नाबार्ड फुल फॉर्म NABARD Full Form In Marathi - Full Forms Marathi

नाबार्ड फुल फॉर्म NABARD Full Form In Marathi

NABARD Full Form In Marathi नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो. ग्रामीण विकासाच्या उद्देशाने सरकारने ग्रामीण विकासासाठी स्थापित केलेली हे एक शिखर बँक म्हणजेच नाबार्ड आहे. नाबार्डच्या मदतीने आज ग्रामीण भागात विकास झालेला आहे.

NABARD Full Form In Marathi

नाबार्ड फुल फॉर्म NABARD Full Form In Marathi

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि देशाची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात ही ग्रामीण भागावर निर्भर असते. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी विकासात उद्योगांना आणि शेतीला कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवण्याचं काम ही बँक करत असते.

व्यवस्थापकीय संचालक हे नाबार्ड चे कार्य बघत असतात. अर्थसंकल्प हे केंद्र सरकारकडून नाबार्ड साठी सादर केले जातात. यामध्ये ग्रामीण आणि कृषी विभागाच्या विकासासाठी राज्य सरकार सुद्धा अर्थसंकल्पात जागा देत असतात. नाबार्ड या बँकेची स्थापना १२ जुलै १९८२ या दिवशी झाली होती. ग्रामीण विकासासाठी ज्या ठिकाणी संस्थेला कर्जाची गरज आहे त्या ठिकाणी कर्ज पोहोचवणं आणि कर्जाचा पुरवठा करून देणं हे नाबार्डचं कार्य आहे.

नाबार्ड (NABARD) चा इतिहास

शिवरामन समितीची शिफारस आल्यामुळे त्यांनी देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात विकास होण्यासाठी एक संस्था असावी असा प्रस्ताव १९८१ यावर्षी मांडला. समितीचे शिफारसी मुळे कायदेशीर, सगळं कायद्यांचा अभ्यास करून आणि अत्यंत कायदेशीर रित्यास १२ जुलै १९८२ या रोजी नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट या बँकेची स्थापना झाली होती.

नाबार्डच्या स्थापने आधी आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी पत विभाग आणि ग्रामीण नियोजन आणि पतविभाग हा समलित होत होता. या ठिकाणी नाबार्ड ची स्थापना झाल्यानंतर त्याची जागा देखील नाबार्डने घेतली. नाबार्डचे एक मात्र लक्ष म्हणजे ग्रामीण आणि कृषी विभागाचा विकास हाच होता.

ग्रामीण भागात सुरू असलेले व्यवसाय म्हणजेच लघुउद्योग, ग्राम उद्योग, कृषी, हस्तकला, या सगळ्या गोष्टींना विकास आणि ग्रामीण विकास यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि देशांमध्ये सर्वात शिखर बँक म्हणून नाबार्ड असावी हे स्वप्न आणि आदेश भारत सरकारने बघितला होता.

या बँकेच्या मदतीने ग्रामीण विकासात एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज असेल तर ते पूर्ण होईल आणि त्यामुळे ग्रामीण आणि कृषी विभागाचा विकास होईल हेच एक मात्र उद्देश्य सरकारचं होतं.

NABARD full form in English |  NABARD full form in Marathi

NABARD full form in Marathiनॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट
NABARD full form in EnglishNational Bank for Agriculture and Rural Development
NABARD चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेतShaji K V
NABARD चे मुख्यालय कोठे आहेमुंबई

नाबार्ड (NABARD) ची कार्य

नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो. नाबार्ड नावाच्या या संस्थेची काही मुख्य काम निम्नलिखित आहेत:

  • नाबार्ड नावाची ही संस्था ग्रामीण विकासासाठी मदत करत असते.
  • पुनर्वसन कार्यात मदत करून त्यावर देखरेख ठेवणं हे काम देखील नाबार्ड संस्था करत असते.
  • आय आर डी पी म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा देखील नाबार्डच्या अंतर्गत असतो आणि यामुळे आयआरडीपी साठी वेगळा निधी आणि मुख्य लक्ष देखील निर्धारित करण्यात येत.
  • कृषी कर्जासाठी नाबार्ड करून पुरवठा केला जातो.
  • ग्रामीण भागात लघु आणि कुटीर उद्योगांसाठी कर्ज पुरवण्याचे काम हे नाबार्ड कडून केलं जातं.
  • ग्रामीण विकासासाठी जिथे संस्थेला कर्जाची गरज असते त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणे हे देखील नाबार्ड संस्थेकडून केलं जातं.
  • ग्रामीण विकासामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज असेल, तर त्या व्यक्तीला कर्ज पुरवण्याची काळजी देखील नाबार्ड ही संस्था घेत असते.
  • दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमात देखील नाबार्ड चा मोठा सहयोग असतो.
  • सहकारी आणि प्रादेशिक बँकेवर काही प्रमाणात नाबार्डच्या अंतर्गत असतं याचं कारण म्हणजे अनेकदा या बँका ग्रामीण विकासामध्ये आणि शेती संबंधित असतात. यामुळे त्यांच्यासाठी मदत आणि कारणास्तव मार्गदर्शन करणे हे अत्यंत गरजेच आहे, आणि हे कार्य देखील नाबार्ड करत असतं.

