बीबीए फुल फॉर्म BBA Full Form In Marathi - Full Forms Marathi

बीबीए फुल फॉर्म BBA Full Form In Marathi

BBA Full Form In Marathi बीबीए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा होतो. मराठीमध्ये बीबीए म्हणजे व्यवसाय प्रशासन पदवी असं असतं. बीबीए हा व्यवसायिक क्षेत्रातील एक पदवी कोर्स आहे. या अभ्यासक्रमामध्ये किंवा कोर्समध्ये विद्यार्थ्याला व्यावसायिक क्षेत्रातील विविध गोष्टी शिकवण्यात येतात. अकाउंटिंग, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, व्यवसाय आकडेवारी आणि अशाच इतर भरपूर विविध विषयांबद्दल माहिती देण्यात येते.

BBA Full Form In Marathi

बीबीए फुल फॉर्म BBA Full Form In Marathi

बीबीए हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स असून अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. बीबीए ही पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षण mba सुद्धा करू शकतो. बीबी या कोर्समध्ये विद्यार्थ्याचं, संभाषण कौशल्य आणि त्याचबरोबर उद्योजक कौशल्य विकसित करण्यात येत.

या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर आणि बीबीए ची पदवी मिळवल्यानंतर तो विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये किंवा पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांच्या घरचा व्यवसाय आहे असे विद्यार्थी बीबीए हा कोर्स निवडतात.

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांनी बीबीए कोर्स निवडणे मागचं कारण म्हणजे या कोर्समध्ये व्यवसायाशी निगडित सगळे विषय अगदी व्यवस्थितपणे आणि खोलपर्यंत समजवण्यात येतात. यामध्ये व्यवसायिक क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या विषयांबाबत माहिती देण्यात येते जे विद्यार्थ्याला पुढील आयुष्यात व्यवसायात कामे पडतं.

व्यवसायात नव्हे तर विद्यार्थ्यांनी बीबीए केल्यानंतर त्याच्यासाठी सरकारी आणि खाजगी नोकऱ्या देखील उपलब्ध आहेत. बीबीए ही पदवी एक अत्यंत चांगली पदवी म्हणून ओळखली जाते कारण यामध्ये सर्वसमावेशक व्यवसायाबद्दल शिकवलं जातं. बीबीए केल्यानंतर विद्यार्थी एमबीए करायला देखील पात्र ठरतो. एमबीए म्हणजे एक मास्टर डिग्री आहे.

बीबीए कोर्स चा कालावधी

बीबीए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि याचा कालावधी तीन वर्ष इतका असतो. हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे आणि यामध्ये सहा सेमिस्टर चा समावेश असतो. या तीन वर्षांमध्ये विद्यार्थी व्यवसायाबद्दल आणि, व्यवस्थापनाबद्दल सर्वोत्तम आणि सर्वसमावेशक सगळी माहिती घेऊ शकतो.

हा कोर्स तीन वर्षाचा असून यामध्ये सहा सेमेस्टर विभागले आहेत. यामध्ये सहा सेमिस्टर असून प्रत्येक सेमिस्टर चा कालावधी सहा महिने ठरवण्यात आलाय. दुसऱ्या देशात किंवा इतर कुठल्या महाविद्यालयांमध्ये बीबीए या कोर्सचा कालावधी तीन किंवा तीन वर्षापेक्षा जास्त देखील असू शकतो.

व्यवसायाबद्दल प्रशिक्षण करण्यासाठी हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये पुढे विद्यार्थ्याला वाटलं तर तो एखाद्या विषयाला निवडून त्यामध्ये स्पेशलायझेशन देखील करू शकतो. बीबीए या कालावधीमध्ये विविध इंटर्नशिप आणि कोर्सेस विद्यार्थी करू शकतो.

या कोर्सच्या कालावधीमध्ये विविध प्रकल्प आणि उन्हाळी प्रशिक्षण सारखे गोष्टी देखील आयोजित करण्यात येतात. या तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्याला व्यवसायाबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल सर्व आवश्यक माहिती देण्यात येते जेणेकरून बीबीए ही पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी व्यवसाय करण्यास पात्र ठरेल.

BBA  full form in English | BBA  full form in Marathi

BBA full form in Marathiबॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
BBA  full form in EnglishBachelor of Business Administration
BBA प्रति महिना पगार₹15,000 आणि ₹1,00,000
BBA साठी लागणारा वेळतीन वर्षे

बीबीए साठी आवश्यक पात्रता

बीबीए हा एक तीन वर्षाचा पदवीधर कोर्स असून याचा पूर्ण फॉर्म बॅचलर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा आहे. या कोर्समध्ये व्यवसायासोबत निगडित सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यात येतात. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता निकष निम्नलिखित आहेत:

  • बीबीए या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेच आहे.
  • विद्यार्थ्याचे बारावीचे शिक्षण कुठल्याही शाखेतून जसं कला वाणिज्य विज्ञान किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातून,झालं असलं तरी विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतो.
  • सामान्यतः या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठलीही स्पेशल परीक्षा देण्यात येत नाही परंतु काही विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते आणि त्या प्रवेश परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो.
  • सेट परीक्षा म्हणजेच सिमबायोसिस एंट्रन्स टेस्ट, ही संस्था बीबीए मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करते.
  • विद्यार्थ्याला बारावी मध्ये किमान ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणं गरजेचं आहे.
  • बी बी ए या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये. परंतु काही ठिकाणी वयोमर्यादा बघण्यात येते.

