बीएएमएस फुल फॉर्म BAMS Full Form In Marathi - Full Forms Marathi

बीएएमएस फुल फॉर्म BAMS Full Form In Marathi

BAMS Full Form In Marathi बीएएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा होतो. हे एक वैद्यकीय शैक्षणिक पद्धती आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक औषध विज्ञानाबाबत शिक्षण देण्यात येतं. यामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर गोष्टींबाबत शिक्षण दिलं जातं जसं, आहार, चिकित्सा, औषध, आणि त्याचबरोबर औषध आणि त्याच्या प्रभावाची माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात येते.

BAMS Full Form In Marathi

बीएएमएस फुल फॉर्म BAMS Full Form In Marathi

बी ए एम एस हे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच पदवी कोर्स आहे. हा एक असा कोर्स आहे ज्यामध्ये, औषधीय चिकित्सेच्या, पारंपरिक तंत्रज्ञानाचा अध्ययन करण्यात येतं. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध गोष्टी शिकवल्या जातात जसं आहार, आहाराचे प्रकार, प्रमुख खाद्यपदार्थ, औषधी गुणांची माहिती आणि बरच काही.

आयुर्वेदिक चिकित्सा शैलीमध्ये, आध्यात्मिक व धार्मिक संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात येते. बीएएमएस वैद्यकीय क्षेत्रातील ही चिकित्सक शैली आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली आहे.

बीएएमएस पात्रता निकष

बीएएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा होतो. हे वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचं पदवी कोर्स आहे यामध्ये आयुर्वेदिक औषधांबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येतो.बीएएमएस या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • यामध्ये सर्वप्रथम पात्रता ची अट म्हणजे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असला पाहिजे. कुठल्याही मान्यताप विद्यालया मधून त्यांनी बारावी उत्तीर्ण केले पाहिजे आणि बारावी मध्ये विज्ञान हा विषय शिकलेला असला पाहिजे आणि त्यामध्ये किमान ५०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले पाहिजे
  • काही आयुर्वेदिक संस्था प्रवेश साठी प्रवेश परीक्षा ठेवत असतात त्या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी बीएएमएस कोर्समध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो
  • भरपूर महाविद्यालयांमध्ये बीएएमएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी एनइइटी (NEET) ही परीक्षा देना आवश्यक असतं आणि भरपूर महाविद्यालय या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवरती विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात त्याचबरोबर काही महाविद्यालय त्यांच्या खाजगी प्रवेश परीक्षा देखील ठेवत असतात आणि त्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येतो.
  • बारावी मध्ये विज्ञान क्षेत्रात भौतिकशास्त्र, रसायनिक शास्त्र, आणि त्याचबरोबर जीवशास्त्र शिकलेलं असणं, गरजेचं आहे.

BAMS full form in English |  BAMS full form in Marathi

BAMS full form in Marathiबॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी
BAMS full form in EnglishBachelor of Ayurvedic Medicine and Surgery
BAMS ही डॉक्टरची पदवी आहेहो
भारतातील BAMS पगार₹90,004 प्रति महिना

बीएएमएस चे महाविद्यालय

बीएएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अंड सर्जरी असा होतो. ही वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची पदवी आहे. भारत मध्ये भरपूर आयुर्वेदिक महाविद्यालया आहेत आणि त्याचबरोबर भरपूर सारे खाजगी आणि सरकारी महाविद्यालय देखील आहेत, यामधील काही मुख्य आयुर्वेदिक महाविद्यालय निम्नलिखित आहेत:

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, नवी दिल्ली
  • ही भारतातील प्रमुख आयुर्वेदिक संस्था आहे ज्यामध्ये हा कोर्स शिकवण्यात येतो.
  • गोविंद बल्लभ पंत आयुर्वेद महाविद्यालय, मुंबई
  • हे महाविद्यालय मुंबईतील सर्वोत्तम महाविद्यालय आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक अभ्यासक्रम शिकवला जातो.
  • राजीव गांधी आयुर्वेद महाविद्यालय हे महाराष्ट्र मध्ये स्थित एक आणखीन आयुर्वेदिक महाविद्यालय आहे त्यामध्ये बीएएमएस हा पदवी कोर्स शिकवण्यात येतो.
  • बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी
  • हे भारत मधील सर्वात श्रेष्ठ महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय आहे ज्यामध्ये हा कोर्स शिकवण्यात येतो.
  • नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर आयुर्वेद, नयी दिल्ली

ही एक आग्रगण्य आयुर्वेदिक संस्था आहे ज्यामध्ये बीएएमएस नावाचा हा पदवीधर कोर्स शिकवण्यात येतो.

वर दिलेले सर्व भारतातील सर्वोत्तम आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत आणि बारावी उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी यामधील कुठल्याही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन हा कोर्स पूर्ण करू शकतो.

बीएएमएस मध्ये प्रवेश कसा घ्यायचा

बीएएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. बारावी मध्ये विद्यार्थी विज्ञान हे विषय शिकलेला असणे गरजेचे आहे.

हा एक पदवीधर कोर्स आहे जो की वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा देत असतात, आणि त्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो.

नीट चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी विविध आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतात आणि त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करू शकतात. प्रवेश घेण्यासाठी अजून इतर काही माहिती जाणून घेण्यासाठी ठराविक महाविद्यालयाकडे चौकशी करण्यासाठी संपर्क करायचा आणि त्याचबरोबर आवश्यक संपर्क तपशील देखील भरायच्या.

