बीकॉम फुल फॉर्म BCOM Full Form In Marathi - Full Forms Marathi

बीकॉम फुल फॉर्म BCOM Full Form In Marathi

BCOM Full Form In Marathi बीकॉम चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉमर्स असा होतो. यालाच आपण मराठी भाषेत वाणिज्य शाखेतील पदवीधारक असा देखील म्हणतो. हा एक पदवीधर कोर्स असून बारावीनंतर विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. बारावी उत्तीर्ण केल्यावरती विद्यार्थ्याला जर वाणिज्य म्हणजेच कॉमर्स या क्षेत्रात करिअर करायचा असेल तर बीकॉम हा अत्यंत उत्तम पर्याय आहे.

BCOM Full Form In Marathi

बीकॉम फुल फॉर्म BCOM Full Form In Marathi

अकरावी आणि बारावीचे शिक्षण वाणिज्य क्षेत्रातून झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बीकॉम हा एक सोयीस्कर आणि उत्तम पर्याय ठरतो. परंतु असे विद्यार्थी ज्यांचा अकरावी आणि बारावीचे शिक्षण विज्ञान या क्षेत्रात झालय आणि आता त्यांना वाणिज्य या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तर ते देखील यामध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतात.

हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असतो. बीकॉम हा पदवीधर कोर्स विद्यार्थी तीन प्रकारे पूर्ण करू शकतो, रेग्युलर, ऑनलाइन आणि दुरुस्त हे तीनही मार्ग बी कॉम करण्यासाठी विद्यार्थ्याकडे उपलब्ध असतात. वाणिज्य क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी हे अत्यंत पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे.

वाणिज्य क्षेत्रातून अकरावी आणि बारावी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी इतर कुठलेही पर्याय न निवडता बीकॉम हा पर्याय सर्वप्रथम निवडण्या साठी उत्सुक असतात. महाराष्ट्र राज्य मध्ये बीकॉम, हा कोर्स दोन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो.

यालाच बीकॉम ऑनर्स आणि बीकॉम जनरल या दोन भागात विभागल गेलय. आणि यामध्ये अनेक विद्यापीठ असे देखील आहे ज्यामध्ये बीकॉम सहित, बीए एलएलबी असे कोर्सेस देखील एकत्र करण्यास मदत करतात. ज्या पद्धतीने विज्ञान या क्षेत्रात स्पेशलिझेशन असतं तसंच बीकॉम ऑनर्स या क्षेत्रात देखील स्पेशलाईजेशन असतं. बीकॉम या अभ्यासक्रमामध्ये वित्त आणि वाणिज्य वरती सर्व अभ्यासक्रम अवलंबून असतो.

बीकॉम पात्रता निकष

बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स. हा एक पदवीधर कोर्स असून यामध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेतात. अकरावी आणि बारावी वाणिज्य क्षेत्रात पूर्ण झालेले विद्यार्थी हा कोर्स निवडतात. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • विद्यार्थ्यांचा अकरावी आणि बारावीचे शिक्षण वाणिज्य या क्षेत्रातून झालेला असणे गरजेच आहे. काही विद्यापीठ विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील बीकॉम साठी प्रवेश देतात परंतु सगळ्याच विद्यापीठात हे गरजेच नाहीये.
  • प्रत्येक महाविद्यालयाचे नियम आणि गुणांची संख्या वेगळी असते परंतु साधारणतः विद्यार्थ्याला बारावी मध्ये ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं गरजेचं आहे.
  • काही विद्यापीठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना बीकॉम या पदवीधर कोर्समध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांचे खाजगी स्पर्धा प्रवेश परीक्षा देखील ठेवत असतात. आणि अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ती पातळता परीक्षा देणार गरजेच आहे. ती परीक्षा दिल्यानंतर आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये बी कॉम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.
  • भरपूर महाविद्यालय असे देखील आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांवरतीच बी कॉम या पदवीधर कोर्समध्ये प्रवेश देत असतात.

BCOM  full form in English | BCOM  full form in Marathi

BCOM full form in Marathiबॅचलर ऑफ कॉमर्स
BCOM  full form in EnglishBachelor of Commerce
BCOM प्रति वर्ष पगार2,50,000 ते रु. 4,50,000 प्रतिवर्ष
बीकॉम पदवीसाठी लागणारा वेळतीन वर्षांचा पूर्णवेळ

बीकॉम पदवीसाठी खर्च

बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स यालाच आपण मराठी मध्ये वाणिज्य क्षेत्रातील पदवीधारक असे देखील म्हणतो. या कोर्समध्ये अकरावी आणि बारावी वाणिज्य क्षेत्रातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेत असतात. वाणिज्य क्षेत्रातून बारावी झालेले विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी देखील बीकॉम साठी प्रवेश घेऊ शकतात.

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी मध्ये किमान ५०% गुण मिळवणं गरजेचं आहे.विद्यार्थी कुठल्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून बी कॉम चे शिक्षण घेतोय यावर त्याचा फीस चा खर्च ठरतो. ₹५०००- ₹३,००,००० साधारण इथपर्यंत बीकॉम करण्यासाठी खर्च येऊ शकतो. काही महाविद्यालयांमध्ये, सरकारी शिष्यवृत्ती मिळवून देत असतात, आणि त्यामुळे जरी फीस जास्त असली तरी शिष्यवृत्तीमुळे ती फीस कमी होते.

बीकॉम साठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय

बीकॉम चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉमर्स असा आहे. बीकॉम लाच मराठी भाषेत वाणिज्य क्षेत्रातील पदवीधारक असे देखील म्हणतात. अकरावी आणि बारावी मध्ये वाणिज्य क्षेत्रातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेतात. बीकॉम हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे.

