BCA Full Form In Marathi बीसीए हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स असून याचा पूर्ण फॉर्म, बॅचलर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन असा आहे. बीसीए हा एक डिग्री कोर्स आहे ज्याचा कालावधी ३ वर्ष असा आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी पास असणं गरजेचं आहे. या क्षेत्रामध्ये, कंप्यूटर या विषयात रुची घेणारे विद्यार्थी सक्षमपणे हा कोर्स उत्तीर्ण करू शकतात.

BCA फुल फॉर्म BCA Full Form In Marathi
या कोर्समध्ये विद्यार्थ्याला कम्प्युटर विषयी सगळी माहिती दिली जाते. यामध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग, कम्प्युटर एप्लीकेशन, आणि त्याच प्रमाणे इतर कंप्यूटर शी निगडित गोष्टी शिकवल्या जातात. बीसीए हा एक कम्प्युटर सायन्स शी निगडित असलेला कोर्स आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी किंवा, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, बीसीए हा कोर्स करण्याचं प्रमाण आजकाल वाढत आहे.
BCA म्हणजे काय
बीसीए हा एक डिग्री कोर्स असून, कम्प्युटर सायन्स सोबत निगडित असा एक अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणारा कोर्स आहे. हा एक ३ वर्षाचा डिग्री कोर्स आहे. यामध्ये बहुतेक सगळे विषय कम्प्युटर लैंग्वेजेस म्हणजेच कम्प्युटरच्या भाषांबाबत असतात आणि, त्याचबरोबर काही विषय, सॉफ्टवेअर संदर्भात असतात.
माहिती तंत्रज्ञान, या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी बीसीए हा कोर्स करू शकतात. बीसीए कोर्स मध्ये असलेला अभ्यासक्रम संगणकाशी, संबंधित आहे. या कोर्समध्ये आपण संगणक उपयुगता शिकतो, त्याचबरोबर या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना, वेबसाईट तयार करणे, डेटाबेस व्यवस्थापित करणे, सॉफ्टवेअर बनवणे, विश्लेषण प्रणाली, आणि याबरोबरच भरपूर गोष्टी शिकवल्या जातात.
या सगळ्या विषयांविषयी शिक्षण घेतल्यानंतर, किंवा माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी कुठल्याही माहिती तंत्रज्ञान, म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरी सक्षमपणे मिळवू शकतो. बारावी मध्ये कम्प्युटर सायन्स हा विषय शिकलेले विद्यार्थी, बीसीए हा कोर्स, अत्यंत सहजपणे आणि सक्षम पणे उत्तीर्ण करू शकतात. कंप्यूटर बाबत कृषी ठेवणारे विद्यार्थी हा कोर्स करून त्यांना हवी असलेली नोकरी मिळवू शकतात.
BCA full form in marathi | BCA full form in English
BCA full form in Marathi | बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स |
BCA full form in English | Bachelor of Computer Applications |
BCA साठी लागणारा वेळ | 3 वर्ष |
BCA शुल्क | 15,000 ते 50,000 रु |
बीसीए साठी पात्रता
बीसीए या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थी नामांकित विद्यापीठातून बारावी पास झालेला असणं गरजेचं आहे. जर यदा कदाचित विद्यार्थी बारावी पास नसेल तर, त्या ठिकाणी बारावी समांतर असलेला एखादा डिप्लोमा कोर्स असणं गरजेचं आहे.
या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी कला, विज्ञान, किंवा वाणिज्य, यापैकी कुठल्याही क्षेत्रातून बारावी पास झालेला व्यक्ती बीसीए करू शकतो. फरक इतकाच, की जर विज्ञान क्षेत्रातून बारावी झालेली असेल, तर बीसीए मधील अभ्यासक्रम, त्या विद्यार्थ्यासाठी सोपा जातो कारण बरेचशे विषय विज्ञानासोबत निगडित असतात आणि मुख्यतः गणित या विषयासोबत निगडित असतात. बीसीए हा एक ३ वर्षाचा डिग्री कोर्स आहे.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील कुठल्याही कंपनीमध्ये नोकरी सहज मिळवू शकतो. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठलीच अवघड अशी पात्रता नसून फक्त बारावी पास झालेला विद्यार्थी सुद्धा, हा कोर्स करू शकतो.५०% अंक मिळवून कुठल्याही क्षेत्रातून, बारावी पास असलेला विद्यार्थी बीसीए या डिग्री कोर्समध्ये प्रवेश सहज घेऊ शकतो. या कोर्ससाठी कुठलीच नेमलेली किंवा वेगळी पात्रता अशी नाहीये.
BCA प्रवेश परीक्षा
काही महाविद्यालयांमध्ये बारावीच्या टक्क्यांवरून सुद्धा बीसीए या कोर्ससाठी प्रवेश देण्यात येतो. परंतु काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा ठेवण्यात येतात आणि त्या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले मार्कांसोबत उत्तीर्ण झाल्यास त्या महाविद्यालयात विद्यार्थी ला प्रवेश मिळतो. महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा सोबत मुलाखत सुद्धा घेतली जाऊ शकते परंतु मुलाकातीची शक्यता कमी असते. बीसीए या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी निम्नलिखित काही प्रवेश परीक्षा आहेत:
- AIMA UGAT – ही परीक्षा बीसीए या कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी दिली जाते, या परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतातल्या बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतात
- SUAT – शारदा युनिव्हर्सिटी ॲप्टीट्यूड टेस्ट, ही परीक्षा शारदा युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिली जाते.