बीएएमएस नंतर नोकरीच्या संधी

बीएएमएस म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, हा वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे, यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेऊ शकतो, यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी आयुर्वेदिक औषधांबबाबत खाद्यपदार्थांबाबत आहारांबाबत आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत प्रशिक्षण घेत असतो.

हा पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या भरपूर संधी तयार होतात जसं वैद्यकीय शोध, संशोधन, वैद्यकीय रुग्णालय, आयुर्वेदिक चिकित्सक, अध्यापक, त्याचबरोबर आयुर्वेदिक क्षेत्रातील विविध औषधांचा व्यवसाय देखील तुम्ही करू शकता.

विविध आयुर्वेदिक कंपनी आणि केंद्रांमध्ये देखील भरपूर नोकरी उपलब्ध असतात. परंतु पदवी घेतल्यानंतर इतक्यात थांबणं योग्य नसून यामध्ये पुढील शिक्षण घेणं देखील तितकच महत्त्वाचा आहे, पुढील शिक्षण घेतल्यास नोकरीमध्ये आणि वेतन मध्ये बढो तरी होत असते आणि यामध्ये पुढील शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाच आहे.

बीएएमएस हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी स्वतःची खाजगी प्रॅक्टिस देखील सुरू करू शकतो परंतु यामध्ये सुरुवातीला जास्त वाव मिळत नाही आणि त्यामुळे पुढील शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचा आहे कुठलाही रुग्ण, अनुभव असलेल्या डॉक्टरकडेच जाणं बरोबर समजतो त्यामुळे जितकं जास्त शिक्षण आणि अनुभव असेल तितकं जास्त रुग्ण तुमच्याकडे येतील.

बीएएमएस नंतर शिक्षणाच्या संधी

बीएएमएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा होतो. हा वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. या कोर्समध्ये बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.बीएएमएस हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाच्या संधी निम्नलिखित आहेत:

  • एमडी/एमएस- बीएएमएस हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एमडी म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि एम एस म्हणजेच, मास्टर ऑफ सर्जरी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. हे कोर्स केल्यानंतर आयुर्वेदिक क्षेत्रातील अत्यंत उच्च स्तरावरच डॉक्टर बनण्याची संधी आपल्याला मिळते.
  • पीजी डिप्लोमा कोर्स – यामध्ये विद्यार्थी कुठल्याही त्याच्या आवडत्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकतो जसं, रसायन विज्ञान, औषध तंत्र, आयुर्वेद शिक्षण, हे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत.
  • पीएचडी इन आयुर्वेदा- आग्रगण्य विश्वविद्यालयामध्ये, आयुर्वेदिक विज्ञानात, अध्ययन करायची संधी असते, आणि यामुळे आपल्याला डॉक्टराला पदवीसाठी अर्ज करावा लागतो.

बीएएमएस हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेणं अत्यंत गरजेचे आहे हे सर्व पुढील शिक्षणाचे पर्याय असून यामधील कुठलाही पर्याय निवडला तर विद्यार्थी या क्षेत्रात आणखीन प्रगल्भ होतो आणि त्याच्या नोकरीच्या आणि वेतनच्या संधी आणखी वाढतात.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण बीएएमएस या विषयावर बरीच माहिती घेतली. सर्वप्रथम आपण बीएएमएस चा पूर्ण फॉर्म समजून घेऊन बीएएमएस म्हणजे नेमकं काय हे सुद्धा बघितलं. त्यानंतर या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण बघितलं. त्यानंतर भारत मध्ये स्थित आयुर्वेदिक महाविद्यालयांची यादी देखील आपण या पोस्ट मधून बघितली.

त्यानंतर आपण या कोर्समध्ये प्रवेश कसा घ्यायचा हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं, त्यानंतर हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे आहेत हे देखील आपण या पोस्टमधून बघितला आणि त्यानंतर हा कोर्स केल्यानंतर पुढील शिक्षणाच्या संधी काय आहे हे सुद्धा आपण या पोस्ट मधून बघितलं. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

बीएएमएस या पाठ्यक्रमामध्ये कुठले विषय शिकवले जातात?

यामध्ये आयुर्वेदिक क्षेत्रासोबत निगडित असलेले भरपूर विशेष शिकवले जातात जसं, रसायनशास्त्र, औषध विज्ञान, शल्यचिकित्सा, अंत दृष्टी, व्याधीलक्षण विज्ञान, इत्यादी विषय शिकवले जातात.

बीएएमएस पदवीसाठी प्रवेश कसा मिळतो?

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी नीट नावाची परीक्षा देत असतो आणि त्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या कोर्समध्ये प्रवेश घेता येतो, त्याचबरोबर काही खाजगी महाविद्यालय त्यांच्या खाजगी परीक्षा देखील आयोजित करत असतात आणि त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या खाजगी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून तिथे प्रवेश घेता येऊ शकतो.

बीएएमएस पदवीच पात्रता काय आहे?

यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर नीट परीक्षा देऊन ती उत्तीर्ण करणे गरजेचे आहे आणि त्या परीक्षेमधील मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्याला या कोर्समध्ये प्रवेश घेता येतो

बीएएमएस पदवीनंतर कोणती पदवी घेऊ शकतात?

बीएएमएस पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एमडी किंवा एम एस ही पदवी देखील घेऊ शकतो किंवा आयुर्वेद या क्षेत्रात पीएचडी देखील घेऊ शकतो.

बीएएमएस डॉक्टर च वेतन किती असत?

विविध क्षेत्रांमध्ये बीएएमएस डॉक्टरचे वेतन वेगळं असू शकतं जसं सरकारी क्षेत्रामध्ये वेतन जास्त असू शकतं आणि खाजगी मध्ये कमी वेतन मिळू शकत.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top