार करण्यात येतो. काही आवश्यक पत्र पाडून आणि होमिओपॅथी उपचारा वरून भरपूर आजारांचा उपचार करण्यात येतो.

बीएचएमएस प्रवेशासाठी पात्रता

बीएचएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी असा होतो. हा एक वैद्यकीय क्षेत्रातील पदवी कोर्स आहे. या कोर्समध्ये होमिओपॅथी उपचाराबद्दल प्रशिक्षण देण्यात येत. बीएचएमएस या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेच आहे. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेलं असून यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असणं गरजेचं आहे.
  • बारावी मध्ये मान्यता प्राप्त बोर्डाकडून विद्यार्थ्याला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये किमान ५०% किंवा त्याहून जास्त गुण असणे गरजेच आहे. काही राखीव वर्गांसाठी यामध्ये ५% ची सूट देण्यात येते.
  • या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी १७ वर्ष आणि जास्तीत जास्त २५ वर्ष इतकं असणं गरजेचं आहे.
  • राखीव कॅटेगरीचे असल्यास विद्यार्थ्याकडे त्यासाठीचे कागदपत्र असण गरजेच आहे.
  • या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी जर विद्यार्थी अपंग असेल तर त्याविषयी देखील विद्यार्थ्याकडे त्या संदर्भातील कागदपत्र असण गरजेच आहे.
  • सर्वात महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे बारावीनंतर नीट (NEET) ही परीक्षा देना आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणं अत्यंत गरजेचे आहे. या परीक्षेच्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्याला या कोर्समध्ये प्रवेश देण्यात येतो.

BHMS  full form in English | BHMS  full form in Marathi

BHMS full form in Marathiबॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी
BHMS  full form in EnglishBachelor of Homeopathy Medicine
BHMS प्रति वर्ष पगारप्रति वर्ष ₹3.4 लाख

बीएचएमएस प्रवेश प्रक्रिया

बीएचएमएस म्हणजेच बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. ही एक वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची पदवी आहे. यामध्ये विद्यार्थ्याला होमिओपॅथी संदर्भातील उपचारांबद्दल प्रशिक्षण देण्यात येतं. भरपूर विद्यार्थी बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात येण्यास उत्सुक असतात.

गुणांवरून एमबीबीएस चुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीएचएमएस हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आता नीट परीक्षा देणं गरजेच झालेला आहे. केंद्र स्तरावर आयोजित केली जाणारी ही एक स्पर्धा परीक्षा आहे.

नीट परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी चा निकाल लागल्यानंतर त्याच्या गुणावरून त्याचा क्षेत्र ठरवण्यात येतं आणि त्यानंतर त्याच्या आवडीनुसार तो त्याच्या आवडत्या क्षेत्रात किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. नीट ही परीक्षा केंद्र स्तरावर घेतली जात असून भरपूर महाविद्यालयांमध्ये याच्या गुणांवरतीच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

यामध्ये असेही काही महाविद्यालय आहे ज्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या खाजगी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येतात. आणि त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. काही महाविद्यालयांच्या खाजगी प्रवेश परीक्षा निम्नलिखित आहेत:

  • पंजाब युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट
  • आंध्र प्रदेश इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट
  • तेलंगाणा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल कॉमन एन्ट्रान्स टेस्ट
  • NIH BHMS प्रवेश परीक्षा
  • केरळा राज्य इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर आणि मेडिकल टेस्ट

बीएचएमएस कोर्स चा कालावधी

बी एच एम एस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरीचा होतो. वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना होमिओपॅथी क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण देण्यात येत. हा पदवी कोर्स ५ वर्ष आणि ६ महिने इतक्या कालावधीचा आहे.