नाबार्ड (NABARD) ग्रामीण कर्ज

नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो. देशभरात नाबार्ड अंतर्गत काम चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी योजना ही नाबार्ड कडून बनवण्यात येते. नाबार्ड अंतर्गत प्रत्येक वर्षाला अशी वार्षिक पत योजना जिल्हा निहाय बनवण्यात येते.

वार्षिक पत योजनेमध्ये ग्रामीण क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचा विकास हे समाविष्ट असतं. यानंतर ग्रामीण सहकारी आणि प्रादेशिक बँकांमध्ये किती पत असावी याचा मार्गदर्शन देखील नाबार्ड करून मिळत असतं. ग्रामीण विकास कार्यांना चालना कशी देता येईल याकडे देखील नाबार्ड च लक्ष असतं. विकास कार्यक्रम राबवणं आणि त्याची अंमलबजावणी करण आणि गुंतवणूक आणि उत्पादक क्रेडिट देण्याचं कार्य देखील नाबार्ड करत असतं.

नाबार्ड आणि आरबीआय

नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो. आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे आणि नाबार्डचा आरबीआयच्या अंतर्गत समावेश केला जातो. आरबीआय ही बँकांसाठी एक नियमावली बनवण्याचं काम करत असते.

बँकिंग कायदा १९४९ अनुसार आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही एक संस्था आहे जी संपूर्ण देशातील बँकांवर नियंत्रण ठेवत असते आणि महत्त्वाची वित्तीय संस्था देखील आहे. नाबार्डचे संचालक मंडळ देखील रिझल्ट बँक ऑफ इंडिया अंतर्गत बनवले असतात.

नाबार्ड संचालक मंडळावर रिझर्व बँकेचे एकूण तीन संचालक उपस्थित असतात. हे तीन संचालक आरबीआय आणि नाबार्ड मधील दुवा असतात. नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागात विकास करण्यासाठी आणि योजनांना लागणाऱ्या सर्व प्रादेशिक किंवा सहकारी बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठी शिफारस हे आरबीआय कडे जात असतं. हेच कारण आहे की नाबार्ड सोबत आरबीआयला देखील ग्रामीण भागाच्या विकासासाठी तितकच श्रेय दिलं जातं.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण नाबार्ड बद्दल बरीच माहिती समजून घेतली. सर्वप्रथम नाबार्ड चा पूर्ण फॉर्म काय आणि नाबार्ड म्हणजे नेमकं काय हे आपण या पोस्ट मधून समजून घेतलं.नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो. त्यानंतर नाबार्ड चा इतिहास देखील आपण या पोस्ट मधून समजून घेतला. त्यानंतर नाबार्डची कार्य देखील आपण या पोस्ट मधून बघितली.

नाबार्ड आणि ग्रामीण कर्ज हा विषय देखील आपण या पोस्ट मधून बघितला. आणि नाबार्ड आणि आरबीआय या दोघांचं समावेशित ग्रामीण विभागाच्या विकासासाठी असलेले योगदान देखील आपण या पोस्ट मधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

नाबार्ड ची स्थापना कधी झाली होती?

नाबार्ड नावाच्या या संस्थेची स्थापना १२ जुलै १९८२ यावर्षी करण्यात आली होती.

नाबार्ड चा पूर्ण फॉर्म काय आहे?

नाबार्ड चा पूर्ण फॉर्म नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असा होतो. यालाच आपण मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक असे देखील म्हणतो.

नाबार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

२७ मे २०२० पासून नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे अध्यक्ष डॉ. जी आर चिंताताल हे आहेत.

नाबार्डच्या परीक्षानमार्फत कोणत्या पदांची भरती होत असते?

नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चरल अँड डेव्हलपमेंट यामध्ये परीक्षांमार्फत ग्रेड ए आणि ग्रेड बी मधल्या पदांची भरती होत असते यामध्ये व्यवस्थापक, आणि सहाय्यक व्यवस्थापक, या दोन पदांसाठी भरती करण्यात येते.

नाबार्ड चे मुख्यालय कुठे आहे?

नाबार्ड च मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे स्थित आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top