BCS Full Form In Marathi बीसीएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असा होतो. यालाच आपण मराठीत संगणक शास्त्रातील स्नातक असं देखील म्हणतो.बीसीएस हा एक संगणक शास्त्रातील पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. फक्त महाराष्ट्रात नसून देशभरात या कोर्सला संगणक क्षेत्रातील एक पदवीधर कोर्स म्हणून ओळखला जातो.

बीसीएस फुल फॉर्म BCS Full Form In Marathi
बीसीएस नावाचा हा पदवी अभ्यासक्रम ३ वर्ष इतक्या कालावधीचा आहे. यामध्ये प्रत्येक सहा महिन्याला एक सत्र असतो. या कालावधीमध्ये ६ सेमिस्टर चा समावेश असतो आणि प्रत्येक सेमिस्टर ची एक अंतिम परीक्षा होत असते. ज्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात काही तरी करायचा आहे किंवा आयटी क्षेत्रात नोकरी मिळवायची आहे असे विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेत असतात.
या कोर्समध्ये संगणक क्षेत्रातील सर्व भाषा म्हणजेच, पायथन, जावा, सी, सी प्लस, या सगळ्या भाषांचा समावेश असतो. संगणकासोबत संबंधित असलेल्या इतर भूत माहिती या कोर्समध्ये विद्यार्थ्याला देण्यात येतात. हा एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दरवर्षी भरपूर विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेत असतात.
इंजीनियरिंग क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कोर्स म्हणजे बीसीएस आहे. ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी कुठल्याही कंपनीमध्ये सहज जॉब मिळवू शकतो. आयटी सेक्टर मध्ये देखील जॉब मिळवणं या पदवी सोबत अत्यंत सोप आहे. ज्या विद्यार्थ्यांना संगणक या क्षेत्रात रुची आहे ते यामध्ये पुढील शिक्षण देखील घेऊ शकतात आणि त्याचबरोबर चांगल्या वेतनाची आणि चांगल्या दर्जाची नोकरी देखील मिळवू शकतात.
बीसीएस पात्रता निकष
बीसीएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असा होतो. या कोर्समध्ये जर विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला निम्नलिखित पात्रता निकष पूर्ण करण गरजेच आहे:
- या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे किंवा त्यासोबत समतुल्य कुठल्याही शिक्षण घेतलं असेल तर ते देखील चालेल त्याचबरोबर डिप्लोमा कोर्स देखील या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी चालेल.
- यामध्ये विद्यार्थ्याकडे इयत्ता बारावी मध्ये गणित विषय असणे गरजेचे आहे कारण संगणकाचा प्रत्येक भाग गणितावर अवलंबून असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्याला गणित येणे हे अत्यंत आवश्यक आहे.
- बारावी विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्याला ४५% किंवा त्याहून जास्त गुण असणं गरजेचं आहे.
- काही महाविद्यालय बीसीएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेत असतात, त्या प्रवेश परीक्षांना उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात.
- काही महाविद्यालय बारावी मध्ये किंवा डिप्लोमा मध्ये इंग्लिश आणि गणित हे विषय असले तर ते बघूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात याचा अर्थ जर विद्यार्थी कलाक्षेत्रातला जरी असेल तरी गणित या विषयामुळे त्याला या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येतो.
BCS full form in English | BCS full form in Marathi
BCS full form in Marathi | बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स |
BCS full form in English | Bachelor of Computer Science |
12वी नंतर BCS करू शकतो का | होय |
BCS पगार किती आहे | प्रति वर्ष ₹1.7 लाख |
बीसीएस कोर्सचा अभ्यासक्रम
बीसीएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असा होतो. या अभ्यासक्रमामध्ये संगणकाविषयी सगळी माहिती आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत यामध्ये संगणकाच्या विविध भाषा जसं पायथन, सी प्लस, जावा, याविषयी प्रशिक्षण देण्यात येत. संगणकीय टूल्स आणि डेव्हलपमेंट टूल्स याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत. यामध्ये निम्नलिखित विषय शिकवले जातात:
- इलेक्ट्रॉनिक सायन्स
- संगणकाला गरजेचे असलेले गणितीय विषय
- सी प्रोग्रामिंग
- डाटाबेस
- कम्प्युटर नेटवर्क
- जावा प्रोग्रामिंग
- ऑपरेटिंग सिस्टीम
- थर्टीकल कम्प्युटर सायन्स
- डाटा स्ट्रक्चर युजिंग सी
- आर डी बी एम एस
- कम्प्युटर ग्राफिक्स
- सॉफ्टवेअर इंजीनियरिंग
- इंटरनल प्रोग्रामिंग
वर दिलेले सगळे विषय बीसीएस नावाच्या या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असतात.
बीसीएस नंतर करिअरच्या संधी
बीसीएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असा होतो. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावीनंतर पात्र ठरतात. यामध्ये संगणकामध्ये रुची ठेवणारे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. सध्याच्या काळात भारत मध्ये आयटी क्षेत्र सगळ्यात जास्त प्रमाणात वाढत आहे.