याचे स्वरूप ४ वर्ष ६ महिने शिक्षण आणि त्यानंतर १ वर्षाची इंटर्नशिप असते. काही वर्षांपूर्वी एक वर्षाची इंटर्नशिप गरजेची नव्हती, परंतु आता एक वर्षाची इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे आणि, सर विद्यार्थ्यांनी एक वर्षाची इंटर्नशिप केली नाही तर त्याला पदवी देण्यात येत नाही. या कोर्ससाठी सत्र पद्धती वापरली गेली आहे, यामध्ये प्रत्येक वर्षात दोन सत्र असून, एकूण त्यामध्ये ९ सत्र असतात.

बीएचएमएस नंतर पुढील शिक्षणाच्या संधी

बीएचएमएस म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. हा एक ५ वर्ष ६ महिने कालावधीचा पदवी कोर्स आहे. हा वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अत्यंत महत्त्वाचं शिक्षण आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यामध्ये विद्यार्थ्याला होमिओपॅथी उपचाराविषयी प्रशिक्षण देण्यात येत. परंतु फक्त बीएचएमएस झालं म्हणजे सर्व काही सेटल झालं असं नसतं.

विद्यार्थ्याला एखाद्या विषयात नैपुण्य प्राप्त करणे गरजेच आहे. विद्यार्थीला ग्रॅज्युएशन झाल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन करणे देखील गरजेचे आहे. म्हणजेच बीएचएमएस ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी निम्नलिखित कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो:

  • एम डी
  • एम एच ए
  • एम एस्सी
  • एम एस
  • एम फिल
  • पी जी डी एम

Conclusion

या पोस्ट मधून आपण बीएचएमएस या विषयावर भरपूर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वप्रथम आपण बीएचएमएस चा पूर्ण फॉर्म जाणून घेतला जो की बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी असा आहे. त्यानंतर बीएचएमएस म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून जाणून घेतलं.

त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष आपण बघितला. त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया देखील आपण या पोस्ट मधून बघितली. त्यानंतर बीएचएमएस या कोर्सचा कालावधी देखील आपण या पोस्ट मधून बघितला.बीएचएमएस नंतर पुढील शैक्षणिक संधी देखील आपण या पोस्ट मधून बघण्याचा प्रयत्न केला. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा आमच्या साइटवर भेट देत रहा.

FAQ

बीएचएमएस हा कोर्स किती वर्षाचा असतो?

बीएचएमएस हे वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच अभ्यासक्रम असुन याचा कालावधी ५ वर्ष ६ महिने इतका आहे.

बीएचएमएस आणि एमबीबीएस मध्ये काय फरक आहे?

बीएचएमएस आणि एमबीबीएस हे दोन्ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे कोर्स आहेत. हे दोन्ही पदवी अभ्यासक्रम आहेत. याचा कालावधी देखील जवळजवळ सारखाच आहे. परंतु एमबीबीएस या क्षेत्रामध्ये ऍलोपॅथी उपचारा विषयी प्रशिक्षण देण्यात येतं आणि त्याच ठिकाणी बीएचएमएस या क्षेत्रामध्ये होमिओपॅथी उपचारा विषयी प्रशिक्षण देण्यात येत.

बीएचएमएस कोर्स करण्यासाठी किती खर्च येतो?

बीएचएमएस हा कोर्स करण्यासाठी साधारणपणे विद्यार्थ्याला २-३ लाख रुपये खर्च येऊ शकतो. शिक्षण खाजगी महाविद्यालयातून घेतलं जातंय की सरकारी महाविद्यालयामधून घेतल्या जाते यावरून देखील खर्च ठरवण्यात येतो. सरकारी महाविद्यालयांमधून कोर्स केल्यावर खर्च कमी येतो आणि खाजगी मधून केल्यावर जास्त खर्च येतो.

बीएचएमएस नंतर कोणत्या संधी आहेत?

बीएचएमएस ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा खाजगी क्लिनिक टाकून प्रॅक्टिस करू शकतो. जर त्याला पुढील शिक्षणाची आवड असेल तर बीएचएमएस नंतर विद्यार्थी एमडी किंवा एमएस देखील करू शकतो. एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रोफेसर म्हणून सुद्धा तुम्ही कामाला लागू शकता.

 संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top