बीबीए नंतर नोकरीच्या संधी

बीबीए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यवसायात रुची ठेवणारे विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेत असतात. तीन वर्षाचा बीबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला निम्नलिखित नोकरीच्या संधी असतात:

  • विपणन समन्वयक/सहाय्यक: या नोकरीमध्ये, जाहिरात मोहिमांमध्ये मदत करावी लागते. यामध्ये बाजारावर संशोधन करण्यात येत, विज्ञानासाठी योजना बनवतात, सोशल मीडिया आणि त्याचबरोबर ऑनलाईन विपणन कार्यामध्ये मदत करतात.
  • सेल्स एक्झिक्युटिव: सेल्स एक्झिक्युटिव्ह काम ग्राहकांना, सेवा आणि उत्पादन विकून पैसे कमवन हे असतं.
  • व्यवसाय विश्लेषक: व्यवसाय विश्लेषकाचे काम म्हणजे कंपनीमधील, समस्या शोधणारी त्यावर उपाय सुचवणं अस आहे. या नोकरीवर असलेले लोक उपाय शोधून, कंपनीमधील काही गोष्टी अत्यंत चांगल्या करण्यासाठी शोध लावत असतात आणि त्याचा अभ्यास करत असतात.
  • आर्थिक विश्लेषक: या नोकरीवर असलेले लोक आर्थिक माहितीचा अभ्यास करतात आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये चांगल्या गुंतवणुकीचा पर्याय सुचवतात. आर्थिक अहवाल तयार करण्यासाठी देखील हे लोक जबाबदार असतात. वित्त सुधरवण्यासाठी हे लोक सल्ला देत असतात.
  • उद्योजक: बीबीए पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करू इच्छित असणारे विद्यार्थी त्यांचा स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकतात आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या कंपन्या देखील सुरू करू शकतात.

बीबीए मध्ये कोणते स्पेशलायझेशन करू शकतात

बीबीए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे. यामध्ये विद्यार्थ्याला व्यवसायाविषयी सगळ्या महत्त्वाच्या माहिती देण्यात येतात. व्यवसायामध्ये आणि व्यवस्थापन मध्ये रुची ठेवणारे विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेत असतात.

बीबीएमध्ये भरपूर स्पेशल आइजेशन उपलब्ध असून विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार कुठल्याही विषयांमध्ये स्पेशलिजेशन करून त्याचा करिअर आणि शिक्षण पुढे नेऊ शकतो. विषयाबाबत अधिक कौशल्य प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी त्या विषयांमध्ये मास्टर देखील मिळवू शकतो. बीबीए कोर्स मध्ये करता येणारे के स्पेशल निम्नलिखित आहेत:

  • वित्त: वित्त स्पेशलिजेशन मध्ये विविध विषय म्हणजे, आर्थिक व्यवस्थापन, गुंतवणूक, कॉर्पोरेट वित्त विश्लेषक आणि नियोजन यावर जास्त भर देण्यात येतो. योग्य धोरणात्मक आर्थिक निर्णय घेणे आणि त्याचबरोबर, डेटाच विश्लेषण करणे हे सगळं वित्त म्हणजेच फायनान्स स्पेशल मध्ये शिकवण्यात येतं.
  • विपणन: विपणन स्पेशलायझेशन मध्ये काही विषय जसं, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, बाजार संशोधन, ग्राहकांबद्दल वर्तन, विक्री धोरणे आणि जाहिरात अशा गोष्टींवर जास्त भर देण्यात येतो. यामध्ये विक्री संबंधित विविध, योजना तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत.
  • उद्योजकता: उद्योजकता हा विषय बीबीए स्पेसिलायझेशन मध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये लोकांच्या मनात उद्योजक्ताची मानसिकता कशाप्रकारे घडवायची यावर भर देण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्याला उद्योजकतेसाठी नवीन प्रकल्पना सुचवण्यात येतात.

Conclusion

या पोस्टमध्ये आपण बीबीए बद्दल भरपूर माहिती गोळा केली. यामध्ये सर्वप्रथम बीबीए म्हणजे काय त्याचा पूर्ण फॉर्म काय याबद्दल आपण समजून घेतलं. बीबीए चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा होतो आणि हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे. त्यानंतर आपण बीबीए कोर्सचा कालावधी देखील समजून घेतला.

त्यानंतर बीबीए कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता निकष देखील आपण समजून घेतले. बीबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी देखील आपण या पोस्ट मधून बघितल्या. त्यानंतर बीबीए मध्ये कुठले स्पेशल उपलब्ध आहेत याबद्दल देखील आपण माहिती घेतली. पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी परत आमच्या पेजवर भेट देत रहा.

FAQ

बीबीए कोर्स म्हणजे काय?

बीबीए कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा एक तीन वर्षाचा पदवी कोर्स आहे. यामध्ये विद्यार्थ्याला व्यवसायाबाबत सर्व महत्त्वाच्या विषयांवर शिक्षण देण्यात येतं. बीबीए ही पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी त्याचा स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्यास पात्र ठरतो.

बारावी सायन्स नंतर बीबीए करता येईल का?

बीबीए करण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण पाहिजे. बारावी कुठल्याही क्षेत्रातून उत्तीर्ण असेल तरी बीबीए मध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थ्याला मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बारावी मध्ये ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणं गरजेचं आहे.

संदर्भ

Leave a Comment

Scroll to Top