भरपूर विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. ही पदवी पूर्ण केल्यानंतर भरपूर आयटी कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी मिळण्या ची शक्यता असते आणि एखादा चांगले कॉलेजमधून बीसीएस कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला सहज ४ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असा वार्षिक पॅकेज मिळत असतो.
फक्त बीसीएस करून नोकरी मिळवायची असेल तर यामध्ये एक दोष असा असतो की बीसीएस केल्यानंतर नोकरी मिळते परंतु यामध्ये वेतनामध्ये वाढ होत नाही आणि यामुळे काही कालावधीनंतर वेतन मध्ये वाढ असली, तरी एका क्षणाला असं वाटू लागतं, की उच्च दर्जावर असलेल्या अधिकारी, किंवा कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी आपण शैक्षणिक पातळी कमी राहिल्यामुळे, नाही आलो, त्यामुळे बीसीएस झाल्यानंतर, पुढील शिक्षण घेण गरजेच आहे.
त्यामुळे फक्त ही पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या मागे न पळता पुढील शिक्षण पूर्ण केला पाहिजे ज्यामुळे चांगली नोकरी आणि त्याच सोबत चांगलं वेतन देखील मिळेल.
बीसीएस नंतर शिक्षणाच्या संधी
बीसीएस म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि या पदवीधर कोर्समध्ये विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. संगणक क्षेत्रामध्ये रुची ठेवणारे विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेत असतात. आयटी क्षेत्रात नोकरी करायला उत्सुक असणारे विद्यार्थी ही पदवी घेत असतात. बीसीएस नंतर शिक्षणाच्या संधी निम्नलिखित आहेत:
- विद्यार्थी एमसीई किंवा एमसीएस सारख्या कोर्स मध्ये पुढील शिक्षण पूर्ण करू शकतो
- विद्यार्थी यामध्ये पदवी उत्तर कोर्स देखील करू शकतो, काही विशेष विषयांमध्ये हे कोर्स करता येऊ शकतात जसं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग इत्यादी.
- विद्यार्थी बीसीएस पूर्ण केल्यानंतर एमटेक मध्ये देखील प्रवेश घेऊ शकतो.
बीसीएस केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यात अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगली नोकरी आणि त्याचबरोबर चांगला वेतन देखील मिळेल.
Conclusion
या पोस्टमध्ये आपण बीसीएस या विषयावर बरीच माहिती घेतली. यामध्ये सर्वप्रथम बीसीएस चा पूर्ण फॉर्म काय आहे आणि त्यानंतर बीसीएस म्हणजे नेमकं काय हे देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतलं. त्यानंतर बीसीएस या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण या पोस्ट मधून बघितले.
बीसीएस कोर्सच्या अभ्यासक्रमाबद्दल पण आपण या पोस्टमध्ये चर्चा केली. त्यानंतर बीसीएस पूर्ण केल्यानंतर करिअरच्या संधी म्हणजेच नोकरीच्या संधी काय आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून बघितलं आणि त्यानंतर बीसीएस हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील शैक्षणिक संधी काय काय आहेत हे देखील आपण या पोस्ट मधून समजण्याचा प्रयत्न केला. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.
FAQ
बीसीएस झाल्यानंतर किती पगार मिळू शकतो?
बीसीएस हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी कंपनीमध्ये विद्यार्थ्याला ३-१० इतका पॅकेज मिळू शकतो. या क्षेत्रामधील सर्वात कमी पॅकेज म्हणजे ३.५ लाख इतक आहे.
बीसीएस कोर्सची फीस किती असते?
प्रत्येक महाविद्यालयानुसार आणि संस्थेनुसार बीसीएस या अभ्यासक्रमाची फीस वेगवेगळे असू शकते याच ठिकाणी जर तुम्ही अनुदानित बीसीएस मध्ये प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला या पदवी कोर्ससाठी ५० हजार इतका खर्च येऊ शकतो आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही बीसीएस एखाद्या खाजगी महाविद्यालयामधून करत असाल तर त्याचा खर्च तुम्हाला २-३ लाखांपर्यंत येऊ शकतो.
बीसीएस साठी गणित अनिवार्य आहे का?
हो, बीसीएस या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी मध्ये विद्यार्थी कडे गणित विषय असणे गरजेचे आहे आणि बारावी मध्ये विद्यार्थ्याला किमान ४५% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क असणे गरजेच आहे.
बीसीएस चा अभ्यासक्रम काय आहे?
बीसीएस हा एक तीन वर्षाचा आणि सहा सेमेस्टर चा कोर्स असून यामध्ये प्रत्येक सेमिस्टर मध्ये अंतिम परीक्षा होत असते आणि त्याचबरोबर, यामध्ये विविध संगणक विषय आणि संगणक भाषा म्हणजेच जावा, c+ यांचा देखील समावेश असतो.
बीसीएस ला मराठी मध्ये काय म्हणतात?
बीसीएस चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असा होतो आणि याला मराठी भाषेत,संगणक शास्त्रातील स्नातक असं देखील म्हणतात.