बीकॉम करण्यासाठी भरपूर महाविद्यालयाने विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतात. काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवरतीच प्रवेश देण्यात येतो आणि काही महाविद्यालयांमध्ये त्यांच्या खाजगी प्रवेश परीक्षा होत असतात. त्या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थी त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो. महाराष्ट्रातील काही सर्वोत्कृष्ट बीकॉम साठीचे महाविद्यालय निम्नलिखित आहेत:

  • सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, पुणे
  • सेंट मीरास कॉलेज फॉर गर्ल्स
  • बी के बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स
  • एम एम सी सी, पुणे
  • एम आय टी- वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
  • बी एम सी सी, पुणे
  • नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
  • अमृत बेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
  • के जे सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स
  • इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
  • के पी बी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स

बीकॉम नंतर नोकरीच्या संधी

बीकॉम चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉमर्स असून यालाच आपण मराठी भाषेत वाणिज्य क्षेत्रातील पदवीधारक असे देखील म्हणतो. बारावी उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थी बीकॉम साठी प्रवेश घेऊ शकतो. अकरावी आणि बारावी वाणिज्य क्षेत्रातून उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेतात.

बीकॉम केल्यानंतर जर विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर ते घेऊन त्याला चांगली नोकरी मिळू शकते, परंतु जर विद्यार्थ्याला बीकॉम नंतर नोकरी करायची असेल, तर बँक, वाणिज्य, वित्त, आणि लेखा क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इंटर्नशिप साठी विद्यार्थी कुठल्याही संस्थेत काम करू शकतो. बीकॉम ही पदवी असल्यानंतर विद्यार्थ्याला निम्नलिखित नोकरी मिळू शकतात:

  • कर सल्लागार
  • अकाउंट एक्सिक्यूटिव्ह
  • लेखापाल किंवा ज्युनियर लेखापाल
  • बिझनेस एक्सिक्यूटिव्ह
  • लेखा व्यवस्थापक
  • आर्थिक सल्लागार
  • व्यवसाय सल्लागार
  • आर्थिक विश्लेषक

बीकॉम केल्यानंतर वर दिलेले ठिकाणी विद्यार्थी ला नोकरी मिळू शकते परंतु बीकॉम केल्यानंतर एम कॉम म्हणजेच मास्टर ऑफ कॉमर्स ही पदवी मिळवल्यानंतर आणखीन चांगले नोकरीची संधी तयार होते. या सर्व ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी बारावी उत्तीर्ण आणि बीकॉम पदवीधारक असणे गरजेच आहे.

बीकॉम नंतर शिक्षणाच्या संधी

बीकॉम चा पूर्ण फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स असा आहे आणि यालाच आपण मराठी भाषेत वाणिज्य क्षेत्रातील पदवीधर असं देखील म्हणतो. बीकॉम नंतर विद्यार्थी पुढचे शिक्षण घेऊ शकतो. बीकॉम नंतर पुढील आयुष्यात शिक्षणाच्या संधी निम्नलिखित आहेत:

  • बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी पदवी उत्तर शिक्षण म्हणजेच एम कॉम देखील करू शकतो. एमकॉम म्हणजेच मास्टर ऑफ कॉमर्स.
  • विद्यार्थ्याला जर एमबीए करायचा असेल तर बीकॉम झाल्यानंतर विद्यार्थी सीईटीची परीक्षा साठी अभ्यास करून एमबीए साठी देखील प्रवेश घेऊ शकतो.
  • बीकॉम नंतर विद्यार्थ्याला  ACCA,CMA,CA,CS,CAT, यासारख्या वाणिज्य क्षेत्रातील भरपूर कोर्स करू शकतात.
  • बीकॉम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पदवीवर देऊ शकणाऱ्या परीक्षा म्हणजेच एमपीएससी, यूपीएससी आणि इतर बँकिंग सोबत संबंधित परीक्षा देखील विद्यार्थी देऊ शकतो.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण बीकॉम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम बीकॉम म्हणजे काय आणि त्याचा पूर्ण स्वरूप काय आहे हे आपण या पोस्ट मधून जाणून घेतल. बीकॉम म्हणजेच बॅचलर ऑफ कॉमर्स आणि त्यालाच मराठी मध्ये आणि त्या क्षेत्रातील पदवीधर असे देखील म्हणतात.

त्यानंतर बीकॉम म्हणजे तीन वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश करण्यासाठी पात्रता निकष बघितले. त्यानंतर बीकॉम करण्यासाठी विद्यार्थ्याला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज सुद्धा आपण या पोस्ट मधून घेतला. त्यानंतर बीकॉम साठी महाराष्ट्रातील काही सर्वोत्तम महाविद्यालय देखील आपण बघितले.

त्यानंतर आपण बीकॉम नंतर नोकरीच्या संधी आणि त्याचबरोबर बीकॉम नंतर शिक्षणाच्या संधी देखील आपण बघितल्या. पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

बीकॉम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला किती पगार मिळू शकतो?

बीकॉम पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक पगार ₹१.७५ लाख ते ६ लाख इतका मिळू शकतो.

बीकॉम नंतर काय करावे?

बीकॉम झाल्यानंतर विद्यार्थी नोकरी सुद्धा घेऊ शकतो आणि त्याचबरोबर जर त्याला पुढे त्याचं शिक्षण करायचं असेल तर एम कॉम म्हणजेच मास्टर्स ऑफ कॉमर्स हे देखील करू शकतो. त्याचबरोबर पदवीवर देता येणाऱ्या परीक्षा म्हणजेच एमपीएससी आणि यूपीएससी ची तयारी देखील करू शकतो.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top