- BUMAT – भारती विद्यापीठ, ही परीक्षा भारती विद्यापीठात बीसीए कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी दिली जाते.
BCA अभ्यासक्रम
बीसी हा एक डिग्री कोर्स असून हा कम्प्युटरशी निगडित एक महत्त्वाचा कोर्स आहे. हा कोर्स सक्षमपणे उत्तीर्ण करणारे विद्यार्थी, कुठल्याही माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये सहज नोकरी मिळवू शकतात. बीसीए या अभ्यासक्रमात विविध विषय शिकवले जातात. बीसीए या कोर्स अंतर्गत, प्रत्येक महाविद्यालयाचा अभ्यासक्रम वेगळा असू शकतो. बीसीए मध्ये शिकवले जाणारे काही विषय म्हणजे-
- मॅथेमॅटिक्स फाउंडेशन- प्रोग्रामिंग आणि कोडींग साठी अत्यंत गरजेचा असणारा विषय म्हणजे मॅथेमॅटिक्स फाउंडेशन हा आहे. गणितात चांगला असलेला विद्यार्थी, सहज कोटिंग आणि प्रोग्रामिंग करू शकतो. बीसीए मध्ये सुरुवातीच्या पहिल्या सेमिस्टर मध्येच, गणित शिकवल्या जात.
- ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग- हा विषय प्रोग्रामिंग मध्ये रुची ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रोग्रामिंग संदर्भातील भाषा आणि ऑब्जेक्ट शिकवले जातात.
- सी प्रोग्रामिंग- सी भाषा म्हणजेच सी लँग्वेज, ही, इतर सगळ्या प्रोग्रामिंग भाषांसाठी अत्यंत गरजेची मानली जाते. संगणक क्षेत्रातील मूलभूत समजण्यासाठी सी लँग्वेज ही अत्यंत गरजेची आहे. ऑपरेटिंग सिस्टिम लिहिताना सी भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते.
- वेब डेव्हलपमेंट- या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना, वेबसाईट तयार करणे, त्याला मेंटेन करणं, आणि त्याची देखरेख करणं शिकवल्या जात. या विषयांमध्येच वेब प्रोग्रामिंग, डेटाबेस मॅनेजमेंट, आणि वेब डिझाईन हे महत्त्वाचे विषय आहेत.
- फंडामेंटलस ऑफ कम्प्युटर- या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना, कम्प्युटर, कम्प्युटर अल्गोरिदम, आणि ओएस सारखे महत्त्वाचे विषय शिकवले जातात.
- AI – हा विषय बीसीए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचा आहे, कारण आज-काल सगळं काही AI ज्या जगात वळत चालल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना AI कसं काम करत, त्याचे शाखा, विषय, उपयोग, वैशिष्ट्य, उद्दिष्टे दृष्टिकोन इत्यादी शिकवण्यात येतं.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण बीसीए बद्दल भरपूर माहिती घेतली. सर्वप्रथम आपण बीसीएचा पूर्ण फॉर्म बघितला. डीसीएला बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन असं म्हणतात. त्यानंतर बीसी म्हणजे नेमकं काय हे आपण बघितलं. त्यानंतर बीसीए साठी किमान पात्रता बघितली.
बीसीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्या परीक्षा दिल्या पाहिजे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. काही महाविद्यालय बारावीच्या टक्क्यांवरून सुद्धा बीसीए या कोर्स साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, आणि त्याच ठिकाणी काही महाविद्यालय, प्रवेश परीक्षा ठेवतात, आणि त्या प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बीसीए या कोर्ससाठी प्रवेश देतात.
त्यानंतर आपण बीसीए या कोर्सचा अभ्यासक्रम बघितला ज्यामध्ये आपण बघितलं की, प्रत्येक महाविद्यालयाचा बीसीए या कोर्स संबंधित अभ्यासक्रम वेगळा असू शकतो. त्यानंतर आपण बीसीए कोर्स मध्ये, शिकवले जाणारे काही विषय बघितले, आणि त्यांच महत्त्व देखील बघितलं.
FAQ
बारावीनंतर बीसीए हा चांगला कोर्स आहे का?
हो, बारावी नंतर, आयटी क्षेत्रात त्यांचा करिअर करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीसीए हा उत्तम कोर्स आहे. बीसीए पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना सहज रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे पुढे शिकू इच्छित असणारे विद्यार्थी सुद्धा, बीसीए पूर्ण केल्यानंतर एमबीए किंवा एमसीए करू शकतात.
मी कॉमर्स सह बीसीए करू शकतो का?
हो, कुठल्याही क्षेत्रातून बारावी पास असलेला विद्यार्थी बीसीए हा कोर्स करू शकतो. बीसीए साठी पात्रता बघायची झाली, तर, कला, वाणिज्य, किंवा विज्ञान या तीन पैकी कुठल्याही क्षेत्रातून बारावी ५०% मिळवून पास झालेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात.
बीसीए मध्ये काय शिकवलं जातं?
बीसीए हा एक डिग्री कोर्स असून यामध्ये विविध विषय शिकवले जातात. हार्डवेअर सॉफ्टवेअर सांखिक संगणक अनुप्रयोग, हे सगळं या कोर्समध्ये शिकवण्यात येत. या कोर्स मधील मुख्य विषय म्हणजे, संगणक ग्राफिक्स, संगणक ॲनिमेशन, डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली, जावा प्रोग्रामिंग, सी प्रोग्रामिंग, ऑपरेटिंग सिस्टम, संगणक नेटवर्किंग आहेत.